Login

सुड.. भाग -4

विजय नेहमीप्रमाणे पिऊन घरी येतो..

भाग - 4


राज्यस्तरीय कथामालिका.

विषय - सामाजिक कथा ( सुड )

जिल्हा - ठाणे



आईला विजयवर शंका येते ती त्याला विचारते, " नक्की काय काम आहे तुझं? "


विजय आईच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचे टाळतो.


आई पुन्हा त्याला विचारते, " अरे बोल की, नक्की काय काम आहे ? "


विजय आईवर चिडत बोलतो, " अगं आई किती प्रश्न विचारशील, आहे काही तरी काम. "


आई पुन्हा त्याला बोलते, " अरे मग काय आहे ते तरी सांग. "


विजय बोलतो, " सगळयांच गोष्टी तुला सांगणं गरजेचं आहे का ? "


आई शांतपणे बोलते, " हो..!"


विजय आईला बोलतो, " तुझ्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाही, चल मी निघतो. आणि प्लीज दहावेळा फोन करू नकोस. "

असं बोलून विजय बॅग घेऊन निघून जातो.


आईला विजयच्या बोलण्याचं जितकं वाईट वाटतं नाही तितकं वाईट त्याच्या झालेल्या परिस्थितीचं वाटतं.

तसं तरं ही परिस्थिती त्याने स्वतःहून ओढवलेली असते.


आई घरात विजयच्या काळजीने कासावीस झालेली असते. आई न राहून रोहिणीला फोन लावते.


रोहिणी म्हणजे विजयची बहीण. रोहिणी कॉल उचलते.


रोहिणी बोलते, " हं आई, बोल कशी आहेस. "

रोहिणी काळजीने आईची विचारपूस करते. आई रोहिणीला भावाच्या ह्या परिस्थितीबद्दल कधीच टेन्शन देत नाही.

आई ला रोहिणीचा आवाज ऐकून रडू येतं.


आई रडत रडत बोलते, " बाळा रोहिणी, तूच आता विजयला समजावं. "


रोहिणी काळजीने विचारते, " का गं आई काय झालं ? आणि कशाबद्दल समजावू, नक्की काय झालं आहे मला स्पष्ट सांग जरा. "


आई तिला शांतपणे सगळी हकीकत सांगते.


रोहिणी आईला शांत करत बोलते, " बरं बरं मी विजयशी बोलते ह्या बाबत. वाटलंच तर मधूला सुद्धा समजावते. "


आई रोहिणीला बोलते, " मधूला समजावण्यापेक्षा तू विजयला समजावं. "


रोहिणी बोलते, " बरं बरं, मी येते घरी, फक्त विजयला सुट्टी कधी असेल ते सांग मला. "


आई बोलते, " त्याला सुट्टी असो किंवा नसो, तो सतत बाहेरच असतो. आताही महत्वाचं काम आहे सांगून तो आजही बाहेर गेलायं. "


रोहिणी बोलते, " बरं बरं तू काळ्जी करू नकोस, मी पाहते काय करायचं ते. " असं बोलून रोहिणी फोन ठेवते.


रोहिणीशी बोलून आईच्या जीवात जीव येतो. निदान बहिणीच्या समजावण्याने तरी विजय ऐकेल आणि मधूचा नाद सोडेल.


रात्र होते. विजय घरी येतो, त्याला पाहताच आईच्या मनात अनेक विचार येतात.

त्याचे कपडे मळलेले असतात, शर्टची इन सुद्धा निघालेली असते.

तो आज ही दारूच्या नशेत असतो. तो घरी येताच स्वतःच्या बेडरूम मध्ये जातो. आई मुकाट्याने विजयचं वागणं पाहत असते.


आई स्वयंपाक घरात जाऊन जेवण गरम करते. एका ताटात जेवण वाढून विजयच्या बेडरूम मध्ये नेऊन देते.


आई बोलते, " आज ही पिऊन आला आहेस ? "


विजय आईच्या चेहऱ्याकडे पाहतो.


आई बोलते, " का पिऊन आला आहेस, हे नाही विचारणार. फक्त इतकंच बोलेन जेवण आणलंय जेवून घे. " असं बोलून आई विजयला ताट देऊन निघून जाते.


विजय मुकाट्याने वाढलेलं जेवण दारूच्या नशेत कसंबसं जेवून घेतो. आई पुन्हा त्याच्या बेडरूम मध्ये येते. आता तिच्या हातात एक ग्लास असतो.


विजय आईला विचारतो, " आता हे काय ? "


आई त्याला बोलते, " लिंबूपाणी आहे, पिऊन घे. नशा उतरेल तुझी."


विजय आईला चिडून बोलतो, " आता हे कशाला ? आणि प्लीज हे असं सारखं सारखं आणून देऊ नकोस. "


आई त्याला काळजीने बोलते, " पिऊन घे !" आणि ग्लास त्याच्यासमोर ठेवते आणि बाहेर जाते.


दुसऱ्या दिवशी सकाळ होते. नेहमीप्रमाणे विजय उठतो. तयार होतो आज त्याची कोर्टची पुन्हा तारीख असते. फ्रेश होऊन तो बाहेर डायनिंग टेबलवर नाश्ता करायला बसतो.


आई त्याच्या पुढ्यात नाश्ता आणून ठेवते.

विजय नाश्ता पाहून आईला बोलतो, " हे काय आज पोहे ? "


आई बोलते," हो, आज विचार केला पोहे करूया. "


विजय आईला बोलतो, " आजचं कसं तुला वाटलं पोहे करावेसे ? "


आईला त्याच्या कडे पाहते बोलते, " का असं का विचारतोस, आणि पोहे बनवले त्यांत काय इतकं झालं."


विजय खाली मान घालून हसतो आणि बोलतो " परफेक्ट.. "


आई त्याच्या विचित्र हसण्याकडे पाहते आणि बोलते, " तुला मध्येच काय झालं? "


विजय बोलतो, " नाही, पोहे मधूला फार आवडतात ना. म्हणून केलेस की काय तिची आठवणं आली म्हणून. "


आई त्याच्यावर चिडत बोलते, " उगाच पराचा कावळा करू नकोस. तुला जायचंय म्हणून मी पोहे केले, आणि माझ्या मनातही नव्हतं. "


विजय आईशी भांडण्याच्या मूड मध्ये येतो. पण आईच माघार घेते आणि शांत बसते.


विजय नाश्ता करून उठतो, उभा राहतो. शर्ट ची इन नीट करतो आणि केसावरून हात फिरवतो. मनगटावर असलेलं घड्याळ पाहतो. आणि बोलतो , " परफेक्ट "


विजय आईला निघता निघता बोलतो, " दहावेळा फोन करू नकोस, मी कोर्टात जातोय. उशीर होईल यायला. "


आई त्याला बोलते, " बरं.. " आईला माहित असतं ह्याला फोन करून काही फायदा नाही.


विजय सोसायटीच्या गेटवर येतो. तो पुन्हा मनगटावरच्या घड्याळात टाइम पाहतो. तितक्यात त्याने बुक केलेली गाडी त्याच्या समोर येऊन थांबते.

" परफेक्ट " विजय बोलतो. आणि गाडीत बसतो.


गाडी कोर्टाच्या दिशेने चालु लागते. बराच वेळ गेल्यानंतर गाडी कोर्टाच्या गेट समोर येऊन थांबते.


ड्राइव्हर विजयला बोलतो, " साहेब, आलं तुमचं ठिकाण. "


विजय गाडीची काच खाली करतो आणि बाहेर पाहत बोलतो, " ठीक आहे परफेक्ट. " आणि मध्येच हसतो.

ड्राइव्हर त्याच्या ह्या वागण्याकडे पाहत राहतो.


.... क्रमश...


0

🎭 Series Post

View all