Login

रेसिपी इन मराठी रताळ्याची कचोरी

रताळ्याची कचोरी
रताळ्याची कचोरी

साहित्य:-

दोन उकडून कुस्करलेले घेतलेले रताळे,
एक वाटी भगरीचे पीठ,
चवीपुरते मीठ,
तळण्यासाठी तूप.

सारण:

१वाटी ताजा खवलेला नारळ,
३-४ हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेल्या,
१/२ टीस्पून जिरे आवडीनुसार,
एक चमचा तीळ,
चवीपुरते मीठ,
मनूके १० -१२,
१ चमचा साखर आवडीनुसार .

कृती:

१) प्रथम रताळे उकडून घ्यावे आणि ते सोलून घ्यावे.

२)उकडलेले रताळे बाऊल मध्ये घेऊन कुस्करावे.

३)मीठ आणि भगरीचे पीठ घालून त्याचा जाडसर गोळा बनवावा.

४)कढईत तूप गरम करावे. त्यात जिरे, हिरवी मिरची,मनूके आणि नारळ घालावा. मीठ आणि थोडीशी साखरही घालावी. नीट परतून कोरडे सारण तयार करावे.

५)मळलेल्या पीठाचे छोटे छोटे गोळे बनवावे.

६) त्यात पुराणासारखे एक चमचा सारण घालून गोल कचोरी बनवावी अशाप्रकारे सर्व कचोऱ्या बनवाव्यात.

७)कचोऱ्या मध्यम आचेवर तुपात तळाव्यात.

८)कचोऱ्या सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्याव्यात

९)दही सोबत ,चटणी बरोबर सर्व्ह कराव्यात.