रेशीमगाठ -भाग २

Samar and swati done shopping for Europe Trip .

रेशीमगाठ -भाग २

 क्रमश: भाग १

समर ने रूम च्या बाहेर असताना स्वातीला म्हणाला

समर " स्वाती आज आपण दोघे शॉपिंग ला जाऊ . युरोप ट्रिप ला लागणारे सामान घेऊन येऊ "

 हा विषय समर रूम मध्ये पण काढू शकला असता पण त्याने मुद्दामून बाहेर काढला

स्वाती " हो चालेल ... आई तुम्ही पण याल का शॉपिंग ला ?" स्वाती समर चा तिला बाहेर नेण्याचा प्रोग्रॅम बिघडवण्यासाठी असे करते

सासू " छे ग तुम्ही दोघे च जावा . मी कशाला उगाच . आपण नंतर जाऊ मग "

समर " हो चालेल आई "

घरातील दुपारचे  जेवण आणि काम आटपून स्वाती तिच्या रूम मध्ये आली तर समर तंगड्या पसरून बेडवर झोपला होता . रात्री विचार करण्याच्या नादात त्याची झोप नीट झाली नव्हती आणि शिवाय बेड च्या खाली झोपायची त्याला सवय नव्हती .

तो अशा प्रकारे झोपला होता त्याला आपण बेड काबीज करणे असेही म्हणू शकतो . बिचारी स्वाती ..बाजूच्या खुर्चीत बसून आराम करू लागली . समर च्या हे हि लक्षात आलं कि ती ता काम करून थकलीय पण तरीही तो मुद्दाम झोपून राहिला , कारण  त्याला माहितेय आत्ता जर मी माघार घेतली तर ती कायमचीच असेल .त्यावर उपाय म्हणजे त्याने एक सोफा त्यांच्या रूम मध्ये घ्यायचा ठरवला . म्हणजे त्याच्यावर बसता हि येईल आणि वेळ अली तर झोपेता ही येईल .

थोड्या वेळाने दोघे बाजारात गेले आणि युरोप ट्रिप ला लागणारी शॉपिंग  करून आले आणि येता येता त्याने सोफा बुक पण केला तो रात्री डिलिव्हरी पण देणार होता .

घरात आल्यावर स्वाती फ्रेश होऊन पुन्हा किचन मध्ये गेली आणि हा आज बेड वर बसून राहिला . मुद्दामून लॅपटॉप ओपन करून एखाद दुसरी कामाची फाईल पसरवून ठेवली .

थोड्याच वेळात सोफा वाला सोफा घेऊन आला . समर चे मम्मी पप्पा त्यांना पण माहित नव्हते .

समर " अहो बाबा  ते मला  पडून वाचायचे असते आणि  हिला लाइट  चा त्रास होतो म्हणून मी सोफा ऑर्डर केलाय आमच्या रूम साठी "

बाबा  " बरं केलेस . थोड्या दिवसांनी लागलाच असता आधीच केलास तो बरा ". आणि दोघेही हसायला लागले .

खरं तर घरातील वातावरण खूपच छान होते . बाप लेक , माय लेक गप्पा मारायचे, हसायचे, खिदळायचे, चिडवा  चिडवी चालायची . नवीन माणूस एकदम त्यांच्यातलाच होऊन जाईल असे होते . स्वाती पण सासरे बुवा आणि सासूबाई बरोबर मस्त कॉफी घ्यायची . नॉर्मल गप्पा मारायचे . त्यामुळे टेन्शन से काहीच नव्हते .

स्वाती ला तर लगेच घरातील  मेंबर म्हणून सर्वांनी स्वीकारले होते . स्वाती पण तुसडी नव्हती , एक समर सोडला तर ती सर्वांशी छान वागायची .

स्वाती ने सोफा बघितला आणि म्हणाली  “आला  पण . चला बरं झालं “

समर " हो मॅडम तुमच्या साठी आहे तो खास . तुम्ही काय आमच्या बरोबर बेड वर झोपायला तयार नाही मग काय करणार "

स्वाती " थँक्स यार ... खाली वगैरे मी झोपूच शकले नसते .

समर " आय नो  ... म्हणूनच तर लगेच घेतला

स्वाती सोफ्यावर आडवी पडली . झोपायला कसे कम्फरटेबल  होईल ते बघू लागली  .

समर " काय आवडला का सोफा ?"झोपशील का ? पडशील खाली ?

स्वाती " का एक्सचेंज करतोस का ?

समर " ना रे ! हा अख्खा बेड आज माझा आहे आणि मी नुसता नुसता लोळणार ! अहाहा . विचार करूनच बर वाटतंय . इफ यु वॉन्ट यु कॅन जॉईन मी "

स्वाती " तोंड बघ तुझं "

समर " का काय झालं ? या तोंडावर कित्येक जणी मरतात . "

स्वाती " हा बहुतेक तुझा गैरसमज असावा "

समर " तू अशी बोलतेस जशी काय तुझ्या मागे रांग  लागलीय .

स्वाती " मला रांग नकोच आहे ."

समर " तुला एक विचारू का ?"

स्वाती " गो अहेड "

समर  " आर यु नॉर्मल गर्ल ना ?" आणि तोंड तिकडे करून हसतो .

स्वाती " शट अप "

समर " यु शट अप "

दोघेही अंगावर घेऊन झोपतात . समर मनात विचार करतो जनरली लोक झोपताना "गुड नाईट" म्हणतात आम्ही "शट अप "म्हणून झोपतोय .

दुसऱ्या दिवशी सकाळी समर पुन्हा तिच्या साठी बेड टी आणतो आणि तिला उठवायला जातो

समर " गुड मॉर्निंग बायको "

स्वाती "काय रे ! सकाळ पासून छळतोस . मी आज तुझा उष्ठा चहा पिणार नाहीये .

समर " का ग ? काल गोड नाही लागला का ?

स्वाती " मला नाही माहित . मला झोपू दे "

समर " बायको उठ . चल मस्त मॉर्निंग वॉक ला जाऊ " माझं एक स्वप्नं होतं यार ..रोज सकाळी बायको बरोबर मॉर्निंग वॉक किंवा जॉगिंग ला जायचं ."

स्वाती हे ऐकून जरा गोंधळळीच . तिने चादर डोक्यावर घेतली होती पण तिने ते वाक्य ऐकलं होतं .पण न ऐकल्या सारखे दाखविलें

एक क्षण तिला पण वाईट वाटले समर साठी . ती मनातल्या मनातं त्याला " सॉरी बोलली "

समर ने शूज घातले आणि जॉगिंग ला जायला निघाला

स्वाती " एक मिनिट समर . मी पण येते "

समर " उठ मग लवकर "

स्वाती " ए माझ्यावर ऑर्डर सोडायच्या नाहीत "

समर " माझे आई ह्यात काय ऑर्डेर सोडली .आधीच उशीर झालाय म्हणून म्हटलं लवकर आटप " आणि तिच्याकडे बघून हात जोडतो कोपरापासून

 स्वाती उठून फ्रेश होऊन तोच चहा जो समर ने आणलाय तो घेते आणि निघते . समर चा चहा एकदम भारी ... स्वाती अहाहा असेच म्हणणार होती पण तिने कंट्रोल केला .

समर " कसा होता चहा ... माझा उष्टा होता ... "

स्वाती " गप्प बस "

समर " अरे खरं आहे ते . मी तुला उष्टा चहा देतोय काल पासून .

स्वाती मोठे डोळे वटारून बघत शूज घालत असते .

दोघे जॉगिंग ला निघालेत म्हटल्यावर समर च्या आई बाबांना खूप आनंद होतो " चला मुलं एकमेकांत रमायला लागलीत हे बरे झाले ”

बऱ्याचदा गोष्टी दिसतात तश्या नसतात इकडे आई बाबांना वाटतंय कि दोघांचा संसार सुरु झालाय पण प्रत्यक्षात मात्र ते दोघे अजून साधे मित्र पण नाही झालेत . समर ने हा शिव धनुष्य उचललाय खरा पण किती दिवस हे नाटक चालणार काय माहित .

सकाळी फ्रेश हवेत मस्त दोघे जॉगिंग करून एका गार्डन मध्ये जरा वेळ बसतात . दोघे इतके दमलेत कि कोणचं काही बोलत नाहीये . पण दोघांना खूप छान वाटतंय . दोघे एकमेकांच्या कंपनीत हळू हळू कंफ़र्टबल होत आहेत .

समर " आज पासून पॅकिंग करायला घे . ट्रिप ला जायची तारीख जवळ आलीय . "

स्वाती " हो .... आणि बॉटल  मधले पाणी प्यायला लागते .

समर " अच्युअली आपण काय करणार आहोत तिकडे काय माहित . इट्स अ  हनिमून ट्रिप

स्वाती " हो ना कॅन्सल करायला पाहिजे होती

समर " मी म्हणत होतो . हि टिकेट्स कॅन्सल करू म्हणून . तूच म्हणालीस जाऊ कि म्हणून ठेवली "

स्वाती " अरे बाबांचा मूड असता म्हणून म्हटले मी "

समर " माझ्या मूड  च तुला काहीच नाही वाटत ग ?"

स्वाती " झालं तुझं सुरु ?"

स्वाती " समर . आपण मैत्री करू यात म्हणजे भांडण नाही होणार

समर " गप  ए ! बायको आहेस तू माझी . मैत्री करायला काय कॉलेज मध्ये आहोत का आपण ?"

स्वाती " तसे नाही रे .....

समर " ऐक ना स्वाती ... आता सुरु करू आपण आपली नवीन लाइफ ... तुला मज्जा येईल माझं जग खूप छोटं आहे आपण खूप छान आहे . तुला कधीच काहीच त्रास होणार नाही . तू फक्त हो म्हण "

स्वाती " समर ते शक्य नाही "

समर " का पण ? काय प्रॉब्लेम आहे ? तुझा ब्रेक अप झालाय का ? तुझं कोणावर प्रेम होतं का ? किंवा आहे का ? स्वाती प्लिज स्पिक अप. आपण मार्ग शोधून काढू ? उगाच गोष्टी नको ना ताणू ? काय म्हणतोय मी ?

स्वाती " मला या विषयावर बोलायचंच नाहीये , मला एवढंच माहितेय मी अजून कुठलीही जवाबदारी घ्यायला तयार नाहीये . आणि बंधनात राहायला तर मुळीच नाही .

समर " अग  कोण तुला बंधनात  ठेवतय ?आमच्या अगर इतके फ्री वातावरण कुठेच नसेल ? आणि हा विचार लग्ना आधी करायचा असतो ... नंतर नाही . "

स्वाती " हेच तर ना .. लगेच चुका काढायला सुरुवात होते या बंधनात ."

समर " मग काय तुला येत जात सॅल्यूट मारायचा का ? "

स्वाती " शी .. मी उगाच आले तुझ्या बरोबर  जॉगिंग ला . सगळं मूड  खराब केलास तू "

समर " माझा पण विचार कर जरासा "

स्वाती " आय एम नॉट रेडी फॉर दॅट ! किती वेळा सांगू "

🎭 Series Post

View all