“माझ्या मिस्टरांनी लोकांच्या सेवेसाठी हे हॉस्पिटल चालु केल होत, ह्याचा अर्धा खर्च त्यांनी साठविलेल्या पैशातून होतो, अर्धा सरकार करते, मग तुम्हाला काय प्रोब्लेम आहे??” छायाताई चिडून बोलतात.
“हे बघा ताई, आता सरकार काय आपल राहील नाही, त्यामुळे त्यांना काही दिल्या शिवाय ते आपल्याला काही देणार नाही, आणि ह्या हॉस्पिटलच खाजगीकरण केल तरच बाकीचे पैशांची मदत करायला तयार आहेत न” राव छायाताईंना ना समजविण्याचा प्रयत्न करतात.
“पैसा त्यांना पाहीजे का तुम्हाला??” छायाताई आता मुळ मुद्यावर येतात.
“काय म्हणायचे काय आहे तुम्हाला, आम्ही काय पैसे खातो का इथे, हे बर आहे आम्ही मदत म्हणून उपाय सांगतोय तर आमच्यावरच आरोप करत आहेत, उद्या जेव्हा ह्या हॉस्पिटलच ची बोली लागेल न तेव्हा नका बोलु मग काही” पाटकर
“बोली कसली बोली?? छायाताई
“सध्या उधारीवर चालु आहे न हॉस्पिटल, त्यांचे पैसे सरकारने दिले नाही तर ते तुमच्या कडुन ह्या हॉस्पिटलकडुनच वसुल करतील न??” राव कुत्सित हसतात.
“म्हणजे सगळ तुम्ही ठरवले म्हणा न” छायाताई स्वतः च्या असहायतेवर हसतात.
वात्सल्य या धर्मदाय हॉस्पिटल च्या मिटींग रूममध्ये मिटींग चालली होती. मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या या हॉस्पिटल च्या जागेवर ब-याच जणांचा डोळा होता. पण ते धर्मदाय असल्याने सामान्य जनतेला ते आधार होते. त्यामुळे ते डायरेक्ट बंद करता येत नव्हते जनमानसात आक्रोश झाला असता मग त्यांनी त्याचे खाजगीकरण करण्याचे प्रयत्न सुरू केले.
“एक कृपा करा, ही बातमी बाहेर न्युज ला जाउ देउ नका, हे या हॉस्पिटल साठी आणि तुमच्यासाठी चांगल राहील, कारण त्याला जर कळल की त्याच्या वडीलांच्या स्वप्नांना कोणी सुरूंग लावतोय, तो बरबाद करून टाकले सगळ्यांना” छायाताई
“आम्ही आमच बघुन घेउ तुम्ही फक्त तुम्हाला सांभाळा” वंदना टोमणा मारुन जाते.
दुसऱ्या च दिवशी त्या हॉस्पिटची बातमी झळकते. वात्सल्य हॉस्पिटल खाजगीकरणाच्या मार्गावर.
छाया ताई तो पेपर घेउन देवाला होत जोडुन उभ्या राहतात, “निदान पेपरमधली बातमी बघुन तरी ये श्री, तुझी गरज आहे”
त्यांनी मुद्दाम न्यूजचे सांगीतलेले असते, किमान त्याच्या पर्यंत बातमी पोहोचली तर तो या हॉस्पिटल साठी तरी येईल.
आठ दिवसांनी हॉस्पिटल च्या सदस्यांची मिटींग भरते. खाजगीकरणाच्या मुद्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी.
राव आणि पाटकरांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. जो जास्त वेळ टिकला नाही.
त्यांना पाठींबा दर्शवणारी मंडळी आज छायाताईंच्या मागे उभी राहीली.
राव, पाटकर आणि वंदना च्या ऑफीसेसवर इनकम टॅक्स ची रेड पडली. त्यांचे अकाउंट सील करण्यात आले. जे अजुनही ह्या तिघांना पाठींबा दर्शवत होते त्यांच्यावर जुने गुन्हे काढुन त्या केसेस रिओपन झाल्या.
छाया ताईंनी समाधानाने डोळे मिटले, “आलाय तो, बोलली होती न, त्याला कळल तर बरबाद करून टाकेन सगळ्यांना”
कालपर्यंत कुत्सितपणे हसणारा राव आता तोंडात बोट घालुन बसले होते.
इतक्या वर्षांनी आज पहील्यांदा त्याने त्या हॉस्पिटल मध्ये पाय ठेवला.
तो श्रीरंग देशमुख त्याच्या वडीलांनी दुसरा लग्न केल्यापासून तो त्यांच घर सोडून गेला होता. त्याने फक्त छाया ताई चे वडील आणि त्याचे वडील यांच्यातला पैशांचा व्यवहार पाहीला होता. त्याला वाटत होत की छायाताईंनी फक्त पैशांसाठी त्याच्या वडीलांशी लग्न केल आहे, म्हणून तो त्यांचा राग राग करायचा. तो जरी लांब असला तरी त्याने त्या हॉस्पिटल मधली सगळी माहिती ठेवली होती. त्याने न्युज बघीतली त्याने त्याची पावल उचलायला सुरवात केली.
“श्री हे पेपर्स घे आणि मला मोकळी कर, आता नाही झेपत हे” छाया ताईंनी त्या हॉस्पिटल ची, बाकी संपत्ती ची कागद त्याच्या हातात दिली.
“काय आहे हे” श्रीरंग अजुन रागात होता.
“तु येईपर्यंत ह्या संपत्तीच्या हॉस्पिटल च्या अटोर्नी होल्डर होत्या. तुला सगळ सोपवल की त्या त्यांच्या जबाबदारीतून मोकळ्या” वकील.
श्रीरंगला शॉक बसला.
“तुझ्या बाबांनी हे सगळ कधीच तुझ्या नावे केल होत. तु येईपर्यंत मला सांभाळायच होत. माझ्या बाबांनी या हॉस्पिटल साठी पैसे देण्याची अट ठेवली होती की माझ्याशी लग्न करावे. तुझ्या बाबांनी पण या हॉस्पिटल साठी ते केल, बाकी आमच लग्न म्हणजे फक्त एक डिल होत. तु परत आला की मी रिटायर्ड मेंट घ्यायची” छाया ताईंनी हलकेच डोळे पुसले.
श्रीरंगचा झालेला गैरसमज आता दुर झाला होता.
“हे तुझ तु संभाळ आजपासून मी माझी रिटायरमेंट घोषीत करते.” छाया ताई जायला निघतात
“रिटायरमेंट माणसांना असते नात्यांना नाही, हे बाबांचे शब्द आहेत न?? श्रीरंग.
छायाताईंची पावल थांबतात.
“आजवर प्रेमाच्या छायेखाली हे वात्सल्य उभ केले, या हॉस्पिटल साठी तुम्ही दोघही झिजलात, रक्ताच पाणी करून सामान्य लोकांपर्यंत याची सेवा पुरवली आणि आज म्हणत आहात की मी मोकळी होतेय” श्रीरंग जसजसा बोलतो तसतस छाया ताईंच्या डोळ्यासमोर सगळा इतिहास धावतो.
“रिटायर मेंट अधिकारातून मिळते, मायेतुन नाही, आजही तुमची तुमच्या मायेची तेवढीच गरज आहे, या हॉस्पिटल ला पण आणि मला पण… … … … … आई” श्रीरंग
श्रीरंग च्या मुखातुन आई नाव ऐकताच छाया ताईंचे अश्रुंची वाट मोकळी झाले. लग्न झाल्यापासून त्यांनी ह्या दिवसाची वाट पाहिली होती.
तिकडे श्रीरंच्या अश्रुंचाही बांध फुटला होता. तो छाया ताईंजवळ आला, “एक आईपासून दुरावलोय आता दुसऱ्या आईपासुन लांब नाह व्हायचय”
तिथे उपस्थितांचे डोळे हा पाणावले होते.
“मी इथेच राहील, फक्त सगळ तुझ्या नावावर करुन देइल, तुझ्या बाबांना तस वचन दिल होत मी” छाया ताई
“नकोय काही मला यातल, आजवर जस चालु होते तसेच चालु राहु दे, बाकी नंतर बघता येईल” श्रीरंग ने डोळे पुसले. “महीऩ्याभरात मी भारतात शिफ्ट होतोय, आज हिला तुझ्याकडे सोडतोय, तुझी सुटका नाही आता”
छाया ताईंनी श्रीरंग ने दाखविलेल्या दिशेने पाहील. तिचं एक मुलगी उभी होती, जी ५ महिन्यांची गरोदर होती.
“आज्जी होणार आहेस तु” श्रीरंग ने छाया ताईंच्या कानात हळुच सांगीतल. तसा छाया ताईंचा चेहरा आनंदाने भरला. त्यांच्यात नवीन उत्साह संचारला. त्यांनी प्रेमाने तिला जवळ घेतले.
आज कुठ त्या रिटायरमेंट घेणार होत्या आणि कुठे आता अजुन एक जबाबदारी आनंदाने स्वीकारत होत्या.
खरच रिटायरमेंट माणसांना असते, नात्याला नाही…
समाप्त.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा