मागील भागात आपण पाहिले की वासंतीताई क्षिप्राला पाळी आल्यावर स्वयंपाकघरात आल्याबद्दल ओरडतात. बघू आता पुढे काय होते ते.
लग्नानंतर जेव्हा वासंतीताईंनी तिला तिची तारीख विचारली, तेव्हा तर तिला खूप लाज वाटली.. पण कारण नंतर कळाले.. हे चार दिवस तू स्वयंपाकघरात फिरकू नकोस बरे का? नुकतेच लग्न झालेल्या क्षिप्राला हे थोडे अपमानास्पद वाटले.. कारण मग साधे पाणी जरी हवे असेल तरी कोणाची तरी वाट पहायची.. चहा कॉफीचि सुद्धा आठवण करून द्यायला लागायची. अशा वेळेस ऑफिस हाच तिला स्वर्ग वाटायचा. पहिले एक दोन महिने हे पाहिल्यावर तिने अश्विनपाशी हा विषय काढला..
" अश्विन, मला ना थोडे ऑड वाटते.."
" काय?"
" हेच, ते चार दिवस स्वयंपाकघरात जायचे नाही. चहापाणी तुमच्याकडे मागायचे.. खरे सांगायचे तर मला याची सवय नाही.."
" हे बघ,तुला फक्त स्वयंपाकघरात जायला परवानगी नाही. आमच्या मूळ घरी तर बाजूला बसवतात.."
" तुला हे पटते?"
" न पटण्याचा प्रश्नच नाही.. आपले *रीतीरिवाज* आपण नाही पाळणार तर कोण?"
" मला एक सांग, जेव्हा आईंना पाळी येत होती, मग तेव्हा स्वयंपाक कोण करायचे?"
" कोण म्हणजे आईच.."
" मग आता मलाच हे बंधन का?"
" कारण तेव्हा काही पर्याय नव्हता.. आता तू बाजूला असलीस कि आई स्वयंपाक करू शकते.."
" अरे एकविसावे शतक चालू आहे सध्या.. तरी हे मी पाळायचे? आणि तू जे संकष्टीच्या दिवशी दारू पिऊन येतोस तेव्हा हे रीतीरिवाज कुठे जातात?"
" दारू कुठे शरीरात राहते.. शू केली कि निघून जाते.. तू पण ना?"
तिलाच वेड्यात काढून अश्विन तिथून निघून गेला.. आणि या विषयावर याच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही , हे क्षिप्राला कळून चुकले..
नंतर अश्विन आईशी बोलला कि त्यांना सुनेला सगळे हातात द्यायचा कंटाळा आला हे त्यांनाच माहीत.. पण मग चार दिवस न येण्याऐवजी देवपूजा झाल्यावर चालेल अशी तिला सवलत मिळाली.. दिवस जात होते. आशुतोष झाला.. नियम आलटूनपालटून बदलत होते. पण आता क्षिप्रा ते जास्त मनाला लावून घेत नव्हती.. इतके वर्ष ते चालवून घेत होती.. पण आता आशुतोष गेला होता पाचवीत.. इतके वर्ष दुपारी असलेली शाळा झाली होती सकाळची.. इतर वेळेस ती सकाळी त्याला डबा वगैरे बनवून द्यायची.. पण ते चार दिवस त्या मायलेकांना वासंतीताई उठण्याची वाट पहायला लागायची.. चार दिवस तो बाहेरच खायचा..
सध्या घरात तयारी सुरू होती आशुतोषच्या मुंजीची.. दोन वर्षे आधीच करायची होती.. पण त्याच दरम्यान भास्कररावांची बहिण वारली. मग सगळ्यांचाच मूड गेला.. नंतर करू, नंतर करू असे म्हणत मग या वर्षी करायचीच असे यांचे ठरले. अश्विनच्या लग्नानंतरचे पहिले मोठे कार्य म्हणून सहा महिने आधीपासूनच तयारी सुरू झाली. सगळ्या नातेवाईकांना आमंत्रणे गेली. मोठा हॉल बुक झाला. आहेराची खरेदी झाली. अश्विन आणि क्षिप्रा कामाला जात असल्यामुळे भास्करराव आणि वासंतीताई दोघेच मोठ्या उत्साहाने सगळे करत होते.. अगदीच गरज असेल तर अश्विन आणि क्षिप्रा शनिवार, रविवार उरलेली कामे करत होते.. मुंजीला दोन महिने राहिले असताना छातीत कळ आली असे भास्करराव म्हणाले आणि उभ्याजागी गेलेसुद्धा. सगळ्यांसाठी तो मोठा धक्काच होता.. त्यातून सावरेपर्यंत, त्यांचे विधी होईपर्यंत महिना असाच निघून गेला.. आशुतोषच्या मुंजीचा विषय बाजूलाच पडला होता. त्यातला उत्साहच निघून गेला होता.

होईल का आशुतोषची मुंज, बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्कीच सांगा..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा