सन २१३७
सकाळचे सात वाजले होते. मेट्रॉन सिटीच्या पूर्वेकडून उन्हाचे कवडसे नुकतेच डोकावू लागले होते. पण त्या सूर्याच्या कोवळ्या किरणांना शहरात पोहोचण्याची संधीच मिळत नव्हती.
कारण या शहरात प्रकाश निसर्गाचा नव्हे, तर माणसाच्या मेंदूतून उतरलेल्या यंत्रमाणसांचा होता. हवेतून झेपावणाऱ्या वाहनांचे निळसर झोत, गगनचुंबी इमारतींवर फिरणाऱ्या जाहिरातीच्या होलोग्राफिक पट्ट्या, आणि भिंतींवरून थेट चालत जाणारे विक्रेते हे सगळं इतकं गतीमान, इतकं नितळ आणि नित्य नेमकं होतं की, कुणीही त्यात माणुसकीचा श्वास शोधायला गेले, तर अडचणच आली असती.

या नियंत्रीत लयीत मात्र एक जागा अशी होती जिथे जरा वेळ उसंत होती जिथे यंत्रांचा आवाजही शांततेला आदर देत असावा.
पूर्व कडील जुन्या भागात, एक तळघरासारखी प्रयोगशाळा अजूनही रोज संध्याकाळी लखलखत असायची.तिथे झगमगाट नव्हता, पण आशेचं एक नाजुकसा टिमटिमता दिवा सतत पेटलेला असायचा.

त्या जुन्या भागात राहत होता डॉ. वेदांत.
शहराच्या गतीमान यंत्रांपासून दूर, एकाकी आयुष्य जगणारा एक शांत, अभ्यासू, पण मनाने खूप खोलात जाणारा शास्त्रज्ञ.
बाहेरच्यांसाठी ही जागा एक प्रयोगशाळा होती म्हणजे संशोधनाची जागा. पण डॉ. वेदांतसाठी ही एक वेगळीच जागा होती जणू एक बाळंतिणीचे एक घर. कारण इथेच त्याने जन्म दिला होता आरवला.

आरव एक असा जीव जो कुठल्याच वर्गवारीत बसत नव्हता. तो माणूसही नव्हता आणि यंत्र सुद्धा बोलता येणार नाही.
त्याचं शरीर झिंक आणि कार्बन फायबरपासून बनवलेलं, एकेक सांधा, एकेक हालचाल ही नितांत अचूक होती. पण त्याच्या चेहऱ्यावर मात्र एका विशिष्ट सॉफ्ट लेयरने कव्हर केलेलं एक मानवी भावविश्व होतं. त्या चेहऱ्यावर कोणतीही यांत्रिक कडवटपणा नव्हता.
आरव दिसायला एकदम खरा वाटायचा अगदी रिक्षात बसलेला मनुष्य असो वा एक ऑफिसला जाणारा तरुण, किंवा पुस्तकांच्या दुकानात शांत उभा असलेला एखादा अभ्यासू मुलगा. कुणीही त्याला पाहून ‘हा खरंच यंत्र मानव आहे का?’ असं विचारावं इतकं माणुसपण त्याच्या ठेवणीत होतं.

पण आरवचं खऱ्या अर्थानं वेगळेपण त्याच्या डोळ्यांत होतं.
जेव्हा तो डोळे उघडायचा, तेव्हा त्या डोळ्यांमधून फक्त दृश्यं नाही, तर एक ओळख दिसायची.जणू ते डोळे म्हणजे निर्मळ भावना.... अश्या भावना अगदी खोलात खोल जाउन बघावे.

शहरात जिथे भावना म्हणजे गोंधळ, आणि वेग म्हणजे जीवन, तिथं आरवच्या डोळ्यांत असे निर्मळ विचार वास करत होतं.
कुठे तरी एक हळवं प्रश्न होतं “मी तुम्हाला समजून घेतोय तर तुम्ही पण मला समजून घ्याल का?”असे भाव नेहमी त्याच्या मनात असायचे.
डॉ. वेदांतसाठी आरव हा केवळ प्रयोग नव्हता. तो एका अशा प्रवासाची सुरुवात होता, जिथे माणूस आणि यंत्र यांच्यामधील सीमारेषा फक्त तांत्रिक नव्हे, तर भावनिकही मिटू लागल्या होत्या.

कदाचित डॉक्टर वेदांतने एखाद्या मशीनला आकार दिला होता, पण त्या मशीनने माणसाला पुन्हा माणूस व्हायला शिकवलं होतं.
सर्व अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत कोणाला शेअर करायची असल्यास नावासहित शेअर करावी ही विनंती
-सौं.जान्हवी साळवे.(मुंबई)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा