Login

रेशीम बंध - माधुरी बर्वे

सलाम जिच्या कार्याला प्रेरणा जी देते नेहेमी आम्हाला मन जीचं खूप सुंदर वय तिचं फक्त एक नंबर अशी ही आमच्या ' ईरा माधुरी ' ग्रुपची कॅप्टन माधुरी बर्वे यावर्षी इरा चॅम्पियनशिप ट्रॉफीची घोषणा झाली आणि नेहेमीप्रमाणेच टीम मध्ये कोण कोण असणार आणि कॅप्टन कोण असणार याची उत्सुकता वाढली . माधुरी बर्वे आमच्या टीमच्या कॅप्टन म्हणून फक्त माहिती होत्या . आधी इरा वर त्यांची काहीच ओळख नव्हती . या मॅडम कोण जाणे कश्या असतील ? आपल्या टीम ला नीट मॅनेज करतील का ? असे अनेक प्रश्न मनात होते . पहिल्यांदा त्यांच्याशी बोलले आणि खरंच मॅडम वरून त्यांना कधी काकू म्हणायला लागले ते कळलंच नाही . आमच्या दोघींचे बंध अगदी सहज जुळले . वयातलं अंतर आणि माधुरी काकूंचा प्रेरणादायी प्रवास खरंच भुरळ पाडून गेला .आमच्या दोघींमध्ये रेशीम बंध जुळण्याचे अजून एक खास कारण म्हणजे आमचं माहेर एकच . दोघीही एकाच शहरातल्या त्यामुळे औरंगाबाद ( आताचं छ्त्रपती संभाजी नगर ) म्हटलं की दोघींचीही मने आपोआप ओलावतात .माधुरी काकू वयाची साठी पार केलेल्या आहेत यावर विश्वास बसणार नाही . या वयातला त्यांचा उत्साह बघितला की आम्ही सगळेच सहज आदराने त्यांना सलाम करतो .शैक्षणिक क्षेत्रात माधुरी बर्वे यांचे योगदान अगदी मोलाचे आहे . हुशार मुलांना सगळेच शिकवतात पण निराशेच्या गर्तेत सापडलेल्या मुलांना नवी वाट दाखवण्याचे कार्य हे खरंच खूप मोल्यवान आहे . क्लासेस खूप छान सुरू होते आणि माधुरी चे शुभमंगल होऊन ती मुंबईत आली .
सलाम जिच्या कार्याला
प्रेरणा जी देते नेहेमी आम्हाला
मन जीचं खूप सुंदर
वय तिचं फक्त एक नंबर
अशी ही आमच्या ' ईरा माधुरी ' ग्रुपची कॅप्टन माधुरी बर्वे
यावर्षी इरा चॅम्पियनशिप ट्रॉफीची घोषणा झाली आणि नेहेमीप्रमाणेच टीम मध्ये कोण कोण असणार आणि कॅप्टन कोण असणार याची उत्सुकता वाढली . माधुरी बर्वे आमच्या टीमच्या कॅप्टन म्हणून फक्त माहिती होत्या . आधी इरा वर त्यांची काहीच ओळख नव्हती .
या मॅडम कोण जाणे कश्या असतील ? आपल्या टीम ला नीट मॅनेज करतील का ? असे अनेक प्रश्न मनात होते . पहिल्यांदा त्यांच्याशी बोलले आणि खरंच मॅडम वरून त्यांना कधी काकू म्हणायला लागले ते कळलंच नाही . आमच्या दोघींचे बंध अगदी सहज जुळले . वयातलं अंतर आणि माधुरी काकूंचा प्रेरणादायी प्रवास खरंच भुरळ पाडून गेला .
आमच्या दोघींमध्ये रेशीम बंध जुळण्याचे अजून एक खास कारण म्हणजे आमचं माहेर एकच . दोघीही एकाच शहरातल्या त्यामुळे औरंगाबाद ( आताचं छ्त्रपती संभाजी नगर ) म्हटलं की दोघींचीही मने आपोआप ओलावतात .
माधुरी काकू वयाची साठी पार केलेल्या आहेत यावर विश्वास बसणार नाही . या वयातला त्यांचा उत्साह बघितला की आम्ही सगळेच सहज आदराने त्यांना सलाम करतो .
शैक्षणिक क्षेत्रात माधुरी बर्वे यांचे योगदान अगदी मोलाचे आहे . हुशार मुलांना सगळेच शिकवतात पण निराशेच्या गर्तेत सापडलेल्या मुलांना नवी वाट दाखवण्याचे कार्य हे खरंच खूप मोल्यवान आहे . क्लासेस खूप छान सुरू होते आणि माधुरी चे शुभमंगल होऊन ती मुंबईत आली . इथे सगळं शून्यातून पुन्हा नव्याने सुरू करायला हवं होतं . पण एवढ्या तेव्हढ्यात डगमगणारे आम्ही औरंगाबादकर आजिबात नाही . आणि स्वस्थ बसेल ती माधुरी कसली ? मग हळूहळू क्लासेस सुरू झाले . अनेक सिझनल उद्योग आणि त्याचे प्रदर्शन करण्याचा उद्योग तिने सुरू ठेवला .
अगदी जीव लावून मनापासून आणि हातचं काहीही राखून न ठेवता शिकवण्यात माधुरीचा हातखंडा असल्यामुळे इथेही चांगला जम बसला . कॉलेज मध्ये शिकवणे आणि त्याच बरोबर पेपर चेकिंगच अवघड आणि वेळखाऊ काम पण माधुरीने ते लीलया पेललं . सोबत संसाराची जवाबदारी सुद्धा होतीच .दोन गोंडस मुलांनी संसार परिपूर्ण केला होता .
नवीन नवीन शिकण्याची आवड असणारी माधुरी मग ज्योतिष शिकायला जाऊ लागली .दोन वर्षाची पदवी घेऊन मग मेडिकल अस्ट्रोलॉजी सोबत वास्तुशास्त्र असे अनेक वेगळे विषय शिकून आपली आवड तिने जोपासली .
सगळं छान सुरू होतं आणि अचानक आयुष्याला नवी कलाटणी मिळाली आणि बर्वे कुटुंबीयांनी तारापूर येथे त्यांच्या गावी जाऊन राहण्याचा निर्णय घेतला . या वयात नवीन जागी राहणे सोपे नव्हते पण संकटांना सामोरे जाण्याची नेहेमीच उमेद असणारी माधुरी हे शिवधनुष्य सुद्धा पेलायला तयार झाली .
वयाची पन्नास वर्षे शहरात काढल्यावर एका खेड्यात जाऊन स्वतःला सिध्द करणे खरंच खूप अवघड होते . पण इथेही आपले सगळे स्किल्स वापरून खूप मेहेनत घेऊन माधुरी बर्वे यशस्वी झाल्या .
आज आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा लोक रिटायर लाईफ निवांत बसून एन्जॉय करतात तिथेच माधुरी बर्वे मात्र सतत काही ना काही उद्योग करून स्वतः चे आणि आपल्या कुटुंबीयांचे जीवन आनंदात कसे राहील यासाठी धडपडत असतात . त्यांच्या या जिद्दीला सलाम !
इतके कष्ट आणि अवघड जीवन जगणारी ही स्त्री खूप कणखर तर आहे पण मनाने मात्र खूप कोमल आहे . छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा अगदी आवर्जून कौतुक करणे , प्रोत्साहन देणे , मनातले मोकळेपणाने बोलणे हे खरंच मनाला मोहवून टाकते .
लेखनातही माधुरी काकूंचा हातखंडा आहे . सहज सोपी पण मनाला भिडणारी शैली अनेकांच्या पसंतीस उतरली आहे .
खरंतर माधुरी बर्वे म्हणजे माझ्या माधुरी काकू यांच्याबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल सांगायला शब्द अपुरे आहेत पण त्यांचा हा प्रवास असाच अखंड सुरू राहो आणि त्यांच्या मोलाच्या कार्यामुळे सगळ्यांना प्रेरणा मिळत राहो आणि त्यांचे जीवन निरोगी आणि आनंदाने सदैव भरलेले राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना .