रीती ओंजळ अंतिम भाग

एका त्यागाची प्रेम कथा
ट्रेनिंग नंतर पुण्यामध्येच उपजिल्हाधिकारी म्हणून तो रुजू झाला. पण त्याला एकदा तेजल ला भेटून सणसणीत उत्तर द्यायचं होतं. शिल्लक कारणावरून त्याचं प्रेम ना करणाऱ्या तिला त्याला स्वतःची लायकी दाखवून द्यायची होती. पण ती सध्या कुठे आहे याबद्दल त्याला काहीच माहिती नव्हती. तिच्या बाबांनी ते दुकान दीड वर्षांपूर्वीच विकून टाकलं होतं. त्यामुळे त्याच्या बाबांनाही नेमकं काही सांगता येत नव्हतं.
मनातली हुरहूर त्याला शांत बसू देत नव्हती. म्हणूनच त्याने तिच्या घरी जायचं ठरवलं. तो तिच्या बंगल्यासमोर आला तेव्हा बाहेर वात्सल्यसदन अनाथ आश्रम ही पाटी लावली होती. काय चाललं आहे हे न समजून त्याने आत प्रवेश केला. तिकडे रिसेप्शन वर काम करणाऱ्या मुलीला त्याने स्वतःची ओळख सांगितली आणि सिद्धेश पटवर्धनांना भेटायचं आहे असं सांगितलं. त्या मुलीने त्याला आत जायला सांगितलं. त्याने हॉलमध्ये प्रवेश केला. आणि अचानक त्याचे पाय थबकले. त्याच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. कारण समोरच भिंतीवर तेजलचा एक मोठा हसरा फोटो प्रेम करून लावला होता आणि त्यावर चंदनाचा हार घालण्यात आला होता.
समोर काय घडतंय हे त्याला समजतच नव्हतं. तितक्यात त्याला कुणाच्यातरी येण्याची चाहूल लागली. सिद्धेश पटवर्धन हॉलमध्ये आले होते. त्यांनी त्याला बसायला सांगितलं.
"नमस्कार, मी शिवांश तेजलचा कॉलेजचा मित्र."
त्याने पटवर्धनांना स्वतःची ओळख सांगितली.
"मी ओळखतो तुला शिव." पटवर्धनांनी असं बोलताच शिवने आश्चर्याने त्यांच्याकडे बघितलं.
त्याला काय बोलावं तेच समजत नव्हतं.
" म्हणजे हे कसं झालं? तेजल च लग्न झालं होतं ना?"
त्याने कसंतरी अडखळत विचारलं.
"तुला काय वाटते शिव, तुला सोडून तेजाने खरंच दुसऱ्याशी लग्न केलं असतं?" पटवर्धनांच्या या प्रश्नावर मात्र शिवला काय बोलावं ते सुचत नव्हतं. पटवर्धनाने समोरचा ग्लास उचलून शिवच्या हातात दिला आणि बोलायला सुरुवात केली.
"शिव, तेजा माझी एकुलती एक लाडकी मुलगी होती. बापा पेक्षा जास्त मित्र म्हणून मी तिच्यासोबत वागत होतो. तू बीए ला पहिला आलास आणि तिला प्रपोज केलं त्याच दिवशी तिने मला तुझ्याबद्दल सांगितलं. आणि त्याच दिवशी तिला तू आमच्याकडे काम करणाऱ्या गिरीश राऊतांचा मुलगा आहेस हेही समजलं होतं. पण मी पहिल्यापासूनच पैशापेक्षा कर्तुत्वाला जास्त महत्व दिलं आहे.त्याच्यामुळे मला तुमच्या दोघांच्या नात्याबद्दल कसलाही आक्षेप नव्हता."
हे ऐकून शिव अजूनच थक्क झाला.
"मग तिने माझ्यासोबत ब्रेकप का केला?आणि तुम्ही तिचा अमेरिकेत लग्न का ठरवलं?"
