रीत --या घरची--त्या घरची

साखरेचे पुर्ण अगोडच लागत त्याला गुळाच्या पुरणाची चव नाही
रीत– -या घरची- -त्या घरची

प्राजक्ताने मृणाल ला शुक्रवारची सवाष्णम्हणून निमंत्रण करायला फोन केला “
“हॅलो मृणालतुला यायचे आहे शुक्रवारची सवाष्ण, येताना चिकूला घेऊन ये.”

“वाsव शुक्रवारची सवाष्ण –म्हणजे तुझ्या हातची पुरणपोळी माझ्या तर आत्ताच तोंडाला पाणी सुटल—”

“ते आत्ता गिळून टाक, प्राजक्ता हसुन म्हणाली!
व उद्या बरोबर बाराला ये,वेळ लक्षात ठेव आणि उशीर नको करू नाहीतर उगाचच नसती काम उपसत बसशील स्वैपाकाची सुट्टी म्हणून.”

“नाही ग सवाष्ण म्हणजे सकाळी उपास करावा लागेल तेव्हा कडकडून भूक लागली असेल .
मृणाल ने असे म्हणताच दोघी मैत्रिणी हसायला लागल्या …”

‌.
चला एक काम तर झालं आता घर आवरायला घ्यावे ,उद्या चिपळून हून आजेसासूबाई व चुलतसासूबाई येणार.

आषिश -प्राजक्ता चा नवरा,त्याचे मूळचे गांव कोकणात चिपळूण.तिथे आजी ,काकांचा परिवार, प्राजक्ता नागपूर कडची आशिष ला सोलापूर ला नौकरी लागली . सुरवातीला तो बहिणी च्या घरी रहात असे पण लग्नानंतर त्याने वेगळे घर घेतले. एक वर्षानंतर आई बाबांनाही बोलावून घेतले. प्राजक्ता लग्नानंतर एक दोनदा चिपळूण ला जाऊन आली.
या वर्षी श्रावण सुरू झाल्यावर आजी इकडे येणार अस ठरलं.
पहिल्यांदाच येणार आणि ते ही श्रावणात .सगळे सणवार सुरू होतील .
नेमक्या आई तेव्हाच ताईंकडे गेल्या होत्या त्याही शुक्रवारी सकाळीच परत येणार होत्या.

विचार करत प्राजक्ता पटापट कामाला लागली रोजचा स्वयंपाक देवपूजा झाल्यावर तिने पूरण शिजायला लावले. बाजारात जाऊन भाज्या फळ घेऊन आली.
सकाळी साडेपाच चा गजर वाजताच प्राजक्ता उठली. पटापटा आवरून होतं तोच चिपळूण ची माणसं आली त्यांना घ्यायला बाबा गेले होते.आजीं बरोबर काकू ही आल्या होत्या.
प्राजक्ता ने वाकून नमस्कार केला.व त्यांचे चहापाणी आवरून ती आंघोळीला पळाली. तोपर्यंत ताईंन कडून सासुबाई आल्या. सासूबाईंना पाहून प्राजक्ताला हायस झालं. आजी, काकू या तिच्यासाठी नव्या होत्या त्यांच्या आवडीनिवडी स्वभाव सासूबाईंना माहीत होता ती स्वयंपाकाला लागली तोपर्यंत इतरांच्या अंघोळी आटोपल्या. सासूबाई तिच्या मदतीला आल्या.आजी, आणि काकू, बाबा सोबतबाहेर गप्पा मारत बसल्या होत्या.
बरोबर साडेअकराला मृणाल हजर चिनूला घेऊन.
पाच मिनिटे गप्पा मारून प्राजक्ताने पान वाढायला घेतली. मृणाल बरोबरच आशिष तिचा नवरा आणि सासरे ,.यांचीही पान घेतली. गरमागरम तूप सोडलेली खमंग पुरणपोळी, आमटी, बटाटा भाजी, भजी पातळ भाजी, चटणी कोशिंबीर वरण-भात .
सर्वच पदार्थ खूप खूप चविष्ट झाले आहे तोंड भरून कौतुक केले‌ म्रृणाल ने.
सुनबाई पुरणपोळी खूप छान करते बाबांनी तोंडभरून कौतुक केले.
जेवणं झाल्यावर मृणाल ची ओटी भरून तिला रवाना करत प्राजक्ताआत आली व इतरांची पाने घेतली सासूबाई, काकू,आजी व ती असे सर्वजण जेवायला बसले.
वा छान चव आहे तुझ्या हाताला आजींनी कौतुकाने म्हटले .
हं पण पुरण जरा अगोड झाल आहे. साखरेच्या पुरणाला गुळाची गोडी नाही येत काकू म्हणाल्या
आणि ? ओल्या नारळाची चटणी नाही केलीआपल्या कडे नेवेद्याला घावन घाटलच करतात.काकूंनी विचारले तशी प्राजक्ता बावरली,तिने सासुबाईं कडेपाहिजे त्यांनी डोळ्यांनी इशारा करत लक्ष नको देऊअसे सांगितले.

खूप दमली असशील सकाळपासून आता निवांत जेव भूक लागली असेल ना आजी काळजी करत म्हणाल्या . प्राजक्ताचं सगळं लक्ष त्यांच्या बोलण्याकडे होत तिने सर्वांना आग्रह करून जेवायला वाढलं काकू म्हणाल्या दूध दे ग थोडसं पुरणपोळी दुधासोबत खातात आपल्या कडे.
प्राजक्ता चे लक्ष आता जेवणात न उडाले तिचा विरस झाला तिला जेवण गेलं नाही .

“इकडे साखरेचे पूरण. करतात आणि त्यावर तूप सोडतात खमंग लागते.सासुबाई म्हणाल्या.”

“ असेल तरीही आपल्या कडच्या तेलपोळीची गोष्ट च वेगळी नाही काहो भाऊजी? “

“हो s बरेच वर्षे झाली खाऊन!पण ही पणआवडली.”

दुपारच्या चहाच्या वेळी प्राजक्ता म्हणाली” आईकडे साखरेचे पुरण करतात म्हणून मला तेच माहीत होतं इकडची पद्धत नव्हती ठाउक.”

अगं छान झालं होती पुरणपोळी आणि इकडची तिकडची रीत पद्धत असं का ही नसतं आम्ही कोकणातच वाढलो, राहिलो त्यामुळे तिकडे नारळ तांदूळ गूळ असे जास्त वापरले जाते म्हणून ते घावन घाटलं आता इकडे विदर्भात सुख खोबरं दाणे ,तीळभरपूर म्हणून इकडे असे.”
“ हो पण आपल्याकडची पद्धतीने करायला हवं काकूं नी मध्ये टोकल!
.
अगं मला सांग आपल्याकडची पद्धत म्हणजे जिथे जे जास्त पिकत तिथे तेजास्त वापरले जाते .आणि पद्धत सुरू केली ती पूर्वी घरातल्या एका स्त्री नेच न? तिने केलेली सुरुवात तिला अनुसरून येणार्याबाकीच्यांनी स्विकारली .त्या काळात मुली वयाने लहान असल्यामुळे खरा स्वयंपाक त्या सासरीच आल्यावर सासू च्याहाताखाली शिकायच्या. पण काळ बदलला मुली आता लग्नाआधी बरेचसे आई कडून शिकून येतात .येणारी प्रत्येक पिढी तली स्त्री त्यातही सासर बरोबर माहेरचं हीथोडं थोडं मिसळते.असं करत करत पद्धती बदलत जातात. जुने सोडू नाही पण नव्याचे ही स्वागत करावे.
आजींनी आपल मत मांडले.

“आजी मला ते घावन घाटलं शिकवाल का ?
हो, नक्की आणि आम्हाला तुमच्या कडची सांबरवडी पाटवडी चा रस्सा,शिकव.
आणि रोडगे भरीत, गोळा भात ही आवडेल हो काकू म्हणाल्या. तशी प्राजक्ता ने हसुन मान डोलावली.
आजींनी कौतुकाने तिच्या पाठीवर हात फिरवला! व म्हणाल्या
बरं मला सांग मंगळागौर पुजणार आहे न?
हो बाई आजकाल मुलीना,काकू मधेच बोलल्या "
आवडतं मला ते फक्त काय करायच ते तुम्ही शिकवा."
“ हो नक्की च!
आजींनी असम्हणताच वातावरणातलाताण हलका झाला आणि प्राजक्ताच्या मनातले मळभ दूर झाले.
—------------------------------------------