रेशीमगाठ भाग ७

In this part swati calls his father and they discuss .. also swati help samar to do the packing

रेशीमगाठ भाग ७

क्रमश : भाग ६

समर ने स्वाती ला कसे बसे झोपवले .

स्वाती पण रडल्यावर आणि समर शी बोलल्यावर तिला खूप छान झोप लागली . तशी ती आज दमली पण होती .

समर ची  झोप मात्र तिने आज उडवली होती . समर विचार करू लागला " आयला आज मी ड्रिंक्स घेऊन आलो तर मला चढलीच  नाही आणि हिला न पिताच चढली होती कि काय ? आज तिचा मूड  काही वेगळाच होता . हि मुलगी स्वतःच्या बाबतीत इतकी कॉन्फयुज आहे कि तिला नक्की काय धराव आणि काय सोडावे हेच कळत नाहीये . मला मात्र तिने पेचात पडले आहे मी नक्की कसे वागावे हेच त्याला आता कळत नव्हते .

ही चा   ब्रेन वॉश लवकर करावा लागणार आहे नाहीतर हि मला नक्कीच वे डं  बनवून टाकेल .

राहून राहून समर ला स्वातीने कानात "आय हेट यु " म्हटलेले आठवत होते . हिला नक्की काय म्हणायचंय ? खरोखरचं  " हेट यु "आहे कि मी त्याचा अर्थ मी " "लव्ह यु " असा घ्यायचा .. हाच प्रश्न आहे .

दुसरा एक विचार त्याच्या मनात येऊ लागला कि स्वाती चे मन एक झुळुझुळु वाहणारा झरा आहे .ती तिच्या मनात एक आणि बाहेर एक असे वागत नाही . आज तिने मला मिस केले ते तिने आज लगेच सांगून पण टाकले . आज तिला मला मिठी मारावीशी वाटली हि मागचा पुढचा विचार न करता मिठी मारून मोकळी पण झाली .

मन मोकळं असले कि मोकळे श्वास पण घेता येतात . जीवन जगताना हे अतिशय महत्वाचे आहे .

समर च्या लक्षात आले कि तिच्या मनातल्या लग्न बद्दलच्या चुकीच्या समजुती काढण्या साठी थोडे दिवस तिच्याशी थोडे असेच वागावे लागणार आहे . तिला जर मी तिच्या मागे लागलोय असे वाटले तर त्याची किंमत राहनार नाही उलट ती ला कदाचित हे सर्व नकोसे वाटू लागेल . ती चं तिला आयुष्यात कळले पाहिजे कि आपण आता कसे वागायचेय . आणि तो निर्णय तिने तिच्या मनापासून घेतला तर मग ती कधीच मागे वळून पाहणार नाही .

दुसऱ्या दिवशी सकाळी समर ला जागच  आली नाही त्यामुळे त्याचे जॉगिंग राहिले . तस तो कधी कंटाळा आला तर नाही जायचा .

स्वाती मात्र सकाळी उठून फ्रेश होऊन तयार बसली होती जॉगिंग ला जायला . हा उठला तर ती जॉगिंग च्या ड्रेस मध्ये सोफ्यावर झोपली होती .

समर च्या लक्षात आले कि वाट बघून बघून पुन्हा झोपली ते . त्याला  फार गम्मत वाटली .. हळू हळू पोरगी पटतेय हे त्याला कळू लागले होते .

पण तरीही लगेच हुरळून जाऊन फायदा नाही . आपल्या हे लक्षात आलेय हे दाखवायचेच नाही असे त्याने ठरवले  

समर उठला छान अंघोळ करून तयार झाला . आणि स्वाती ला हाक मारून उठविलें

समर " स्वाती .. गुड मॉर्निंग ... उठ आता "

स्वाती पण जरा आळोखे पिळोखे  देत उठली .. " काय  रे आज तू उठला नाहीस जॉगिंग ला .. मी केव्हा पासून तयार होते .

समर " ओह .. सॉरी मला जागाच आली नाही "

स्वाती पण उठून अंघोळीला गेली..

स्वाती तयार झाल्यावर समर .. "काल रात्री तू म्हणालीस कि तुला आई कडे जायचंय ... जाणार आहेस का ?"

स्वाती " हो जायचं तर होतं पण आता फार गडबड होईल आपली .. उद्या रात्रीची फ्लाइट आहे ना आपली "

समर " तुझं नक्की आहे ना माझ्या बरोबर यायचं ? म्हणजे मला तशी अजून खात्री वाटत नाही ."

स्वाती " का ? तुला नकोय का मी यायला? "

समर " उगाच वेड्या सारखं बोलू नकोस "

स्वाती " मग असे का विचारलेस ? तुला माहितेय ना मी बॅग्स कधीच पॅक करून ठेवल्यात ते .. जायचंय म्हणूनच ना ?"

समर " स्वाती .. पुन्हा एकदा सांगतो .. तू कोणताही निर्णय तुझ्या मनाविरुद्ध घेऊ नकोस .. माझ्या बाबांचा मूड जाईल म्हणून तू माझ्या बरोबर युरोप ट्रिप करावीस तेही तुझ्या मनाविरुद्ध हे मला मान्य नाही "

समर ने स्वातीला चांगलेच कात्रीत पकडले होते .. एक मिनिट स्वातीला पण कळले नाही काय उत्तर द्यावे . म्हणजे तो म्हणतोय ते एकदम करेक्ट होते तेही तिच्या दृष्टीने.

तो स्वातीच्याच  बाजूने विचार करत होता . पण तरीही त्याच्या या बोलण्याने स्वातीची चीड चीड होत होती .

मेंदू आणि मन या दोघांमध्ये चाललेली हि भांडणे होती ..

स्वाती " तू मुद्दामून मला छेडत आहेस का ?"

समर " नाही डिअर .. तू माझ्या बद्दलचा गैरसमज काढून टाक . मी फक्त तुझाच विचार करतोय .. कारण मला तू सुखी पाहिजेस ग राणी .. आय मीन स्वाती "

स्वाती  पुन्हा शांत .. तो धड भांडत पण नव्हता ... नाहीतर काय बिशाद .. स्वातीला कोणी हरवूच शकत नाही

स्वाती  लगेच सांगून टाकते .. "मी युरोप ट्रिप ला येणार आहे आणि आई कडे मी तिकडून आल्यावर दोन दिवस जाणार आहे तेही तुझ्या बरोबर ."

समर " ठीक आहे "

दोघे जाऊन नाष्टा करतात .. आई बाबांशी गप्पा टप्पा नॉर्मली मारतात .. आणि थोड्या वेळाने समर बसतो tv बघायला आणि स्वाती तिच्या रूम मध्ये येते . आणि एक काम करते . ते म्हणजे ती तिच्या बाबांना फोन लावते

स्वाती " हॅलो  बाबा .. कसे आहात ?

बाबा " अरे वाह .. तू कशी आहेस ? फायनली राग गेला का माझ्या वरचा ?

स्वाती चा  आवाज कापरा होतो .. डोळ्यात आई बाबांच्या आठवणीने गळा  दाटून येतो ... एकुलती एक लाडाची लेक जेव्हा एकदम सासरी येते तेव्हा तिची मनस्थिती हि अशीच असणार अजून कशी असेल . त्यात स्वातीचे लग्न मनाविरुद्ध झाले होते .

स्वाती " बाबा .. रागावले नाही हो .. एक फटक्यात तुम्ही मला घरातून काढून टाकलेत . मला तुम्ही पोरकं केलेत ... मी एकटी पडले .. “

तेवढ्यात समर रूम मध्ये येतो हे वाक्य तो ऐकतो पण ना ऐकल्या सारखे दाखवतो आणि लगेच बाहेर जातो ..

बाबा " अग  बाळा आम्ही दोघे तुला किती पुरणार .. आज ना उद्या आम्ही हा जग सोडून जाणारच आहोत .. आमच्या मागे तुला तुझं हक्काच  माणूस मिळणे गरजेचे होते . जगात सगळी नाती नवरा बायकोच्या नात्या  पूढे फिकी पडतात .. नवरा आणि बायको एकमेकांचे जन्मोजन्मीचे साथीदार असतात . तुला मी हे समजण्याचा खूप प्रयत्न केला तरीही तू तुझा हट्ट सोडला नाहीस . म्हणून मला हा टोकाचा निर्णय तुझ्यावर लादावा लागला . आणि मी तुला  खात्रीने सांगतो थोड्या दिवसांनी तूच मला फोन करून सांगशील कि बाबा तुमचा निर्णय  एकदम करेक्ट होता . "

स्वातीला बाबा काय म्हणतायत ते आत्ताच १०० % नाही पण ६०% तरी पटलेच होते .. त्यामुळे ती पण सगळे ऐकून घेत होती

बाबा " आणि हो स्वाती समर सारखा गुणी मुलगा मिळायला मीच काहीतरी गेल्या जन्मात पुण्य केले असावे .. तो हिरा आहे .. त्याला दुखावू नकोस .. हा हिरा जर तू गमावलास तर तूला  आयुष्यात खूप पश्चाताप करायची वेळ येईल . आणि खूप चांगली फॅमिली आहे.

स्वाती " हो बाबा .. ते तर आहेच .. सगळेच खूप चांगलेच आहेत .. "

बाबा " मग काय तुम्ही फिरायला जाताय ना "

स्वाती " हो "

बाबा " ठीक आहे मग एन्जॉय करा .. आणि आल्यावर दोघांनी या दोन दिवस राहायला .. "

स्वाती " हो बाबा "

बाबा " स्वाती .. आम्ही दोघे मरे पर्यंत तुझ्या बरोबरच आहोत .. तू एकटी आहेस असे काही मनात घेऊ नकोस .. आणि अजून तरी मी काही खाष्ट म्हातारा झालेलो नाही .. आता तर आम्हा दोघांची सेकण्ड इंनिंग सुरु झालीय .. मी आणि मम्मा सेकण्ड हनिमून ला जाण्याचा विचार करतोय ... "

बाबा स्वातीला हनिमून किंवा नवरा बायकोचे नाते  कसे असावे हे अजून कळावे म्हणून मुद्दामून तिला हे बोलतात . स्वाती ला पण हे सगळं हळू हळू पटायला लागलाय . जशी बाबांना आई आहे तशी मला पण आयुष्याची साथ असली पाहिजे .. नव्हे हि साथ प्रतेय्कालाच हवी असते .

स्वाती " वाह ! बाबा छान प्लांनिंग केलंय . "

बाबा " फोन करत जा असाच मध्ये मध्ये .. एक गोष्ट सांगू .. जसे तुला एकटं वाटतं तितका समर पण एकटाच आहे .. आणि दोन एकटे भेटले कि दुकटे होतात इतके साधे गणित आहे आयुष्याचे .. कळलं का "

स्वाती " हो बाबा.. ठेवते आता .. आणि हसत हसत फोन ठेवते .

बाबा म्हणजे स्वातीचे जीव कि प्राण होते .. त्यांच्याशी बोलल्यावर तिला आता खूप रिलॅक्स वाटत होते .. बाबांनी गोड शब्दात तिला खूप समजावले पण होते .

स्वाती बाहेर जाऊन समर ला हाक मारते

स्वाती " समर .. तुझे पॅकिंग करायचेय ना .. "

समर " आयला हो कि ... माझं पॅकिंग राहीलच होते "

स्वाती " ये मग करून घेऊ पटकन "

समर ला लक्षात येतंय स्वातीची गाडी हळूहळू रुळावर येतेय .. आणि तो रूममधे येतो पॅकिंग ला .

समर " अग  पण तू तर म्हणालीस कि तू तुझं कर ना .. मी करेन माझं तू नाही मदत केलीस तरी चालेल . "

स्वाती " हो पण माझा विचार बदल्याय आता . "

समर " ओके डार्लिग .. आय मिन .. स्वाती "

स्वाती पण एकदम नॉर्मल त्याला हि हे घे .. ते घे.. असे आठवण करून सांगते .. आणि त्याची पॅकिंग करून टाकतात .

पॅकिंग करून दमल्यावर समर जरा बेड वर आडवा पडतो ..

समर " थँक्स यार .. मला वाटले नव्हते हे पॅकिंग चे काम एवढा वेळ घेईल .. बरी आठवण केलीस ते "

स्वाती " हमम .. एस यु शूड बी "

आणि बोल बोलता स्वाती पण सोफयावर जाऊन पाठ लावते .

स्वाती " समर तुला एक सांगू का ?

समर " बोल कि .. "

स्वाती " समर आपली हि रूम जरा छोटी आहे नाही का ?"

समर " हो.. तशी छोटी आहे पण दोघांना पुरेशी आहे "

स्वाती " हो तरी पण मी काय म्हणत होते "

समर ला वाटले हि बया आता घर बदलायला सांगते कि काय ?

🎭 Series Post

View all