आज घरात खूप गडबड सुरु आहे. असणारच ना आज नील आणि सानवी च्या लग्नाचा पंचवीस वा वाढदिवस. या निमित्ताने सगळे नातेवाईक आणि पाहुणे एकत्र जमले. लग्नाचा वाढदिवस म्हणजे एक सोहळाच झाला. सगळ्यांनी या जोडीचे कौतुक आणि अभिनंदन केले. नील च्या काकांनी दोघांना त्यांची लव्हस्टोरी सांगायची विनंती केली. नील आणि सानवी एकमेकांच्या डोळ्यांत पहात होते आणि असे हरवत ते बत्तीस-पस्तीस वर्षे माग गेले.आणि त्यांना सगळं पुन्हा आठवू लागलं. आज सानवी ने सगळ आवरल, छान असा पांढरा आणि चाँकलेटी रंगाचा ड्रेस घातला आणि दुकानात जायला बाहेर पडली. दहावी ला असल्याने बाहेर जाण फारसं होत नव्हत. पण आज सुट्टी असल्याने बाहेर पडली. आणि असच अचानक तीची एका मुलासोबत नजरानजर झाली. तिने ओळखल होत त्याला की हा आपल्याच मैत्रीणीचा मोठा भाऊ आहे.दोघे दोन विरुद्ध दिशेने जात होते. पण पुन्हा पुन्हा वळून एकमेकांकडे पहात होते. असेच ते एकमेकांच्या नजरेआड गेले. पण दोघांना सुध्दा एकमेकांना पाहिल्याशिवाय चैन पडत नव्हते. दोघे एकाच गावात रहायला असल्यामुळे फक्त एकमेकांची येण्या-जाण्याची वेळ जाणून घेण महत्त्वाच होत. पहिली नजर का पहला प्यार झाल्यामुळे ते काही फार अवघड नव्हत.दोघांनी पण हळूहळू या वेळा जाणून घेतल्या
सानवी ची मैत्रीण नीलची बहीण असल्याने एकमेकांच्या वेळा जाणून घेणे काही अवघड काम नव्हते.सानवी नेहमीच त्याच्या घराजवळून आणि घरासमोरुन जात असे. तस तर आधी सानवी नील ला दादा म्हणायची कारण तो होताच आठ वर्षांनी मोठा, पण आवडायला लागल्यापासून तिने दादा म्हणायचं सोडून दिलं होत. तो सुध्दा तिचा जायच्या-यायच्या वेळी दारात उभा असायचा. क्लास ला जाताना मुद्दाम ती त्याच्यासाठी वाट वाकडी करून मैदानातून जायची. असेच तीन-चार महिने गेले. एक दिवस त्याने सानवीच्या मैत्रिणी कडून सानवी साठी नंबर पाठवला. सानवीला काय करावं हे समजल नाही. तिने हे सगळ त्याच्या घरी सांगितले. नीलच्या घरातल्यांनी त्याला खूप झापल. पण दोघांच्या मनातील प्रेम काही कमी झालं नाही. तिने त्याचा नंबर पाठ केला होता. एक दिवस तिने त्याला फोन केला.काहीच न बोलता पटकन फोन ठेवून सुध्दा दिला. चार पाच दिवस असेच गेले, पण त्याला अंदाज होताच कोणाचा फोन असेल याचा. सानवीने पुन्हा फोन केला पण काही बोलली नाही. नील ने कोण आहे हे ओळखुन स्वतःच सांगितले की तो नंबर मी तुझ्यासाठी दिलाच नव्हता. मला दुसऱ्या कोणालातरी द्यायचा होता. नील अस बोलला कारण सानवी ने सगळ घरी सांगितले होत. तो अस बोलला असला तरी सानवीला खात्री होती कीतो नंबर तिच्या साठीच होता. नीलच्या अश्या बोलण्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे तिला समजले नाही आणि तिने तसाच फोन ठेवून दिला.
आता यापुढे ही लव्हस्टोरी काय वळण घेते हे पाहुयात पुढील भागात..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा