यानंतर असेच काही दिवस निघून गेले. एक दिवस ताईच्या नंबर वरून म्हणजेच नीलच्या बहिणीच्या नंबर वरून सानवीला मेसेज आला. सानवीने रिप्लाय दिला. सानवीला अंदाज होताच की हा मेसेज कोणी केला असेल. तिनं ते क्राँसचेक करून पाहिलं. तर ते मेसेजेस नील करत होता. असेच रोज मेसेज आणि
एकमेकांना पहात काळ चालला होता, सानवीला समजले की नीलची तब्येत बरी नाही, हे समजताच ती त्याला पहायला दवाखान्यात गेली. तिथे गेल्यावर तिने पाहिले की त्याला साधा ताप आला आहे. पण भेटायला मात्र बरेच लोक आले आहेत. तिला काळजी वाटत होती. ती त्याला पाहून निघून गेली.
दोघांना एकमेकांबद्दल खुप वाटत होते. पण सानवीने घरी सांगितल्यामुळे नील ला वाटले की सानवीला फक्त मैत्री ठेवायची आहे. तर सानवी ला वाटले की तो चिडला असेल.
अशातच तिची दहावीची परिक्षा जवळ आली. आता दोघे खुलेपणाने फोनवर बोलु लागले होते, म्हणजेच एकमेकांनी आपले नंबर एक्सचेंज केले होते. यासोबत ती तिचा अभ्यास पण उत्तम रित्या करत होती. आता नकळत तो तिच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनत चालला होता. नील रोज तिच्या पेपर वेळी परिक्षा केंद्रावर असे तर पेपर सुटल्यावर घराच्या दारात, पण समोरासमोर ते कधीच बोलले नव्हते, कारण कोणीतरी पाहिले तर गैर अर्थ निघेल अशी भिती होती दोघांना. आता पेपर संपले आणि ती सुट्टी साठी मामाकडे गेली.नेहमी तिला मामाकडे करमत असे, कधीच सुट्टी संपुच नये अस वाटे. यावेळी मात्र परिस्थिती वेगळी होती, आणि का नसेल दिल का मामला था भाई. त्यामुळे तीन महिन्याचा मुक्काम यंदा पंधरा दिवसांत आटोपला होता.गावी परत आल्यावर ती खुश होती, ते दोघे भीतीने कधी भेटले नाहीत, परंतु रोजचा फोन कधी चुकला नाही. आणि पाहण्यासाठी एकदोन रोजच्या फेर्या ठरलेल्या असायच्या. आता हे सगळं जे सुरु होत ते त्या दोघांसाठी फक्त मैत्रीच नात होत. होत म्हणण्यापेक्षा त्यांना वाटत होतं. पण आजुबाजूला असलेल्यांना फक्त मैत्री नाही हे समजत होत. पण या दोन बुद्धू लोकांना कोण समजवणार ?
यानंतर दहावी चा निकाल लागला आणि ती चांगल्या गुणांनी पास झाली. तो निकाल देखील त्यानेच तिला कळवला होता. आवडत्या व्यक्तीने अपेक्षित निकाल सांगितल्याने सानवी खूश होती. अश्याप्रकारे नेहमीच दोघे काही तरी करत असत ज्यामुळे दुसरा आनंदी होईल.
यामध्ये सानवी पुढे होती, नीलच्या आवडी जाणून घेऊन ती तस राहण्याचा नेहमी प्रयत्न करे. याउलट तो वयाने मोठा असल्याने तिच्या सारखा बालिशपणा न करता तिला चार चांगल्या गोष्टी सांगत असे.
अचानक एकदिवस मात्र ती खुप उदास होती. कारण तिच्या बाबांना बदलीचं पत्र आल होत आणि हे तिनं नीलला सांगितलं
आता सानवी गाव सोडून जाणार का?त्यांच प्रेम कस फुलणार हे पाहुयात पुढील भागात
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा