तिने नीलला बदली बद्दल सांगितले आणि पुढील शिक्षणासाठी ती दुसऱ्या गावाला शिफ्ट झाली. दोघांची ईच्छा नसताना सुध्दा तिला जाव लागल. यानंतर नील त्याच्या शिक्षणासाठी मुंबईला गेला. यानंतर दोघेही आपल्या कामात असल्याने वेळ मिळत नव्हता. त्यामुळे लाँग डिस्टंस असणार नखत आता आणखीनच लाँगगगग झालं. जास्त बोलण होईना.
या काळामध्ये राधा नावाची मुलगी नीलच्या आयुष्यात आली आणि नील तिच्यावर वेड्यासारखा प्रेम करु लागला. यासगळ्यामुळे सानवी मात्र नील पासून थोडी लांब गेली. पण तिच प्रेम मात्र तसूभरही कमी झाल नाही.. कारण तिच पहिल प्रेम होत ते. तसही सानवीची नील कडून काहीच अपेक्षा नव्हती. तिचा चांगला मित्र नील आहे यातच ती खूश होती. थोडस वाईट वाटत होत तिला कारण आतापर्यंत तिच्या मनात काय आहे हे ती व्यक्त करु शकली नव्हती , तीची प्रीत अव्यक्तच राहिली होती. या सगळ्यामुळे तिने स्वतःला आणखी अभ्यासात झोकून दिले. इकडे नील मात्र राधाच्या प्रेमात गुरफटत चालला होता.काँलेज एक असल्याने फिरण, पिक्चर ला जाण हे तर नेहमीच झालेल, त्यासोबत तिला छान छान गिफ्ट देत होता.यानंतर दोघांनी छान काँलेज पुर्ण केले, यानंतर नील छान ठिकाणी नोकरीला लागला आणि राधा तिच्या गावी परत गेली. कारण ती तिच्या शिक्षणासाठी तर शहरात आली होती. राधाच गाव दीड-दोनशे किलोमीटर लांब होत तरीही नील राधा साठी एवढ्या दुरवर जात असे.
आता नील देखील छान सेटल झाला होता. त्यामुळे त्याने राधासोबत लग्न करायचे ठरवलं. सानवीला हे माहित होत आणि त्याची मैत्रीण म्हणून ती खूश होती.नील ने ठरवल्याप्रमाणे राधा बाबत सर्व घरी सांगितले. घरातल्यांचा या गोष्टीला विरोध नव्हता. कारण राधा होतीच तशी सुंदर. पण सौंदर्याला अविचाराचा शाप म्हणतात तस राधाच्या मनात काही वेगळच सुरु होत.
आता राधाच्या मनात काय आहे? आणि नील नेमका कोणाचा होणार हे पाहुयात पुढील भागात
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा