सुरत मध्ये गाडी चालवणं हे 'स्क्विड गेम्स' पेक्षा तसूभर पण कमी नाही. रस्त्यावरचा तोच थरार, रोज गाडी चालवण्याचा नवा प्रयोग. किंबहुना इथल्या रस्त्यावरल्या वाहणाऱ्या गाड्यांची तुलना ज्वालामुखीतून फुटणाऱ्या लाव्ह्या सोबतच होवू शकते.तुम्हाला जर बहुसंख्य जनता एका हाताने गाडीचा एक कान पिळत, एका हाताने हॉर्न वाजवत, मान कुठल्याही एका बाजूला पॅरालाइज झाल्यासारखी झुकवून आणि दोन्ही पाय लँडिंग साठी तत्पर अस दृश्य दिसलं तर समजून जावं आपण सुरत मध्ये भर चौकात आहोत. या बाबतीत इथे अजिबात स्त्री पुरुष भेदभाव नाही. खर तर गाड्यांच्या घडवणाऱ्यांनी इथल्या गाड्यांना लेफ्ट-राईट इंडिकेटर द्यायच्या भानगडीत पडूच नये असं माझं स्पष्ट मत आहे.कॉस्ट कटिंगला फुल स्कोप आहे त्यापेक्षा गाडी हाकताना मानेच्या आणि खांद्याच्या खोबणीत मोबाईल पकडण्यासाठी काही गॅझेट द्यावं. 'पुष्पा' मधल्या ' श्रीवल्ली ' गाण्याचं सूर्तिस्थान इथेच असावं..कारण कुठल्याही सुरतीसाठी पब्लिक प्रायव्हसी, पब्लिक इटीकेट्स या सर्व अंधश्रध्दा आहेत.
गाडीच्या दोन पायावर असो नाही तर स्वतःच्या दोन पायावर चालताना असो, मान मुरडून,फोन अँगल मध्ये पकडुन चार लोकांना ऐकू जाईल इतक्या पट्टीत बोलायचं हा इथे भ्रमणध्वनी वापरण्याचा पहिला आणि महत्वाचा नियमच आहे मुळी.आजूबाजूच्या लोकांना या संभाषणाचा मुळीच त्रास होत नाही कारण त्यांचंही फोन कानाशी लावून स्वगत चालू असतं त्यामुळे काळजी नसावी.
इथे गाडी चालवताना सगळ्यात दुर्लक्ष करायची गोष्ट म्हणजे आजूबाजूला चालणारी वाहन. हातात गाडीचा ॲक्सेलेटर आला की सुरतीच्या अंगात 'माता' येते. तो देवत्वला पोहोचतो आणि हा देव स्वतःच विश्व आणि स्वतःचे नियम बनवतो. म्हणजे आपल्याला जरी डाव्या बाजूला जायचं असल तरी गाडी उजव्या बाजूने हाकायची मग शेवटच्या मिनिटाला धूम जावं करायचं. मागून येणारे शांत पणे ब्रेक मारतात किंवा तुम्हाला कट मारून पुढे जातात. कारण त्यातल्या बहुसंख्य जनतेलाही अचानक उजवी कडून डावी कडेच जायचं असतं. अडचण तेव्हा येते जेव्हा तुम्ही सरळ रेषेत जात असता आणि अचानक तुमच्या मागून येणाऱ्याला डावीकडून उजवी कडे जायची घाई असते तेव्हा तुम्ही सरळ रेषेत जाणार हे माहीत असताना सुध्धा तो तुम्हाला ओव्हरटेक करत शांतपणे उजवी बाजू गाठतो आणि आपण त्याचा कॉन्फिडन्स पाहून जागेवर गोठतो. बरं इथे मला नमूद करावं वाटत बाकी कधीही सिग्नल न देणारा सुरती इथे आवर्जून राईट सिग्नल देतो. त्यामुळे सुरत मध्ये गाडी चालवताना एक तर कुठेच न बघता गाडी चालवावी किंवा दाही दिशांना बारीक लक्ष ठेवावं. इथे इंद्रसारखे सहस्त्र चक्षु हवेत.
एका गाडीवर एकाने किंवा दोघांनी जाणं म्हणजे भ्याडपणाच लक्षण आहे. कमीतकमी पाच जणांची चळत रचून गाडी चालवावी .शास्त्र असतं ते बाबा!!गाडी हाकणाऱ्याच्या पुढे मागे सारी रंगबेरंगी जनता अशी चिकटून बसलेली असते की मला एका रॅपर मध्ये आरीत लावलेल्या हिरव्या लाल पिवळ्या पॉपिंसच्या गोळ्या आठवतात. इथे सार्वजनिक वाहनाने प्रवास नावाला आहे त्यामुळे तमाम जनता सकाळ पासून रात्री पर्यंत आपापले रथ काढून हिंडत असते. इथे दर डोई एक गाडी असा रेट आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही वेळेला बाहेर पडा वेड्यावाकड्या पळणाऱ्या दुचाक्या तुम्हाला दर्शन देणारच.
