रेशीमगाठ भाग - ५
क्रमश: भाग ४
समर फोन ठेवणार तेवढ्यात स्वाती समोर उभी आणि ती खुणे ने त्याला विचारतेय हे कानातले जे तिने आता घातलेत ते तिला कसे दिसत आहेत
समर " ठीक आहेत पण कीटी पार्टी च्या हिशोबात जरा जास्त होतील . मला विचारशील तर सिम्पल आणि सोबर असे काहीतरी घाल .
स्वाती " हमम ...काय कनफ्युजन आहे ? मला प्लिज मदत कर "
समर " सॉरी मला पण ह्यातील काही कळत नाही " आणि बाईक ची चावी घेऊन बाहेर जाऊन येतो सांगून निघून गेला .
समर जाताना आईला सांगून गेला कि आज रात्रीचे माझे जेवण बनवू नका मी राकेश बरोबर बाहेरच जेऊन येईल .
स्वाती ला खरतर समर चा आज राग आला . मी इथे ह्याच्या आई ला पाहिजे म्हणून तिच्या मैत्रिणींसमोर नवी नवरी म्हणून उभी राहणार आहे तर मला मदत करायची सोडून हा गेला मित्रां बरोबर मज्जा करायला .
दुपारची जेवणं झाली होती आणि पार्टी ला थोडा वेळ होता तर स्वाती बेड वर झोपली . खरं तर त्यांचं ठरलं होतं कि बेड समर चा आणि सोफा स्वातीचा . पण किती झालं तरी बेड तो बेडच आणि सोफा तो सोफाच . हिने बेड वर झोपायचा चान्स घेतला .
थोड्यावेळाने समर घरी आला तर मॅडम बेड वर झोपलेल्या . तिला बेड वर झोपलेली बघून तिला छळायचा त्याला जाम मोह झाला होता पण त्याने कंट्रोल केला .
त्याने एक वस्तू तिला गिफ्ट म्हणून आणली होती आणि तिच्या साडीवर हळूच ठेवून तो निघून गेला .
स्वाती उठली मस्त फ्रेश झाली . चहा करून सासू सासरे आणि ती तिघांनी प्यायला . संध्याकाळचा मेनू बनवण्यासाठी त्यांनी कूक बोलावलं होता . त्यामुळे खाण्या पिण्याचा बनवण्याचा काही टेन्शन नव्हते . फक्त ते सर्व्ह करायचे होते नंतर . मग ससाऊबाई म्हणाल्या जा आता तू तयार हो .. मी पण तयार होते .. नंतर घाई नको होयला . तुला काही मदत लागली तर बोलावं मला . असे सांगून दोघी आपापल्या रूम मध्ये गेल्या .
स्वाती ने साडी नेसायला गेली तर ती वस्तू दिसली . ती वस्तू मस्त गिफ्ट रॅप मध्ये पॅक केलेली होती . तिने पटापट ती ओपन केली बघते तर त्यात मस्त diamond चे कानातले होते . खूप क्युट होते . त्यात छोटी चिट होती . मला वाटतंय हे छान दिसतील ... स्वातीला ते कानातले खूप आवडले . आणि तिच्या साडीवर ते परफेक्ट मॅच होणार होते . जास्त मोठे नाही .. जास्त छोटे नाही .. मस्तच होते .
स्वाती ने मस्त साडी नेसली . केस छोट्या क्लिप मध्ये बांधले म्हणजे डोळ्यावर नको यायला आणि मागे मोकळे सोडले . डोळ्यांना काजळ आणि रेड लिपस्टिक परफेक्ट ..त्यावर हे नवीन diamond चे कानातले आणि तिचे diamond चे मंगळसूत्र . साडी मध्ये स्त्री च सौदर्य अजून खुलतं म्हणतात ना अगदी तसच स्वाती एक मनमोहक सुन्दरी दिसत होती .
तयार झाल्यावर रूम मधला पसारा आवरून स्वाती ने बाहेर जाऊन सासू बाईंना दाखवलं
सासूबाई "व्वा ! मस्तच खूप छन तयार झालीस ग "
स्वाती "थँक उ आई ... “
सासू बाई पण खूप छान तयार झाल्या होत्या . सो ती त्यांना म्हणाली "तुम्ही पण खूप मस्त दिसत आहेत .
आणि तिने सासू बाई बरोबर एक सेल्फी घेतला .आणि DP ठेवला .
जसा तिने DP ठेवला तास तिच्या बऱ्याच मैत्रिणीचे तिला कॉल आले ... वाह .. खूप छान , ब्युटीफूल ... असे मेसेजेस आले . त्यामुळे स्वाती बाई एकंदरीत स्वतःवर जाम खुश होत्या .
स्वाती बाई आज खुश होती .. आज आपण खूप छान दिसतोय आणि छान तयार झालं ना कि मनाला पण एकदम छान वाटतं . म्हणून पूर्वी पासून म्हणतात संध्याकाळी छान स्वच्छ कपडे घाला . पावडर गंध करा , दिवा लावा .. या मागचे कारण हेच आहे कि दिवसभराचे घामाचे त्याच कपड्यात माणसाला त्रागा होयला लागतो . कधी कंटाळा आला किंवा अचानक दुखी वाटायला लागलं तर हे करून बघा मस्त छान तयार होयच , बाहेर एखादा राऊंड मारून यायचं कि एकदम फ्रेश वाटते .
तशीच स्वाती ने लग्नात साडी घातली आणि पुढच्या दोन दिवस पूजे ला वगैरे घातल्या त्यांनतर तिने आज घातली होती . त्यात ती रेड आणि आणखी त्यात पार्टीवेअर मग काय बोलायलाच नको .
कीटी पार्टी वाल्या मैत्रिणी स्वातीचं कौतुक करून करून थकल्या . कोणी तिच्यात डोळ्यांचे , कोणी तिच्यात केसांचे, कोणी तिच्या सरळ नाकाचं , कोणी तिच्या साडीचं आणि कोणी तिच्या कानातल्याचं असे कौतुक सोहळा चालू होता . सासू आणि सासरे दोघेही खूप खुश होते . गत जन्माची पुण्याई कि आपल्याला अशी सुरेख , सुशील सून मिळाली . आपल्या मुलाच्या आयुष्याचे सोने झाले असेच त्यांना वाटत होते .
थोड्या वेळाने कीटी पार्टी संपली . मैत्रीणी हळू हळू घरी निघू लागल्या . मग काय जोरदार फोटो सेशन झाले . वेग वेगळ्या पोझ देता सर्वां बरोबर फोटो काढले . स्वाती ला सर्वांनी मिळून गिफ्ट्स आणले होते त्याची देवाण घेवाण झाली . स्वातीच्या सासूने पण सगळ्यांना गिफ्ट्स आणले होते ते दिले आणि मैत्रिणी गेल्या .
स्वाती सासूबाई आणि सासरे तिघे हॉल मध्ये गप्पा मारत बसले होते . आजचा प्रोग्रॅम छान झाला वगैरे . तेवढ्यात स्वातीच्या आईचा फोन आला . ती पण म्हणत होती . स्वाती तुझा dp बघितला म्हणून फोन केला . आज काय छान प्रोग्रॅम होता वाटतं . स्वाती खूप छान दिसत आहेस ग बाळा "
थोडक्यात स्वातीच्या रुपाला आज चार चांद लागले होते . आणि त्याची तारीफ चहू बाजूने होत होती तरी पण स्वाती ला काहीतरी कमी वाटत होते . काहीतरी मिसिंग ????
काय असेल ? सांगू ?
तिला असे वाटत होते हे तिचे खुललेले रूप समर ने पहावे. आणि त्याच्या तोंडून तिला तारीफ ऐकायची होती .
आणि नेमका समर आज घरात नाहीये . एरवी समर तिच्या अवती भोवती फिरत असतो तेव्हा त्याची किंमत कळत नाही . पण आज तो घरात नाहीये तर त्याला ती actually मिस करत होती .
तो तिथे नसल्याचा तिला त्रास होत होता . तिची मनात घालमेल होत होती . असे वाटत होतं कि त्याला एक फोन करून विचारावे कि तू कधी येणार आहेस ?
पण तीला त्याला फोन करायला ऑकवर्ड होत होते . म्हणून तिने सासू बाईंना पकडले
स्वाती " आई समर कधी येणार आहे माहिते का ?"
समर ची आई " आज बहुदा तो लेट येईल . तो सांगून गेल्या कि तो बाहेरच जेवणार आहे . आपलं तर खाणं झालय आता आपण कपडे बदलू आणि झोपून जाऊ . तू पण अराम कर . दमली असशील ना ?"
स्वाती " नाही दमली "
तिच्या लक्षात आले आई काही समर ला फोन करून विचारणार नाहीत . मग सासर्यांना पकडले
समर चे बाबा " तो रात्री ११ वाजे पर्यंत येणार आहे . असा आत्ताच त्याचा मेसेज आलाय मला .. म्हणजे तो रात्री १२ वाजे पर्यंत येईल . त्याचे असेच असते . ११ म्हंटले कि १२ ला येतो ..." आणि बाबा हसायला लागतात
समर चे बाबा " तुला कंटाळा आलं का ग मुली ? आमच्या म्हाताऱ्यां बरोबर बोअर झाले असेल ना "
स्वाती " नाही .. हो बाबा .. खूप मज्जा आली आज .. किती छान आहेत आईंच्या मैत्रिणी "
समर चे बाबा " बाकी तू सर्वांना आवडलीस "
तेवढ्यात समर ची आई चेंज करून बाहेर आली .. तिने आधी स्वातीची नजर काढून टाकली . आज किती छान दिसत होतीस ना .. असे म्हणत .
समर ची आई " स्वाती बेटा .. तू आराम केलास तरी चालेल ,कपडे बदललेस तरी चालेल बरं का ?
स्वाती " हो .. आई मी जाते आता रूम मध्ये .. आणि रूममध्ये आली .
स्वाती ला काय करू असे झाले होते . तिला या साडीमध्ये आज समर ने तिला पाहावे असेच वाटत होते . त्यामुळे तिला साडी बदलावी असे वाटतच नव्हते .
प्रेमाचा अंकुर मनामध्ये फुटू लागतो ना त्याचा ठाव त्या व्यक्तीला पण होत नाही . हळुवार पणे तो मनावर आणि मग बुद्धीवर राज्य करू लागतो . एखाद्या बद्दलचे प्रेम इतके स्वार्थी बनवते कि तो किंवा ती जर आजू बाजूला नसेल तर आनंदच होत नाही . आपल्या प्रत्येक क्षणी तो आपल्या बरोबर असावा असे वाटत असते . मनाने तर असतोच पण तनाने पण तो जवळ हवा असतो .
स्वातीचे बहुदा नेमके हेच होत असावे . ती त्याला चक्क मिस करत होती . त्याच्या नसण्याचा तिला त्रास होत होता आणि शिवाय एवढ्या जणांनी केलेले कौतुक राहीले बाजूला पण समर ने आपलं कौतुक करावे यासाठी तिचे कान तरसले होते . एक बेचैनी होती जी कि तिला स्वस्थ बसू देत नव्हती .
समर ला मेसेज करून विचारू का ? या विचारावर तिचे मन अडकून पडले होते
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा