रेशीमगाठ भाग ९ अंतिम भाग

This last part of this story . Swati accept her marriage and both happily go for honeymoon trip

                                      रेशीमगाठ भाग ९

क्रमश: भाग ८

ग्रीटिंग कार्ड पण खूप सुंदर  होते .. समर ने पहिले आणि संपूर्ण  कार्ड आणि तो कार्ड वरचा  मजकूर पुन्हा पुन्हा वाचला .. एकदा नाही अनेकदा वाचला .. अखेर हे सगळं ऐकण्यासाठी समर चे कान  तरसले  होते . समर ला काय बोलावे ते क्षण भर काही सुचत नव्हते . त्याच्या डोळ्याच्या  कडा आपोआप ओलावल्या .. ते आनंदाश्रू होते . एक मिनिट समर शांत पणे बेड वर बसला .. यावर काय रिऍअक्शन द्यावी हे त्याला कळतच नव्हते ..

आनंद तर झालाय पण हा आनंद जास्त काळ टिकेल का ? स्वाती चे मन उद्या बदलले तर .. शिवाय प्रेम हे कोणत्याही अटी वर नसते . हे तिला अजून तरी कळलंय कि नाही काय माहित ? मला सुखी संसार करायचाय .. माझ्या आई बाबांसारखा .. त्याला मी लॉन्ग टर्म रिलेशन म्हणतो .. ह्या साठी स्वाती तयार  आहे का ? असे अनेक प्रश्न समर च्या डोक्यात येऊ लागले .

समर स्वाती जवळ गेला "अरे वाह.. खूप छान ग्रीटिंग कार्ड आहे .. आणि त्या वर लिहिलेले पण खूप छान आहे .. फायनली माझी मैत्रीण माझी बायको बनली च "

स्वाती "हो .. समर तूला मीआवड्ते ना .. हे पण माझ्यासाठी जाणून घेणे फार महत्वाचे आहे..

समर "अजून तुला हे कळले नाही का ? "

स्वाती "नाही तू कुठे मला काही बोललास ?"

समर "सगळ्या गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात .. काहीवेळा कृती मधून सुद्धा सिद्ध होतात .

स्वाती "हो ते तर आहेच म्हणून तर हि कृती मी आज केलीय .. "

आणि बोलता बोलता स्वाती उभी राहते

समर  ढोपरांवर बसतो आणि तेच लाल फुल स्वातीला देतो आणि ऑफिशिअली प्रोपोझ करतो . "आय लव यु  स्वाती ..

स्वाती पण खूप खुश होते “ एस “ आणि त्याच्या बरोबर खाली बसते .. आणि दोघे एकमेकांशी प्रेमाच्या आणा भाका घेऊ लागले .

दोघे एकमेकांना सांगू लागले कि माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ...

त्या रात्री दोघांनी जमिनी वर बसून खूप साऱ्या गप्पा मारल्या .. इतक्या गप्पा मारल्या कि ती रात्र त्यांना कमी पडली . सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा  सकाळी जमिनीवरच झोपले  होते.

खऱ्या नात्यामध्ये असेच असते . इथे ना सोफा हरला ना बेड जिंकला . दोघांना एकमेकांच्या मनाचा ठाव घेण्यासाठी स्वतःची जागा सोडायला लागली . हि जागा म्हणजे अहंकार .. जो कि सुप्तपणे आपली मनात आणि विचारात वावरत असतो ..” मला अहंकार नाही “या वाक्या मध्ये पण एक अहंकार असतो . हाच अहंकार जेव्हा हरतो तेव्हा त्याची जागा प्रेम घेते .. प्रतेय्क व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी प्रेमात पडावे , प्रेम माणसाला चांगला माणूस बनवते . राग द्वेष, आणि अहंकाराला समूळ नष्ट करते .

स्वाती आणि समर आज खरे मनाने एकत्र आले होते आणि जेव्हा कोणी मनाने एकत्र येतात तेव्हा " ये तो फेविकॉल का जोड होता है टुटेगा नही "

दुसऱ्या दिवशी सकाळी उठतात ते वेगळ्याच गडबडीत आज त्यांची रात्री फ्लाईट आहे .. इंटरनॅशनल  फ्लाईट साठी आधी २ तासाचा प्रवास आहे .. सगळी तयारी आधीच झालेली होती तरी पण प्रवास जवळ आला कि खूप प्रेशर यायला लागते . काही महत्वाचे राहायला नको .. प्रवासात काही अडचण नको यायला अशा विचार सुरु होतात .

आज समर खूप गडबडीत होता .. सारखे सारखे त्यांचे दोघांचे पासपोर्ट चेक करायचा. टिकेट्स चेक करायचा .. नाही म्हटले तरी स्वातीची जवाबदारी आता त्याच्यावर होती .. स्वाती तशी काही त्याच्यावर डिपेंडेंट नव्हती  . तरी पण पुरुष म्हणून काही वेगळ्या जवाबदाऱ्या ह्या नवऱ्या वर येतातच ...

राहून राहून स्वातीचे एक वाक्य त्याला सारखे आठवत होते जे कि ती रात्री त्याला बोलली होती .

ती बोलली होती " समर माझे तुझ्यावर प्रेम आहे हे तर नक्कीच आहे पण तरीही सोफ्या पासून बेड पर्यंतचा प्रवास माझ्यासाठी  कदाचित कठीण असेल   आणि दुसरा एक मुद्दा अजून त्याच्या डोक्यातून जात नव्हता जो कि त्याने तिला बोलून दिला नव्हता .. ती त्यांच्या रूम विषयी काहीतरी बोलणार होती . ते हि तिचे बोलणे राहिलेचं होते .

काही नाही समर ने आजच्या आज काही गोष्टी तिच्याशी बोलून क्लिअर करायच्या ठरवल्या . आज संध्याकाळी ५ वाजता ते दोघे घरातून निघणार होते . आणि त्या आधीच या गोष्टी तिला विचाराच्या असे सारखे समर ला वाटत होते . पण आज वेळ मिळेल का ?का जाताना रस्त्यात विचारू ? नको पुन्हा मॅडम चा मूड  गेला तर सगळी युरोप ट्रिप ची वाट लागेल .

सध्या काय होईल ते बघू ..

शेवटी दुपारी स्वातीने जेवण झाल्यावर तोंडाला फेस पॅक लावला होता तेव्हा समर ने विषय छेडला

समर " स्वाती .. काल तू आपली रूम विषयी काही तरी बोलत होतीस .. ते काय ग .. तो विषय राहूनच गेला नाही का ?"

स्वाती " अरे हो ना .. काल' रात्री पण आपण एवढ्या गप्पा मारल्या पण तो विषय बोलायच राहिलाच नाही का ?"जाऊ दे पण आता आपण युरोप ट्रिप वरून आल्यावर बोलू या विषयावर . "

समर " नाही आता काही काम नाहीये ... आता सांगू शकतेस .. आता च सांग ना मला बरं वाटेल .. म्हणजे मी तुला काल बोलता बोलता थाम्बवले होते ना म्हणून म्हणतोय मी "

स्वाती " ठीक आहे मी हा फेस पॅक वॉश केला कि सांगते .

समर च्या डोक्यात पुन्हा विचार चक्र चालू झाले .. जर हिने हे घर बदलायचे असा काही विषय काढला तर माझा स्टॅन्ड काय असला पाहिजे .. किंवा हा विचार चुकीचा आहे हे मी हिला कसे समजावू ?तिचे मन न मोडता हा तिचा विचार कसा तिला बदलायला लावायचा ? असे विचार करत करत त्याला एकदम झोप लागली ..

तोपर्यंत स्वाती तिचा फेस पॅक वॉश करून पुन्हा बोलायला आली बघते तर समर ला झोप लागलीय .. तिला पण तो विषय पूर्ण करायचा होता .. पण आता हा झोपला .. त्याची झोप मोडून त्याला उठवायला तिचे मन होईना .. बोल बोलता .. संध्याकाळचे ४ वाजले .. शेवटी तिने समर ला हाक मारलीच "समर उठ चार वाजले .. आपल्याला  ५ वाजता निघायचंय ना .

तसा  समर ताडकन उठला.. " अरे मला चांगलीच झोप लागली .. आपले बोलणे अर्धवटच राहिले "

स्वाती " हो ना .. ठीक आहे आता मग आपण युरोप ट्रिप वरून आल्यावरच बोलू "

समर " नको जाताना गाडीत बसल्यावर बोलू .. "

स्वाती " बघु”

स्वाती पण तिचे आवरून घेते आणि आई बाबांना फोन करून घेते

स्वाती " आई आज आम्ही  निघालोय .. आता  ९ दिवसांनी येऊ ..

आई " हो ठीक आहे बाळा .. तुम्ही दोघांनी एकमेकांची  काळजी घ्या .. प्रवास व्यवस्थित करा ."

स्वाती " हो आई .. "

आई " स्वाती एक विचारू का ? तू या ट्रिप साठी तुझ्या मनाने तयार आहेस ना बाळा ?"

