रेशीमगाठ - भाग १

this story is about Swati and Samar . they got married and how their life changes

                                                रेशीमगाठ

                                                  भाग १

स्वाती जवळ जवळ आता २८ वर्षांची असेल. स्वाती च लग्न संस्थेवर जरा सुद्धा विश्वास नाही . कोणीतरी एक माणूस ज्याला आपण कधी आतापर्यंतच्या आयुष्यात कधी पहिले नाही त्या  व्यक्ती बरोबर पुढील आयुष्य काढणे हे म्हणजे नॉन सेन्स गिरी आहे असेच तिला वाटे . आई वडिलांची एकुलती एक असल्याने तिला मुळात आई वडिलांना सोडून जाऊ नये  असेच वाटायचे . त्यामुळे लग्नाचा विषय काढला कि ती सहसा तो ती टाळायची किंवा मग चीड चीड आदळआपट करत पुढे ढकलायची .

समर हा अत्यंत प्रेमाळू मुलगा . त्याच्या आयुष्यात प्रेम आणि फक्त प्रेमच होते . सर्वांवर प्रेम करून प्रेमाने प्रेम मिळवायचे हेच त्याला कळत होते .

कर्म धर्म योगाने आणि देवाच्या आज्ञेनं या दोघांचे लग्न झाले . अर्थात हे अरेंज मॅरेज होते हे काही सांगायला नको . म्हणतात ना प्रेमाच्या गाठी परमेश्वर स्वतः बांधत असतो . आपण फक्त कठपुतली असतो . तसेच ह्या दोघांचे विरुद्ध स्वभावाच्या दोन व्यक्ती लग्न बंधनात बांधल्या गेल्या होत्या . आता त्यांच्या प्रेमाचा गुंता होतो कि रेशीम गाठ हा च काय तो प्रश्न .

स्वाती च लग्न झाल्या पासून स्वातीने तिचे रंग दाखवायला सुरुवात केली होती . पहिल्या दिवशी समर ला बेड च्या खाली झोपायला भाग पाडलं होतं तिने . आणि असे केल्या बद्दल जग जिंकल्या सारखं वाटतं होत तिला .

समर ला ती जरा स्प्लिट पर्सनॅलिटी असल्यासारखी वाटली . घरात जेव्हा बाकीचे लोक म्हणजे तिची सासू, नणंद , सासरे असले कि हिच्या इतकी चांगली सून शोधून सापडणार नाही असेच वाटायचं . पण जेव्हा हे दोघेच असतील तर डाकू गब्बर सिंग घुसायचा तिच्यात . तिच्याशी कसं वागावे , हीच म्हणणं काय आहे हेच मुळात समर ला कळत नव्हते . बिचारा समर त्याची तर किंव येत होती . देवा पण ना ! प्रेमाळू मुलाला हि कसली शिक्षा देत होता काय माहित .

एकंदरीत बघता आपल्या लग्नाचे कामकाज कठीण आहे हे त्याचा लवकरच  लक्षात आले . बरं कोणाला सांगावं तर स्वातीने आई वडिलांना खोट्या प्रेमाने आपलंस करून ठेवले होते . दोन तीन दिवसांनी तर समर स्वतः त्याचा बेड खाली लावायचा नि झोपून जायचा प्रयत्न करायचा .

स्वाती ला कळत नव्हते कि तिच्या अश्या  वागण्याने एका  निरपराध माणसाला खूप त्रास देतेय. तिला जर पटत नव्हते तर मुळात लग्नाला उभीच का राहिली ?आई वडिलांच्या समाधानासाठी एका निरपराध माणसाचा बळी देणे कितपत योग्य आहे . त्याची पण लग्न बद्दलची काही स्वप्न असू शकतात . आणि ती स्वप्न चुरगळण्याचा तिला काहीही हक्क नाही .

एक दिवस अचानक समर च्या वडिलांनी त्यांना जेवण झाल्यावर बोलावले आणि त्यांनी एक सरप्राईझ दिले . दोघांना हनिमून ला जाण्याची तयारी करायला सांगितली ८ दिवसांची युरोप ट्रिप ची  टिकेट्स त्यांनी समर च्या हातात दिली .

समर " बाबा , कशाला एवढा खर्च केलात "?

बाबा " अरे तू माझा मुलगा आहेस . आणि  आय नो  हाऊ  रोमँटिक यु आर . इट्स अ  गिफ्ट फ्रॉम युअर मम्मा अँड मी "

समर " थँक उ बाबा”

एकदम आनंदात आहे असे दाखवत दोघे त्यांच्या रूम मध्ये गेले .

समर स्वाती ला " तुझा नक्की काय प्रॉब्लेम आहे मला माहित नाही . पण एखादी नॉर्मल मुलगी असती तर तिला नक्कीच हि गोष्ट आनंद देणारी झाली असती ."

स्वाती " हॅलो , आय एम अ नॉर्मल गर्ल "

समर " हो का ?मग अशी का वागतेस माझ्याशी ? मी काय त्रास दिलाय तुला ? जे कि तुसड्या सारखी वागतेस माझ्याशी "

स्वाती " तुझी चूक एवढीच आहे कि तू मला हो म्हटलंस "

समर " म्हणजे ?

स्वाती " तुझ्या कडून होकार आल्यामुळे मला लग्न  करावे लागले "

समर " मग बोलवायची कशाला आम्हाला तुला बघायला ?

स्वाती " मी नव्हतं  बोलावलं ? आई पप्पांनी बोलावलं होतं ?

समर " मग मी पण नव्हतो आलॊ , माझे मम्मी पप्पन्नी मला आणले होते तुला बघायला "

समर चा तोल सुटला आज . चक्क भांडत होता स्वातीची . आणि त्याच कुठे काय चुकत होत . काय प्रॉब्लेम आहे हे हि न बोलता स्वाती  त्याला त्रास देत होती .

स्वाती " हे बघ समर , माझ्या कडून फारशी अपेक्षा ठेऊ नकोस . मला हे लग्न वगैरे करायचेच नव्हते . तरी आपले  लग्न झाले आणि आता ते आपण  मरे पर्यंत आपल्याला सांभाळावे लागेल "

समर " मी मरायाची वाट बघतेस का ?

स्वाती " मला असे वाटतं आपण हा प्रॉब्लेम शांतपणाने बोलून सोडवू या "

समर " थँक गॉड . अक्कल आहे म्हणजे ह्या मुलीला ."

स्वाती " शट अप "

समर " बोल आता पटापट . नाही तरी हि टिकेट्स मला कॅन्सल करायची आहेत  त्याचा हि मला विचार करायचंय "

स्वाती " हे बघ मला तुझ्या बद्दल काहीच प्रॉब्लेम नाहीये . प्रॉब्लेम हा आहे कि मला मुळात लग्नच करायचे नव्हते . पण बाबांनी मला  शपथ घातली आणि मला लग्न करावे लागले .सो माझं म्हणणे हेच आहे कि मी तुझ्या आयुष्यात नाहीये असे समजूनच तू वागायचे . बायको म्हणून मी तुझ्या साठी काहीच करू शकणार नाही . आणि तू काहीच अपेक्षा ठेवू नकोस .

समर " आपण सोडून देऊ एकमेकांना . मला नको च आहे असले लग्न "

स्वाती " हे मला हि आवडले असते पण मी तसे करू नाही शकत "

समर " म्हण जे "

स्वाती " निदान सध्या तरी नाही "

समर " काय तुझ्या डोक्यात आहे काय माहित ?"

स्वाती " दोन वर्षात मला मूल  होत नाही ह्या कारणावरून तू मला डिव्होर्स दे "

समर " काय वेडी बिडी  झालीस काय?"त्यापेक्षा मी आत्ताच्या आत्ता तुझ्या वडिलांना सगळं जाऊन सांगतो आणि तुला मोकळं करतो ."

स्वाती " नो ... इट्स नॉट पॉसिबल "

समर " ह्या सगळ्यात माझ्या आयुष्याशी खेळ का ?"

स्वाती " आय एम रिअली सॉरी फॉर दॅट”

समर " ह्या  हनीमून टिकेट्स च काय करायचं ?”

स्वाती " जाऊ कि . फिरून येऊ ? इट्स युरोप . व्युई   विल एन्जॉय इट "

समर ला हि बाई किती डेन्जर आहे त्याचा अंदाज येउ लागला होता .

समर " ठीक आहे पॅकिंग कर मग ”!

स्वाती " ओके .

समर त्या रात्री काही झोपू शकला नाही . सारखा ह्या कुशी वरून त्या कुशीवर होत होता . जरा उठून बघतो तर महाराणी अख्ख्या बेड वर आरामात झोपली होती . हे चित्र काही फारसे त्याला बघवले नाही . तो विचार करू लागला . मी कशाला माघार घेऊ . उद्या पासून मी पण माझे कायदे बनवून हिच्या तोंडावर मारतो . मग कळेल कसं वाटते ते . बराच वेळ विचार करून तो झोपला .

सकाळी लवकर उठला . आणि ती आणि तो एकदम नॉर्मल नवरा असल्या सारखे तिच्याशी वागू लागला .

 समर " गुड मॉर्निग स्वाती "

आणि मस्त बेड टी घेऊन आला .

स्वाती " बेड वर समर ला बसलेलं पाहून ताडकन उठलीच "

समर रोमॅंटिक असल्या सारखा " अहं काहीही बोलू नकोस . तुझ्यासाठी मी एवढा मस्त चहा केलाय तो घे ना डार्लिग प्ल्झ "

स्वाती " ए हॅलो , हे काय फालतूगिरी आहे . तुला काल  मी सांगितलं ना आपण कोणिहि नाहीयोत .”

समर " नाहीये ना . मग चहा घे मला पण बोलायचं तुझ्याशी "

स्वाती " बोल "

समर " तू जेवढी चांगली वागतेस या रूमच्या बाहेर तेवढाच चांगला मी रूम च्या  आत वागणार आहे . तू रूम च्या बाहेर नाटक करशील ते मी निमूटपणे सहन करतो ना . मग रूम च्या आत मधले माझे नाटक तुला सहन करावेच लागेल . आणि हो नाही बोललीस तर तुझ्या बाबांना माझा कॉल गेलाच समजा "

स्वाती " यु  कॅन नॉट डू धिस टु मी "

समर " यस आय कॅन "

समर " आणि एक उद्या पासून मी बेड वर झोपणार आणि तू खाली झोपायचं . हि माझी रूम आहे . जी कि माझ्या बायको बरोबर शेअर करणार होतो . तू तर माझी कोणीच नाहीयेस तर तू बाहेर हॉल मध्ये सोफ्यावर झोपू शकतेस . किंवा खाली झोप , किंवा …

स्वाती " किंवा काय ?”

समर " किंवा बेड वर पण माझी बायको बनून . "

स्वाती " यु आर सिक "

समर " थँक उ . " " डार्लिंग हा चहा जो चहा तू प्यायलास ना तो माझा उष्टा चहा होता . कसा होता ?

स्वाती  उशी फेकून मारायला जाते आणि समर पळत सुटतो आणि स्वाती त्याच्या मागे त्याला मारायला पळत सुटते  समर मुद्दामून आरडा ओरड करतो  जसे काय त्याला उशीचा  मार लागतोय . आणि स्वाती ला वाटतय  कि त्याला खरोखरच त्याला लागतंय .

समर मनात म्हणतो  हिची आता चांगली जिरवतो . नाटक करते काय ? मी नाटक करायला लागलो ना तर कशी रडकुंडीला येईल ते बघतो आता .

समर ला स्वाती चा वीक पॉईंट कळाला होता . ते म्हणजे ती तिच्या आई वडिलांना खूप अटॅच  होती . लग्ना  आधी काहीतरी शपथा किंवा इमोशनल ब्लॅकमेल करून वडिलांनी तिला तयार केली होती असा काहीसा अंदाज त्याला आला . शिवाय सासर कडून काही तक्रार पण अली नाही पाहिजे असेही बहुदा वदवून घेतले असावे म्हणून ती घरी सासू सासऱ्यांसमोर चांगली वागण्याचं नाटक करते .

समर ने आता त्याचा मोर्चा स्वाती ला नॉर्मल बायको करवून घेण्याकडे  वळवला होता .

साधारण  8 दिवसांनी त्यांचू युरोप ट्रिप होती .

🎭 Series Post

View all