Login

सुड.. भाग -8

विजय मधूला डिवोर्स पेपरवर सही देतो..

राज्यस्तरीय कथामालिका...

ठाणे..

विषय - सामाजिक..

नाव - सुड



भाग - 8


विजय तिच्या जवळ जातो आणि हळूच तिच्या केसांवर फुंकर मारत बोलतो, " डार्लिंग छान दिसतं आहेस तू !"


मधू गर्रकन पाठी वळते, आणि विजयला रागात बोलते.

" तुझी हिम्मत कशी झाली माझ्याशी असं बोलायची ? "


विजय तिला शांतपणे बोलतो, " झालं, किती गं चिडते आहेस. प्रेमाने बोललो तरं प्रेमाने उत्तरं देना जरा. "

आणि तिच्या हाताला स्पर्श करायला जातो, पण ती हात रागात मागे घेते.


मधू त्याला बोलते, " काय बोलायचं आहे ते पटकन बोल. माझ्याकडे तुझं बोलणं ऐकायला वेळ नाही आहे."


विजय बोलतो, " हो हो, झालं समजलं. तुला मी आज माझ्यापासून कायमचं मोकळं करतोय. "


मधू त्याला विचारते, " काय बोलतोयस, मी समजले नाही ? "

मधूला विजयवर संशय येतो. 


विजय अडखळत बोलतो, " अगं म्हणजे, तुला मी डिवोर्स देतोय ना ? म्हणून असं म्हटलं. "


मधू बोलते, " बरं बरं झालं बोलून तरं मी निघते. "

मधूला विजयचं बोलणं खटकत, त्याच्या डोक्यात नक्की काय विचार चालला आहे त्याची लिंक तिला लागत नसते.


तितक्यात मधूची वकील मधूला बोलवायला येते. आणि आत जज समोर मधू आणि विजयला उभं करतात.

जज डिवोर्सचे पेपर वाचतात. आजूबाजूला पूर्ण शांतता असते.


जज मधूला विचारतात, " मधू तुमचं काय मत आहे ? तुम्ही तयार आहात डिवोर्ससाठी ? "


मधू जजला बोलते, " हो जज साहेब मी तयार आहे . "


पुन्हा जज विजयला विचारतात, " मिस्टर विजय तुमचं काय मत आहे ? तुम्ही तयार आहात का ? "


विजय पटकन उत्तरं देतो, " हो जज साहेब, मी देईन सही. "


जज त्यांच्या समोर काही पेपरवर सही करतात. आणि त्यांच्या वकिलांना ते पेपर देतात.


विजय तिच्याकडे पाहतो आणि हसतो. मधूला त्याचं हसणं जरा विचित्रच वाटतं.


मधू वकिला सोबत बाहेर जाते.

मधूची वकील तिला एका बाजूला बसवून काही पेपर तयार करून आणते.


मधूची वकील तिला आवाज देते, " मधू चल सही करायची आहे . "


मधू तिच्या सोबत जाते. आणि डिवोर्स पेपरवर सही करते. विजय सुद्धा पेपरवर सही करून बाहेर येतो.

मधू तिच्या वकिलाचा निरोप घेऊन निघते. तितक्यात विजय तिला आवाज देतो. ती ऐकून न ऐकल्यासारखं करते. विजय पुन्हा तिला आवाज देतो....


मधू विजयवर चिडत बोलते, " आता काय आहे ? झालं ना सगळं आणि तुझा माझा संबंध ह्या पुढे कसलाच नाही आहे. "


विजय बोलतो, " हो गं राणी माहित आहे, पण कोर्ट हे थोडी बोललं की तुम्ही बोलणंच बंद करा म्हणून ?"


मधू विजयच्या बोलण्याने गोंधळते, " म्हणजे? "


विजय तिला बोलतो, " म्हणजे नवरा बायको हे नातं संपलं आहे, मित्र मैत्रीण म्हणून नाही ? "


मधू चिडत बोलते, " मैत्री आणि तिही तुझ्याशी. लायकी आहे का तुझी ? आणि ह्यापुढे माझ्याशी संबंध ठेवू नकोस. "

आणि मधू चिडून तिथून निघून जाते.


विजय तोंडातल्या तोंडात पुटपुटत बोलतो, " माझी लायकी काढतेस काय ? गुड परफेक्ट " आणि हसतो.


विजयला तिच्या वाक्याचा खूप राग येतो. तो घरी पोहचतो.

आई त्याची नेहमीप्रमाणे वाट पाहत असते. विजय आत येतो, आई त्याच्या मुडकडे पाहून काहीच विचारत नाही. आई त्याला पाणी आणून देते, तो पाणी पितो आणि आत बेडरूममध्ये जातो. आईला कळतं नसतं की आज काय घडलं असेल कोर्टात. विजय फ्रेश होऊन येतो. आई न बोलता त्याला गरम गरम चहा आणून देते.

विजय चहा पितो.


आई त्याला हळुच विचारते, " झालं का सगळं नीट ? "


विजय आईकडे पाहतो आणि बोलतो, " हो झालं. दिली तिला सही, आता ती माझ्यापासून मोकळी कायमची. "


आई बोलते, " खरचं, चला देव पावला. आता तू काम कर नि तुझ्या मनात जेव्हा येईल तेव्हा चांगली मुलगी पाहून लग्न कर." 


आई त्याच्या मनाची समजूत घालते.

विजय त्यादिवशी थोडा वेगळाच वागतो, आईला त्याच्या ह्या वागण्यावर खूप दया येत असते. चला आपला मुलगा आता सुधारला ह्याचं तिला समाधान वाटतं. रात्रीचं जेवण उरकून विजय कित्येकवेळ स्वतःच्या बेडरूममध्येच असतो.


काही महिने होतात. सगळं काही सुरळीत आहे असं विजयच्या आईला वाटतं असतं.


मधू घाई घाईमध्ये ऑफिसमध्ये पोहचते. ती खूप घाबरलेली असते. ती ऑफिसमध्ये पोहचल्यावर एक जोराचा श्वास घेते आणि खूप रडू लागते. तिला कळतं नसतं की नक्की काय चाललं आहे.


मधू स्वतःशीच बोलते, " नक्की भास आहे की खरचं कोणी माझा पाठलाग करत आहे. "


दिवसभर तिच ऑफिसमध्ये मन लागत नसतं. संध्याकाळ होते. घरी जाण्याची तिची हिंमतच होतं नाही. पण काय करणार घरी तरं जावंच लागणार. ती हिम्मतकरून ऑफिस मधून निघते. तिचं ऑफिस तिच्या घरापासून काही अंतरावरच असतं. ती ऑनलाईन गाडी बुक करते. आणि तडक तिथून निघून जाते.


ती सतत गाडीच्या पाठच्या काचेमधून सारखी डोकावून पाहत असते. तिला सतत भास होतं असतो की कोणीतरी आहे याचा.


गाडी तिच्या घराजवळ येऊन थांबते. ती गाडीतून उतरते. ती गाडीचे पैसे द्यायला जाणार तितक्यात तिला पाठून कोणीतरी तिच्या हात ठेवल्याचे जाणवते ती दचकते पटकन पाठी वळते.


मधूची बहीण, " अगं हो हो ताई किती घाबरतेस ? मीच आहे."


मधूला खूप घाम फुटलेला असतो ती बहिणीवर चिडते, " ही काय मस्करीची वेळ आहे का ? मी किती घाबरली कळतं का तुला ? "


तिच्या बहिणीला मधूच वागणं जरा विचित्रच वाटतं.

ती गाडी ड्राईव्हरला पैसे देते. आणि घरात निघून जाते.


..... क्रमश...


🎭 Series Post

View all