स्वाती " हो म्हणजे काय ? नक्कीच .. तुला माहितेय  मी माझ्या मनाविरुद्ध'तसेही काहीच करत नाही "

आई " चला म्हणजे , माझी काळजी मिटली "

स्वाती " खरं तर आई , आधी मी या सगळ्या गोष्टींसाठी अजिबात तयार नव्हते .. आणि मी तसे समर  ला सांगितले पण होते "

आई " अगो बाई हो का ? मग काय म्हणले जावई "

स्वाती " आई अग तो खूपच चांगला मुलगा आहे .. माझे सगळे टँट्रम्स त्याने हसत हसत सहन केले .. पण फायनली मला तो आवडायला लागलाय .

आज स्वाती  तिच्या आई शी मॆत्रिणी सारख्या गप्पा मारत होती  .. तश्या त्या आधी पासूनच मैत्रिणी होत्या पण मध्यतंरी लग्ना मुळे  स्वाती वैतागली होती आई बाबांवर म्हणून बोलत नव्हती . पण आज ती खूप खुश होती उलट आई बाबांना मनोमन धन्यवाद देत होती ..

आई " खरच  ग बाई हिरा आहे तो हिरा .."

स्वाती " आई तू बाबांना सांगशील का कि स्वाती खूप खुश आहे .. काही काळजी करू नका .. "

आई " हो बाळा नक्कीच सांगते .. आणि तुम्ही व्यवस्थित जा .. तिकडे जरा शिस्तीतच  रहा काय ?"

स्वाती " हो "

आई " हैप्पी जर्नी "

स्वाती " थँक यु .. बाय "

समर आणि स्वाती आवरून बॅगा बाहेर घेऊन आले .. आई आणि बाबा पण त्यांना सारख्या सूचना देत होते.. दोघेही ऐकून देत होते ..

समर च्या आई ने स्वाती ला मिठी मारली .. स्वातीने पण त्यांना आणि बाबांना वाकून नमस्कार केला .. आई बाबांचे डोळे पाणावले ..

बाबा " आता आम्हाला दोघांना घर खायला येईल .. "

समर " बाबा फक्त ८ दिवसाचं जातोय .. असे निघून जातील "

आणि दोघेही घराबाहेर पडले . एअरपोर्ट पर्यंत जायला टॅक्सी केली होती .. त्यात सामान भरले .. टॅक्सी जाई पर्यंत आई आणि बाबा टाटा करत होते .

शहराच्या  बाहेर पडल्यावर हायवे  ला लागल्यावर समर ने विषय काढलाच            

समर " हा बोल.. काय म्हणत होतीस .. रूम विषयी "

स्वाती " अरे हा मी म्हणत होते कि .. आपली  रूम  तशी लहान आहे ना .. "

समर " एवढी पण नाही काही .. पण दोघांना पुरेशी आहे ग "

स्वाती " हो ऐक ना .. तरी पण लहानच आहे ..

समर " मग काय म्हणणं काय तुझं ?

स्वाती " तेच तर सांगते  रूम लहान आहे ना तर तिथली काहीतरी गर्दी कमी करावी लागेलं "

समर " ठीक आहे मग एक कपाट आणि ती एक्सट्रा खुर्ची आहे ती काढू बाहेर "

स्वाती " नको कपाट तर लागेलच ना .. तुला एक आणि मला एक "

समर जरा वैतागतो " मग काय ?"

स्वाती " मग सोफा बाहेर काढला तर ?"

समर च्या लक्षात येत नाही पटकन

समर " सोफा कसा काढणार ? मग तू कुठे झोपशील ?खाली ?"

स्वाती त्याच्या कडे बघून हसते आणि स्वतःच्या डोक्यावर हात मारते

स्वाती " बुद्धू "

तेवढ्यात समर ची ट्यूब पेटते ..

समर " ओह आय गॉट इट "

समर ने स्वातीचा  हात हातात घेतला आणि दोघे एकमेकांकडे बघून खूप हसतात .

आणि अशा पद्धतीने समर आणि स्वाती नुसत्या युरोप ट्रिप ला नाही बरं का .. ते हनिमून ट्रिप ला आनंदाने  जातात ..

देवाने लग्नाच्या गाठी बरोबर बांधलेल्या असतात ..फक्त हे प्रश्न समर सारखे हळूवार  सोडवायचे असतात म्हणजे म्हणजे त्याचा गुंता न होता रेशीमगाठ बनते.

        समाप्त !!!!!

🎭 Series Post

View all