गाडी पार्क करायची पण सुरती लोकांची स्वतःची स्वतंत्र शैली आहे. तुम्ही चुकून पद्धतशीरपणे पार्किंग मध्ये गाडी लावून जरा बाजूला गेलात की तुमच्या गाडीच्या तिन्ही बाजूला रिंगण करून दुचाक्या लागलेल्या असतात आणि त्यांचे स्वार गायब असतात.एरवी निवांत असलेल्या सुरती माणसाला या बाबतीत मात्र प्रचंड घाई असते त्यामुळे तो मोकळी जागा दिसली की आल्या दिशेने गाडी घुसवून गायब होतो. पुढे लावलेल्या गाड्या निघायच्या आधी आपण काम उरकून येवू हा त्याचा विश्वास असावा किंवा असा काही विचार करायचा असतो हे त्याच्या गावीही नसावं.
गाडी चालवताना चौका चौकात लागणारे सिग्नल्स हे केवळ सुरतच्या सुशोभीकरणात भर घालण्यासाठी आहेत हे लक्षात ठेवायचं. अस्सल सुरती रंग भेद करत नाही सिग्नल कुठलाही असो तो नेटाने गाडी हाकत राहतो. जर चुकून तुम्ही लाल रंगाचा मान राखत थांबायचा विचार केलातच तर खुशाल थांबा,बाकीचे तुमची समाधी अजिबात न मोडता बाजूने निघून जातील. शेवटी सिग्नल ला संन्यास्याच्या विरक्तीने शांतपणे रहदारी निरखत असलेला पोलिसमामा तुम्हाला काही मदत हवी का ते विचारायला येईल. तुमची गाडी बहुदा बंद पडली असावी आणि तुम्हाला मदतीची गरज आहे अशी त्या बिचाऱ्याची धारणा होवून तो तुमच्यासाठी धावत येईल. सिग्नल मोडायची वाट बघून अचानक शून्यातून प्रकट होणे नाही, तुमची गचांडी पकडून लायसेन्स विचारणं नाही, पावत्या फाडण नाही. अजून काही वर्ष जर मी इथे राहिले तर ,'जावू द्या ना साहेब. पहिलीच वेळ आहे.' म्हणून आर्जव करत २०० सरकार ऐवजी १०० मामांच्या खिशात घालण्याची कला मी विसरेन की काय अशी भीती वाटते.
पण तुम्हाला या साऱ्या रणधुमाळीत तुमचा रथ न ठोकता हाकता आला म्हणजे तुम्ही दिग्विजय केला अस नाही बरं का. प्रत्येक चौकात तुमची परीक्षा घ्यायला गोमाता आणि तिची तमाम जनता सांडलेली असते. या कचाट्यातून सुटून जरा गाडी पळवू म्हटलं की भर रस्त्यात एखाद्या महान आत्म्याला रस्ता ओलांडायचा असतो. हे ' ॲवेंजर्स ' चे पूर्वज नुस्ता हाथ दाखवून 40-50 च्या स्पीड ने येणारी गाडी धांबावू इच्छितात. या सगळ्यांच्या कृपेमुळे गाडीचा जेव्हढा उजवा कान पिळला जातो तेव्हडा ब्रेक ही उपयोगात आणला जातो. शेवटी काय आयुष्यात समतोल हवा.
आयुष्यभर खो खो खेळत गाडी चालवायची असेल किंवा नेमक नाकासमोर येवून ब्रेक मारणाऱ्या परदानशीन सुंदरीला (अर्थात ती डोळे उघडे ठेवून बाकी चेहरा फडक्यात गुंडाळून असल्यामुळे तिला सुंदरी बोलले. झाकली मूठ सव्वा लाखाची काय!)जीवाचा त्रागा न करता साईड देणं किंवा भर गाडीवर तोंडात गुटका भरून त्याच उदक सिंचन करणाऱ्या पुढल्या गाडीवाल्याला चुकवण या सारखे असंख्य थरारक खेळ खेळायचे असतील तर एक दीन तो गुजारो सुरत मे!!
तुमचीच (वैतागून सुध्धा) अजून तगलेली
हर्षु
ता.क.
चुकून एखाद्या चौकात किंवा रस्त्याचा कडेला गाड्यांची अनकलनिय गर्दी दिसली तर घाबरून जायचं कारण नाही इथे कोणीही आडवा पडलेला नाही तर कोणी तरी आडवा हात मारताय.मतितार्थ एवढाच एक तर तिथे एखादा सेल चालू आहे किंवा एखादा पाणीपुरी वाला भैया उभा आहे. गाडीवरून पायउतार न होता शॉपिंग आणि खावू गिरी करण मी इथेच शिकले.
सुज्ञ व्यक्तींना जर ही कैफियत त्यांच्या गावाची वाटली तर नवल नाही कारण सब घोडे बारा टक्के काय राव खर की नाही..

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा