शीर्षक : रोमा (भाग ४)
जलदकथा स्पर्धा (नोव्हेंबर 2025)
कानामागून आली आणि तिखट झाली....
जलदकथा स्पर्धा (नोव्हेंबर 2025)
कानामागून आली आणि तिखट झाली....
आज दसरा म्हणून दोघा पुरुषांनी लवकर उठून स्वतः गाड्या धुवून शस्त्र आणि यंत्रांची पूजा केली होती.... त्यात रोमाला सुद्धा,तिच्याप्रति आभार म्हणून, तिची पूजा करून दोघे बापलेक आवरून देवळात गेले होते.... त्यांना येता येता वेळ लागला. तोवर घरात मीराबाई आणि आदितीने रोमाचा पूजेचा प्रकार पाहून डोक्यात राग घालून घेतलेला.... रोमाचं चार्जिंग पूर्ण होताच तिने स्वयंपाकघरात सिध्दार्थने आदल्या दिवशी सेट केलेला जेवणाचा सगळा मेनू तयार करून ठेवला....
आपल्यापेक्षा जास्त महत्व, घरातल्या एका यंत्राला मिळतंय ही गोष्ट दोघींना सहनीय नव्हती,आणि ही बाब अलीकडे सिद्धार्थच्या लक्षात आली होती... आजच्या प्रकाराने तर दोघींनी उघड उघड रोमाचा निषेध केला होता..... आई आणि बायकोची चिडचिड पाहून त्याने दोघींना हाताला धरून कोचावर बसवलं....
दोघीही नाराजीनं का होईना,सिद्धार्थच्या आग्रहाखातर तिथे बसून त्याचं ऐकू लागल्या.... दशरथराव सुद्धा येऊन सिद्धार्थच्या शेजारी बसले....
सिद्धार्थ आदितीकडे पाहत म्हणाला.... "अगं वेडाबाई.... तुझी चिडचिड कळते मला... पण रोमा म्हणजे फक्त यंत्र.... त्यापुढे काहीही नाही..... माझं तुझ्यावर प्रेम खूप प्रेम आहे,आणि तुझी जागा,किंवा माझ्या आयुष्यातील तुझं स्थान मी आणखी कुणाला कसं देईन...?"
लागलीच आईकडे पाहत तो म्हणाला.... "आई,अगं आदिती लहान आहे,ती अशी वागली मी समजू शकतो.... पण तू...? तू माझी जन्मदात्री आहेस आणि तुझं हे एकच ऋण मी फेडायचं ठरवलं तरी आयुष्यभर नाही गं मला जमणार ते.... तू असा कसा विचार केलास की रोमाच्या येण्याने मला तुझी गरज नसणार...?"
दोघी माना खाली घालून, मधेच चोरटा कटाक्ष सिद्धार्थ कडे टाकत ,खजील होऊन ऐकत होत्या....
"तुम्ही दोघी म्हणजे माझ्या घरच्या लक्ष्मी आणि अन्नपूर्णा आहात.... हे घर लखलखतंय,ते तुमच्या दोघींच्या तेजामुळे.... आई या दिव्याची वात आहे,जी नेहमी सर्वतोपरी पूरक आहे,पण तिचा संघर्ष,तिचं असणं सर्वांनाच जाणवत नाही.... आणि आदिती,ती म्हणजे या वातीची ज्योत आहे,जिच्या हसण्याने,बोलण्याने या घराचा कोपरानकोपरा उजळून निघाला आहे....."
पुढे दशरथराव म्हणाले.... "मीरा.... मला माहित आहे,मी तुला कधीच कुठल्या गोष्टीसाठी थँक्स किंवा धन्यवाद म्हणालो नाही, आणि रोमाला रोज म्हणतो.... त्याचं कारण म्हणजे,तू माझ्यासाठी जे काही केलंस,ते मी माझ्या हृदयात कोरून ठेवलंय, आणि त्याबद्दल थँक्स, आभार हे शब्द खूप तोकडे आहेत.....
या यंत्राची पूजा म्हणजे फक्त एक आभार प्रदर्शन आहे.... आणि त्याची तेवढीच मर्यादा आहे.... पण तुम्हा दोघींचं या घराला आणि आम्हाला, महत्व आणि गरज,असीम आहे.... तुम्हां स्त्रियांचं आभार आम्ही कधीच,कुठल्याच प्रकारे दर्शवू शकत नाही..... देवाने मुळातच स्त्री ही परिपूर्ण अशी तयार केली आहे.... मग आम्ही बिचारे पुरुषमंडळी,देवाच्या निर्मितीला काय म्हणून नावं ठेवणार.....?"
असं म्हणत त्यांनी मीराबाईंकडे पाहत एक लाडीक कटाक्ष टाकला,आणि मीराबाई चक्क लाजल्याच.....!
हे पाहून आदीतीलाही हसू आलं,आणि तीसुद्धा सिद्धार्थच्या गळ्यात पडली.....
इतक्यात मागून आवाज आला.... "प्लिज कंज्यूम द फूड बीफोर ईट गेट्स कोल्ड.... कृपया जेवण थंड होण्याआधी खाऊन घ्या...."
"अगं वेडे,बासुंदी थंडच खातात....." मस्करीने आदिती रोमाला म्हणाली....
सगळेजण जेवणासाठी स्वयंपाकघरात जायला उठले,आणि.....
.
.
रोमा सिध्दार्थने एकमेकांना डोळा मारला......!!!!!

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा