रुममेट भाग ५
©® सौ.हेमा पाटील.
मागील भागात आपण पाहिले, सुनीती दिवाळीच्या खरेदीच्या निमित्ताने पुण्याला आर्याकडे आली आहे. स्वीटीबाबत तिच्या मनात संशयाची सुई वळवळत आहे. आता पुढे...
सुनीतीला वाटणारी काळजी अगदी रास्त होती. आर्या पहिल्यांदा घरापासून दूर राहिली होती. तिला मिळालेली संगत योग्य आहे की नाही हे पारखून घेण्याची गरज होती. एक आई म्हणून सुनीती तिच्या जागी योग्य होती. यात मुलीवर गैरविश्वास दाखवणे नसून मुलगी योग्य मार्गावर आहे का हे ती तपासून पहाणार होती. हे ती आर्याच्या नकळत करणार होती. आपण तिच्या मैत्रिणीबाबत शंका घेतोय हे आर्याला समजता कामा नये याची काळजी ती घेणार होती.
शनिवार, रविवार तर शाॅपिंगमध्ये आणि बाहेर फिरण्यात गेला. सोमवारी आर्याला ऑफीसला जावे लागणार होते. पुढच्या आठवड्यात दिवाळी असल्याने इच्छा असूनही आर्या आत्ता सुट्टी घेऊ शकत नव्हती.
त्यामुळे ती सोमवारी सकाळी ऑफीसला गेली. घरात सुनीती एकटीच होती. तिने स्वतःसाठी पोळीभाजी बनवली. भांडी घासण्यासाठी मावशी येणार आहेत म्हणून भांडी गोळा करून ठेवली व ती बेडरुममध्ये आली.

तिने कपाट उघडले आणि आत एक नजर टाकली. आतमध्ये दोन्ही बाजूला कपडे होते. तिने एका बाजूचे कपडे थोडेसे उचकटले. ते कपडे आर्याचे आहेत हे तिच्या लक्षात आले. मग शेजारच्या बाजूचे कपडे तिने खाली वर केले. ते कपडे आर्याचे नाहीत हे तिच्या लक्षात आले म्हणून तिने त्यातले काही कपडे घड्या उलगडून पाहिले. त्यात बऱ्यापैकी टीशर्ट आणि शाॅर्टस् होते. आर्या टीशर्ट जीन्स वापरायची, पण शाॅर्टस् कधीच घालायची नाही. तसेच तिथे असणारी अंतर्वस्त्रे ही अधिक माॅडर्न होती. तिने ते कपडे परत होते तसे घड्या घालून ठेवले.
तेवढ्यात लॅच की ने दार उघडून मावशी आत आल्या. त्यांनी आधी भांडी घासायला घेतली. त्यांच्याशी सहज गप्पा मारतोय असे भासवत
सुनीती स्वीटीबाबत माहिती विचारत होती. थेट कसे विचारायचे म्हणून ती म्हणाली,
" या मुली खूप पसारा करुन ठेवत असतील ना? वस्तू जागच्या जागी ठेवण्यामुळे तुमचे काम वाढत असेल."
" तेवढं तर होणारच ना ताई. घरापासून लांब रहातात. त्यात दिवसभर नोकरी करतात. चालायचंच." मावशी म्हणाल्या.
" कपड्यांचा खूप ढिगारा धुवायला टाकतात का? मला सांगा, म्हणजे मी जाण्यापूर्वी सुचना देऊन जाईन त्यांना."
" नाही नाही. खूप ढिगारा नसतो. रोज दोघींचा एकच ड्रेस असतो. रविवारी मात्र जादाची कपडे असतात. बेडशीट, उशांचे अभ्रे. रविवारी कपडे तीन बादल्यांमध्ये भिजवलेले असतात." मावशी म्हणाल्या.
" तीन? तीन बादल्या कपडे म्हणजे खूपच झाले हो." सुनीती म्हणाली.
" तीन बादल्या भरुन कपडे नसतात हो. रोज दोन बादल्यांमध्ये भिजवलेले असतात. रविवारी बेडशीट अन् जादाचे कपडे तिसऱ्या बादलीत असतात."
" रोज दोन बादली कपडे?कसे शक्य आहे?" सुनीती म्हणाली.
" दोन बादल्या भरुन कपडे नसतात हो... दोघी मुलींचे कपडे वेगवेगळ्या बादल्यांमध्ये भिजवलेले असतात. असतो एकेकच ड्रेस, पण कधीच एकत्र भिजवलेले नसतात." मावशी म्हणाल्या.
" हे डोके नक्कीच आर्याचे असणार. हायजेनिक स्वच्छता." किती ती आईला लेकीबाबत खात्री!

मावशी म्हणाल्या,
" ते मला नाही माहित, पण रविवारी स्वयंपाक बनवताना खूप भांडी काढते आर्या."
" आणि स्वीटी? ती अगदी काटेकोरपणे काम करते का?" सुनीतीने प्रश्न
विचारला.
" मी नाही पाहिले तिला. तिचे कपडे तेवढे धुवायला असतात. सकाळी मी येते तेव्हा दोघीही नसतात. शनिवारी रविवारी ती तिच्या गावच्या घरी गेलेली असते किंवा बाहेर गेलेली असते. त्यामुळे मला अजून भेटलीच नाहीय ती." हे ऐकून सुनीती संभ्रमात पडली.

मावशींकडून स्वीटीबाबत माहिती मिळेल असे तिला वाटत होते. त्यांनी तर स्वीटीला अजून पाहिले सुद्धा नव्हते. घरात येणारी तेवढीच व्यक्ती होती. गेल्या दोन महिन्यांपासून स्वीटी इथे रहायला आली होती. तरीही आजपर्यंत त्यांनी स्वीटीला पाहिले नाही याचे तिला आश्चर्य वाटले.
मावशी कामे उरकून गेल्यावर तिने परत कपाट उघडले. कपाटात स्वीटीच्या कप्प्यात एक मेकअप बॉक्स तिला सापडला. मेकअप बॉक्स ही काॅमन गोष्ट आहे. आजकाल कुणीही वापरते असा विचार तिच्या मनात आला. अचानक तिच्या मनात आले,
" नक्की स्वीटी ही मुलगीच आर्यासोबत रहातेय ना? की एखादा मुलगा...."
हा प्रश्न मनात आला आणि ती हादरली. जन्मापासून आपल्या सोबत असलेल्या मुलीला आपल्यापासून दूर येऊन चार महिने झाले नाहीत तर आपल्या मनात या कसल्या शंकाकुशंका येऊ लागल्या आहेत? आपला नेमका काय प्राॅब्लेम आहे? मुलगी आपल्यापासून दूर राहूनही आनंदात आहे याचा आपल्याला त्रास होतोय? तिचा आनंद शोधण्याच्या नादात तिला बदफैली ठरवण्यापर्यंत आपली मजल गेली?
मुलगी दूर आली की तिच्यावरील आपला विश्वास लगेच डळमळीत झाला? आपण तिच्यावर केलेल्या संस्कारांवर आपलाच विश्वास नाही असाच याचा अर्थ झाला. स्वतःला दूषणे देत तिने कपाट परत होते तसे लावले व ती हाॅलमध्ये येऊन बसली.

तरीही अधूनमधून तिच्या डोक्यात तो विचार येतच होता. रिकामे मन सैतानाचे घर आहे असे म्हणतात. तिने माधवरावांना फोन केला व तिच्या मनात आलेला विचार बोलून दाखवला. त्यांनी सुनीतीलाच चार शब्द सुनावले. तू तिथे ज्या कामासाठी गेली होतीस ते उरकले असेल तर निघून ये असे तिला सांगितले.
सुनीती द्विधा मनःस्थितीत सापडली. माधवराव म्हणतात तसे माघारी जायचे की स्वीटी गावावरुन येईपर्यंत इथेच थांबायचे? तिने मनाशी निश्चय केला की स्वीटीला भेटूनच जायचे. दोन दिवस उशीर होईल कलेढोणला परतायला, पण मनात आलेली शंका दूर करुन जाऊ असे तिने ठरवले.
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.
काय होईल पुढे? सुनीती स्वीटीला भेटेल? की सुनीतीची भीती खरी ठरेल? हे समजून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.
अष्टपैलू लेखक स्पर्धा - २०२५
अष्टपैलू लेखक स्पर्धा - २०२५