"तुला आठवतंय शिव तुमचा एक्सीडेंट झाला होता. त्या अगोदर तेजा नेहमीच डोकेदुखीच्या त्रासाने त्रस्त होती. पण गोळी खाऊन तिचा त्रास कमी व्हायचा. एक्सीडेंट झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी अचानक तिच्या डोक्यामध्ये खूप जोरात दुखायला लागलं होतं. त्यादिवशी डॉक्टरांनी केलेल्या एमआरआय रिपोर्ट मध्ये कळलं की तेजाला ब्रेन ट्यूमर आहे आणि तो शेवटच्या स्टेजला आहे. ऑपरेशन नंतरही तिचे वाचण्याचे चान्सेस 0.1% होते. शिवाय ती कायमची पॅरॅलिसिस होऊ शकत होती. पण तरीही आम्ही ऑपरेशनचा चान्स घ्यायचं ठरवलं. पण तिला मात्र आपण बरे होणार नाहीत असंच वाटत होतं. आणि म्हणूनच तिने निर्णय घेतला. तुझ्यापासून आजाराबद्दल लपवून ठेवलं. कारण तिला काही झालं असं तुला कळलं असतं. तर तु जगू शकणार नाहीस याची तिला खात्री होती. म्हणूनच तिने त्या दिवशी तुझ्या सोबत भांडण करून ब्रेकअप केला. परंतु प्रेमभंगाच्या दुःखाने पेटून उठशील. आणि स्वतःसाठी काहीतरी करशील. त्या दिवशी तळ्याकाठी गाडीत बसून मी तिची वाट बघत होतो. लग्नाचे खोटं सांगून आम्ही तिला अमेरिकेत उपचारासाठी घेऊन गेलो. कारण तुझ्यापर्यंत तिच्या आजारपणाची बातमी पोहोचू नये म्हणून. प्लेन मध्ये बसायच्या अगोदर तिने तुला शेवटचा मेसेज केला होता. आणि ऑपरेशन दरम्यान तिचा मृत्यू झाला.." पटवर्धनांनी हे सांगताच शिवच्या मनाचा बांध फुटला.
जिला त्याने कायम बेवफा म्हणून हिणवलं होतं. तिने स्वतःच्या मनावर दगड ठेवून त्याच्या भविष्याचा विचार केला होता.
" तेजा गेल्यानंतर माझी जगण्याची इच्छा संपली. तिच्या शेवटच्या शब्दांमुळे मी जिवंत आहे. मी माझा व्यवसाय बंद करून सगळा पैसा कॅन्सर रुग्णालयास दान केला. आणि या बंगल्याचे रूपांतर अनाथ आश्रमा करून अनाथ मुली सोबत आपले जीवन व्यतीत करतोय.त्यांच्यातच मला माझी तेजा दिसतेय." पथवर्धनांनी डोळे पुसत त्याला सांगितलं.
"ऑपरेशनला जाण्यापूर्वी तेजाने तुझ्यासाठी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. तिने न वाचता तशीच जपून ठेवली आहे तुझ्यासाठी. असं म्हणत त्यांनी कपाट उघडून एक ड्रॉवर उघडला आणि त्याच्यातून एक लिफाफा काढून शिव समोर धरला."
थरथरत्या हाताने शिवने पत्र वाचायला सुरुवात केली.
प्रिय,शिव..
मला माहितीये तू माझ्यावर खूप खूप रागावला असशील. मी तुझ्याशी खोटं बोलले. पण तुझ्याशी खोटं बोलताना, तुला दूर लोटताना माझ्या मनाला खूप यातना होत होत्या. मी जर तुला माझ आजारपण सांगितलं असतं तर तू कोलमडून गेला असतास. कमीत कमी प्रेमभंगाच्या दुःखाने तरी तू पेटून उठशील आणि स्वतःसाठी नक्कीच काहीतरी करशील ही खात्री होती मला.
मला माहित आहे हे पत्र तुझ्या हातामध्ये येईपर्यंत खूप वेळ झालेली असणार. तू नक्कीच मोठा कर्तुत्ववान माणूस बनलेला असशील.
खूप प्रेम करूनही या जन्मात माझी ओंजळ रिकामीच राहिली. पण पुढच्या जन्मात मात्र देवाला मी खूप सारं आयुष्य मागणार आहे. आणि तुझं हे ओंजळभर प्रेम भरभरून जगणार आहे.
तुझीच
तेजा

ते पत्र वाचून मात्र शिव ऑक्साबोक्षी रडायला लागला. आयुष्यभरासाठी त्याची ओंजळ भरून ती मात्र रिकाम्या ओंजळीनेच गेली होती.
त्या दिवसानंतर वास्तल्यसदन पूर्ण जिम्मेदारी शिवने उचलली. दोन्ही हाताने दुसऱ्यांना सुख देताना त्याची ओंजळ मात्र आयुष्यभर रिकामीच राहणार होती..
समाप्त.
©®खूशी अशोक

🎭 Series Post

View all