??
रोजच वेगळ्या व्हारायटीच्या भाजी
हसुया थोड़!!
सुजाताला स्वयंपाकाचा खूप कंटाळा होता.... तिचा मुलगा हृषि रोज डब्यामध्ये बटाट्याची भाजी घेऊन जायचा..... तो बाकीच्या मित्रांच्या डब्यातल खायचा... आणि स्वतःचा डबा त्यांना द्यायचा...
एक दिवस त्याची मैत्रीण लता तिच्या आईला सांगते,
लता: आई बघ ना हृषीची आई त्याच्या डब्यामध्ये रोज फक्त बटाटा देते.... पार कंटाळून गेलाय बिचारा ... तू कधी भेटली तर सांग ना त्यांना जरा वेगळी भाजी पण करायला....
लता: आई बघ ना हृषीची आई त्याच्या डब्यामध्ये रोज फक्त बटाटा देते.... पार कंटाळून गेलाय बिचारा ... तू कधी भेटली तर सांग ना त्यांना जरा वेगळी भाजी पण करायला....
यात मज्जा अशी होती की सुजाता आणि लताची आई सुमन या दोघी खास मैत्रीणी.... सुमन एक दिवस सुजाताकडे गेली बोलता बोलता...
सुमन: अग सुजाता तु हृषीच्या डब्यात रोज बटाट्याची भाजीच काय देतेस? जरा वेगवेगळ्या भाज्या पण देत जा की ग......बिचारा सगळ्यांच्या डब्यातल्या भाज्या खात राहतो... कंटाळा येतो त्याला ...रोज तुझी बटाट्याची भाजी खाऊन
सुजाता : काय म्हणतेस??? रोज मी त्याला व्हरायटीचीच्या भाज्या देते... बाकी नखरे आहेत नुसते त्याचे खायचे...म्हणजे बघ
उकडलेला बटाटा, लाल बटाटा, हिरवा बटाटा , पिवळा बटाटा , बटाट्याची लाल आमटी,ब बटाट्याची हिरवी आमटी, कधी कांदा घालून, कधी टोमॅटो घालून, कधी दाण्याचा कूट घालून... बघ की आता या किती व्हरायटी झाल्या?
सुजाताला पहिल्यांदाच बटाटयां च्या भाजीचे इतके प्रकार माहित झाले होते ...तिने स्वतःच्या डोक्याला हात मारला ...
?????