रेशीमगाठ -भाग 4

in this Samer got call from Swati's father and discuss how swati is behaving with u ... that means he knows swati is not normal

रेशीमगाठ -भाग 4

क्रमश: भाग ३

दुसऱ्या दिवशी सकाळी समर स्वाती ला न उठवताच एकटाच जॉगिंग ला गेला . स्वाती पण मस्त झोपली होती .

थोड्या वेळाने स्वातीला जाग  आली बघते तर समर रूम मध्ये नाहीये .. आज त्याने त्याचा स्पेशाल टी सुद्धा तिला दिला नाही ... स्वाती ला आज  जरा चूक चुकल्या सारखे वाटले . स्वाती उठून तिचे आवरू लागली पण तिच्या डोक्यात सारखा समर च होता . हा रागावला तर नसेल ना ? आज ह्याने मला का बरं उठवले नसेल ? आज त्याने चहा पण नाही ठेवलनं ? असा विचार करतच आवरत होती

तेवढ्यात रूम च दार वाजले . तिला वाटले हा आता अगदीच फॉर्मल वागू लागला . रूम मध्ये डायरेक्ट एंटर करणारा नॉक करतोय . दार उघडायला गेली तर बघते सासूबाई

स्वाती " गुड मोर्निंग आई "

समर ची आई " गुड मॉर्निंग  बेटा .. आज तू नाही गेलीस का मॉर्निंग वॉक  ला "

स्वाती " हो ना ते.. जागच नाही आली. म्हणून  समर एकटाच गेला .

समर ची आई " चल मग नाश्ता तयार आहे आपण तिघे खाऊन घेऊ "

स्वाती " नको मी समर आल्यावर त्याच्या बरोबर घेईन "

समर ची आई " ठीक आहे .. पण थांबलच पाहिजे असे नाही बरं का ? "

स्वाती " हो नक्कीच ...

समर ची आई " आज संध्याकाळी माझ्या कीटी पार्टी च्या  माझ्या मैत्रिणी येणार आहेत घरी .. तू आहेस का संध्याकाळी ? का तुमचं काही ठरलय ?

स्वाती " नाही म्हणजे अजून तरी नाही "

समर ची आई " ठीक आहे मग संध्याकाळी तू पण तयार राहा ... तुला पण भेटायचंय  त्यांना .. "

स्वाती " हो चालेल ... मी काय घालू संध्याकाळी "

समर ची " पार्टी वेअर साडी घाल .. जास्त मेक  अप नको करूस ? जस्ट नॉर्मल "

स्वाती " ठीक आहे आई "

समर " गुड मॉर्निंग आई , नाश्ता तयार आहे ना ... मी लगेच अंघोळ करतो आणि आलोच  खूप भूक लागलीय "

समरची आई " हो तयार आहे ... तू ये .. आम्ही दोघे बसतोय नाश्त्याला .. आणि निघून जाते

स्वाती कडे बघून " झाली का झोप मॅडम "

स्वाती " हो .. तू मला का उठवलं नाहीस . मी पण आले असते जॉगिंग ला "

समर " म्हटले जाऊ दे उगाच तुझी झोप नको मोडायला .. {मनात म्हणतो " जबरदस्ती नको उगाच "}

स्वाती " काय झालय ? सगळं ठीक आहे ना ? "आज तू जरा वेगळा वागतोस म्हणून विचारले"

समर " एस एव्हरी थिंग इज परफेक्टली ऑल राइट "

आणि समर अंघोळीला गेला . अंघोळ झाल्यावर समर ने आवरले आणि किचन कडे गेला . त्याच्या हाताने नाश्ता घेऊन खायला पण बसला . त्याला वाटले कि स्वाती ने नाश्ता केला असेल .. ती याच्यासाठी थांबली असेल असे तर अजिबातच वाटले नाही .

स्वाती मात्र आज स्वतःहून समर साठी नाश्ता करायची थांबली होती . ती रूम मध्ये च होती

समर ने नाश्ता केला आणि त्याच्यासाठी चहा बनवू लागला .

तेवढ्यात स्वाती किचन मध्ये आली . डायनिंग टेबल वर समर ची नाष्ट्या ची रिकामी डिश पाहिल्यावर तिला लगेच कळले कि ह्याने नाश्ता एकट्यानेच खाऊन घेतला

समर " मी चहा बनवतोय मला तुला पाहिजे का ?"

स्वाती " हो चालेल , पण आधी नाश्ता तर करते "

समर " अरे तू अजून नाश्ता नाही केलास "?

स्वाती " नाही .. मी तुझ्यासाठी थांबले होते "

समर एकदम चरकलाच . अरे सॉरी मग बोलायचंस नाही का ? मला कसं कळणार ?"

बोलता बोलता स्वाती ने पण डिश मध्ये नाश्ता वाढून घेतला आणि खायला बसली .

समर ने त्याचा स्पेशल चहा दोघांना भरला आणि प्यायला बसला .

समर " हा घे चहा .. आज उष्टा नाहीये "

स्वाती " हो का ?

स्वातीचा नाश्ता होई पर्यंत समर तिथेच थांबला .

समर " घरात बसून कंटाळा आलाय ... आज बाहेर जायचं का ?म्हणजे तुला यायचय का ?

स्वाती तोंडात घास असतानाच

" नाही आज मला नाही जमणार आज माझी कीटी पार्टी आहे "

समर " काय ? तू कधी जॉइन झालीस इकडे "

स्वाती " नाही रे ते आईंच्या मैत्रिणी येणार आहेत तर त्या मला पण भेटणार आहेत. सो संध्यकाळी मी बिझी आहे "

समर " ठीक आहे .. मग मी जाऊन येईन .. बऱ्याच दिवसात मित्रांना भेटलो नाहीये ना .. तर भेटून येतो .. नाहीतर म्हणतील बायको आल्यावर आम्हाला  विसरला "

स्वाती " ठीक आहे "

दोघांनी त्यांचे दोघांचे प्लॅन एकमेकांना सांगितले . दोघेही वेगवेगळ्या प्लॅन मध्ये खुश होते.

थोड्या वेळाने समर बाहेर TV बघत बसला आणि स्वाती संध्याकाळी काय घालायचं त्याची तयारी करायला गेली .

तिने तिच्या लग्नाच्या सड्या नीट कपाटात लावून ठेवल्या पण नव्हत्या . बऱ्याच बॅगेत होत्या .. आज  तिने तिची एक बॅग ओपन करायचे ठरवले . त्यात एक मस्त रेड पार्टीवेअर साडी होती .  तिने ती सोफ्यावर काढून ठेवली  . आणि आता ती त्याच्यावरच्या मॅचिंग दागिने काढत होती .

तेवढ्यात समर  रूम मध्ये मोबाईल वर बोलत बोलत आला . त्याला स्वातीच्या वडिलांचा फोन आला होता . त्याला वाटले त्यांना स्वातीशी बोलायचे असेल म्हणून माझ्या  मोबाइल वर फोन केला असेल .

पण समोरून स्वातीचे बाबा म्हणतात " कसे आहात जावई बापू ?" जरा बोलायचं होते तुमच्याशी . वेळ आहे का आत्ता तुम्हाला ?

समर " मला तुम्ही नावाने हाक मारलीत तरी चालेल . बोला ना बिनधास्त .. मी सध्या नुसताच बसलोय "

स्वातीचे बाबा " अहो स्वाती कशी वागते तुमच्याशी ? नॉर्मल आहे ना ? तिच्या मनाविरुद्ध लग्न लावून दिलेय . म्हणून विचारले "

समर " हो खूप चांगली वागते.. आई बाबांना शी पण मिळून मिसळून असते ."

स्वातीला ऐकायला येणार नाही हे बघत तो बोलतो .

स्वातीचे बाबा " अहो त्यांच्याशी ती खूप छान वागेलच . तसे तिच्यावर चांगले संस्कार केलेत आम्ही . पण मला भिती वाटते तुमच्याशी कशी वागते त्याची ?

समर ला असे वाटते लगेच सांगून टाकू का ? तसाही त्यांचा फोन आलाय .. त्यांना पण कळलं पाहिजे कि ती कशी वागतेय ते ?

स्वातीचे चे बाबा " हॅलो .. "

समर " तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका ..ती ठीक आहे..

स्वातीचे बाबा " म्हणजे ती ने काहीतरी सांगितलेय तुम्हाला ? होय ना ?

समर गोधळून जातो काय बोलावे ते कळत  नाही त्याला .

समर " नाही तसे नाही .. आम्ही आता युरोप ट्रिप ला हनिमून ला जातोय या वीक एन्ड ला "

स्वातीचे बाबा " अरे वाह ... एन्जॉय करा ... " सांभाळून घ्या एकमेकांना ."

समर " हो .. नक्कीच "

स्वाती चे बाबा " मला एक सांगायचं होतं . स्वाती अत्यंत गुणी मुलगी आहे . फक्त जरा हट्टी आहे . तिला मी एक मुलगी पेक्षा एक मुलासारखे वागवले . सेल्फ डिपेन्डन्ट बनवणे इतपत ठीक होते . पण आमच्या नंतर तिला कोणीच नाही त्यामुळे मी तिला जरा मुलासारखे वागायला शिकवले . म्हणजे ती पण एखाद्या पुरुष सारखे डिसिजन घेईल आणि आनंदात जगेल.

त्याचा थोडा उलट परिणाम असा झाला कि ती लग्न करायाला तयारच होईना . तिला वाटू लागले कि मी लग्न करणार म्हणजे मी बंधनात अडकणार .. माझ्यावर माझा नवरा ऑर्डर सोडणार , मला त्याची सेवा करावी लागेल . आणि आपलं समाज तसाच आहे , मुलगी किती हि शिकली तरी तिला किचन सुटलय का ?

हा प्रॉब्लेम माझ्या तेव्हा लक्षात आला नाही . पण ती लग्न संस्थेच्या विरोधात गेली होती . तिला लग्नाला तयार मी कशी केलीय ते माझं मला माहितेय . तुम्हला सांगतो .. लग्न झाल्या पासून ती माझ्या शी एकदा पण बोलली नाही . इतकी रागावलीय माझ्यावर.. बोलता बोलता बाबांचं आवाज रडवेला झालेला समर ला काळाला .

समर " अहो तुम्ही अजिबात काळजी करू नका . ती आता माझी जवाबदारी आहे . "

स्वातीचे बाबा " तुम्ही खूपच समंजस आहात हे मला माहित होतं पण आज खात्री झाली .

समर " थँक्स उ..."

स्वातीचे बाबा " ठीक आहे .. ठेवतो फोन आता "

समर लक्षात आले कि त्याचा या बाबतीतला  ऐकमेव सपोर्ट स्वातीचे बाबा होते. कदाचित जर स्वाती एक दोन महिन्यात बदलली नाही तर हा प्रश्न त्यांच्याच मदतीने सोडवायला लागणार होता . आणि आता तर तेच खुद्द तिला सांभाळून घ्यायला सांगत आहेत आणि बोल बोलता त्याने पण त्यांना अश्वासन दिले कि तुम्ही काहीही काळजी करू नका .. म्हणजे आता त्याचे हाल तोंड दाबून मुक्क्याचा मार अशी झाली होती .

🎭 Series Post

View all