एका मोठ्या शहरातल्या रेस्टॉरंट पुढे उभी भानू राहून आतली लगबग पाहत होती. पिवळ्या रंगाने रंगवलेली मोठी इमारत दिमाखात उभी होती. आत जितके टेबल्स होते, तितकेच बाहेर मांडून ठेवले होते. एकसारखे कपडे घातलेले वेटर्स ऑर्डर द्यायला आणि घ्यायला या टेबलावरून, त्या टेबलावर अक्षरशः पळत होते. निरनिराळ्या, वेगवेगळ्या वेषातली हरतऱ्हेची माणसं ये -जा करत होती. कोणी निवांत बसून चहा पित होतं तर कोणी गडबडीने नाश्ता करत होतं. मधूनच हसण्याचे, बोलण्याचे आवाज ऐकू येत तर शांत एकट्या बसलेल्या व्यक्ती समोर दिसणारा महासागर बघत आपल्याच तंद्रीत रमल्या होत्या.
"आपल्याला इथं यायला जमेल का? चमचमीत खाणं, कडक चहा अन् कॉफी. जे परदेशी पदार्थ..ज्यांची नावंही घेता येत नाहीत. ते खायला मिळतील? हे तर श्रीमंत माणसांचं काम! चार घरची कामं करून जगणाऱ्याला असले शौक परवडत नाहीत. पण एक दिवस असा नक्की येईल. मी मानाने त्या हॉटेलमध्ये जाईन." ती एकटीच बडबड करत होती.
"ए भानू, आत येती का?" कोपऱ्यावरचा राजा उसळणाऱ्या लाटा बघत भिंतीवर बसला होता.
"चल, तुझी लायकी तरी आहे का?" ती तोऱ्यात म्हणाली.
"ए, लायकी काढायचं काम नाय हं." तो तिच्या पुढ्यात उभा राहिला. डोक्याला बांधलेला रुमाल, बटणं उघडी असलेला शर्ट आणि पायात महागडी जीन्स. त्याला असं पाहून भानू चलबिचल झाली. चांगल्या घरातला मुलगा होता तो. शिकला सावरला, पण काम -धंदा शून्य.
"तुझ्यापेक्षा मी बरी. निदान कमवून तरी खाते अन् शिकते सुद्धा." इतक्यात भानूची मैत्रीण आली आणि दोघी निघून गेल्या. राजा मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला.
"तुझ्यापेक्षा मी बरी. निदान कमवून तरी खाते अन् शिकते सुद्धा." इतक्यात भानूची मैत्रीण आली आणि दोघी निघून गेल्या. राजा मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला.
अस्वस्थ मनाने तो तसाच समुद्राकडे गेला. उसळणाऱ्या लाटा अंगावर घेत भानूच्या बरोबरीने चालत राहिला. ती रस्त्यावरून चालत होती आणि हा वाळूत पाय ओढत जात होता. 'बऱ्याच दिवसांपासून भानू आवडते आपल्याला. पण सांगायची हिंमतच होत नाही. गोरा रंग, हरिणीसारखे डोळे, चाफेकळी नाक, तरतरीत चाल अन् चेहऱ्यावर एक प्रकारचा नखरा. घरची परिस्थिती बेताची म्हणून ही असली कामं करते. पण आज तिनं माझी लायकी काढली! काय तिची हिंमत?' राजाच्या मुठी आवळल्या गेल्या. त्याची पावले घराकडे वळली. 'घरी जाऊन तरी काय करायचं? विचारणारं कोण आहे?' तो तडक समोरच्या रेस्टॉरंटकडे वळला.
"भानू, आज मालकीण बाईंच्या घरी पार्टी आहे म्हणे! आपल्याला तिथून निघायला उशीर होणार." मैत्रीण आठवण करत म्हणाली.
"हम्म. म्हणजे आज खूप काम असणार. आताशी मला हे सगळं करायचा कंटाळा येतो. खूप अभ्यास करावा वाटतो अन् शिकून नोकरी करावीशी वाटते." मालकीण बाईंचं घर आलं. तशा दोघी आत शिरल्या. बरेच पाहुणे जमले होते. रोषणाई करण्यात आली होती. हॉलभर केलेलं फुलांचं डेकोरेशन उठून दिसत होतं. मंद संगीताची धून वातावरण निर्मिती करत होती. त्या तालावर नृत्य सुरू होतं तर काहीजण खाण्याचा आस्वाद घेत होते. लहान मुलं दंगा -मस्ती करत होती.
दोघी लवकरच त्या वातावरणाशी एकरूप झाल्या. बाई सांगतील तशी पटापट कामं करायला लागल्या. मधेच उगीचच भानूला राजाची आठवण आली. उंचपुरा, सावळा, करड्या डोळ्यांचा राजा तिला अचानक 'आपला ' वाटायला लागला. तशी ती लाजली.

"काय झालं?"
"कुठं काय? चल. आवरून घरी जाऊ." भानू मैत्रिणीची नजर चुकवत म्हणाली.
पार्टी संपली. येताना भानूची नजर राजाला शोधत होती. नेहमीप्रमाणेच तो कट्ट्यावर बसला असेल असं समजून ती काही क्षण तिथं घुटमळली. "तो नाहीय इथं." मैत्रीण हसत म्हणाली. तशी भानू पुन्हा एकदा लाजली. तिची नजर समोरच्या रेस्टॉरंटकडे गेली. तिथं अजूनही गर्दी होती.
दिवस पळत होते. भानू रोजच्या वाटेने कामाला जात होती. पण राजाचं दर्शन काही होत नव्हतं. ती मात्र अस्वस्थ होत होती.
"त्याची सवय झाली होती ग. असा अचानक कुठं गायब झाला असेल?" भानू मैत्रिणीला म्हणाली. "एखाद्याचं असणं आपल्यासाठी खूप खास असतं. हे केव्हा लक्षात येत? जेव्हा ती व्यक्ती अचानक नाहीशी होते तेव्हा."
महिना होत आला. पण राजा आलाच नव्हता. भानूचं शेवटचं वर्ष होतं. परीक्षा पार पडली. मालकीण बाईंची तिचा पगार वाढवला.
भानू राजाला विसरली नव्हती. मैत्रिणीला भेटायच्या बहाण्याने कधीतरी समुद्रकिनाऱ्याच्या कट्ट्यावर बसून त्याची वाट बघत राहायची. एक प्रकारची उदासीनता तिच्या डोळ्यांत दिसायची. मराठीच्या कवितेत 'विरह' हा शब्द अनेकदा आला होता. आता त्याचा अर्थ तिला कळला होता.

एक दिवस अचानक सुटा-बुटातला राजा भानू समोर आला.
"तू आलास? आणि कसला भारी दिसतोयस!" भानू उत्साहाच्या भरात बोलून गेली. त्याला पाहून तिचा दांडगा आनंद गगनात मावत नव्हता. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य, समाधान, राग, रुसवा सगळं दाटून आलं. "नोकरी करतोस?" तिने डोळे बारीक करत प्रश्न केला.
"आत येतेस का?" त्याने समोरच्या रेस्टॉरंटकडे बघून तिला रीतसर विचारलं. अर्थातच भानूला नाही म्हणता आलं नाही. त्याच्या मागोमाग ती आत शिरली.
"काय खाणार?"
"काय खाणार?"
"वडा पाव."
"तो तर कुठंही मिळतो." असं म्हणत राजाने पिझ्झा मागवला.
"पण मला हे परवडत नाही रे." तिचं ऐकून न ऐकल्यासारखं करत त्याने दोन कॉफीची ऑर्डर दिली.
"येस सर.." वेटर येऊन पुन्हा ऑर्डर घेऊन गेला.
"येस सर.." वेटर येऊन पुन्हा ऑर्डर घेऊन गेला.
"राजा, माझ्याकडे इतके पैसे शिल्लक नाहीयत." भानू रडवेली झाली. "मी आहे ना? का इतकी काळजी करतेस?" राजाचं बोलणं सुधारलं होतं. येता -जाता बाकीचे वेटर त्याच्याकडे पाहून हसत होते. त्याला मान देत होते. इतके दिवस बाहेरून दिसणारं हे रेस्टॉरंट नुसतं बघूनच भानूला समाधान वाटलं होतं. ती नुसती इकडे -तिकडे बघत होती.
"सर, तुमची ऑर्डर." मगाचसा वेटर येऊन गेला.
"तुला इथं सगळे कसे काय ओळखतात?"
"मी इथं काम करतो. सुरुवातीला काही दिवस वेटरचं काम केलं. मग कामाचा सपाटा पाहून मालकाने एकदम मॅनेजरच्या पोस्टला बसवलं. मागं तू माझा अपमान केलास तेव्हा मी तुझा बदला घेणार होतो. जरा विचार केला, बदला घेऊन तू माझ्यापासून कायमची दूर गेली असतीस.
भानू, मला तू आवडतेस. पण तुझं माझ्यासाठी व्याकुळ होणं, माझी वाट पाहणं, माझ्या आठवणीत रमून जाणं हे सगळं तुझ्या मैत्रिणीकडून समजलं. म्हणजे माझ्या मनात जे होतं तेच तुझ्या मनात होतं तर.. मग ठरवलं, तुला मनाने इथं घेऊन यायचं. इथं येण्याचं तुझं स्वप्न पूर्ण करायचं.
तुला मी दिसत नसलो तरी मी मात्र रोज तुला बघत होतो." भानू आश्चर्याने राजाकडे बघत होती. लाजेने ती अजूनच लाल झाली. "राजा.. हे सगळं जरा जास्तच होतंय."

"तुझ्या सुखासाठी सगळं काही करेन मी. माझ्या आईला केव्हाच सांगितलंय. लग्न करेन तर फक्त तुझ्याशीच करेन म्हणून. या राजाची राणी होशील?" जागेवरून उभा राहत हात पुढे करत राजा थाटात म्हणाला.
तशी भानूही उभी राहिली. नकळत तिने आपला हात त्याच्या हातात दिला. एकमेकांच्या स्पर्शाने दोघेही शहारले. रेस्टॉरंटचा स्टाफ टाळ्या वाजवत होता अन् भानू अन् राजा एकमेकांच्या प्रेमात बुडून गेले..अगदी आकंठ!
तशी भानूही उभी राहिली. नकळत तिने आपला हात त्याच्या हातात दिला. एकमेकांच्या स्पर्शाने दोघेही शहारले. रेस्टॉरंटचा स्टाफ टाळ्या वाजवत होता अन् भानू अन् राजा एकमेकांच्या प्रेमात बुडून गेले..अगदी आकंठ!
समाप्त.
©️®️सायली डी जोशी.
©️®️सायली डी जोशी.