रुममेट भाग ८
©® सौ.हेमा पाटील.
मागील भागात आपण पाहिले, सुनीतीने हरप्रकारे स्वीटीबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला, पण तिला काहीच समजले नाही. स्वीटीचा नंबर मिळाला, पण तिने फोन उचलला नाही. आता पुढे....
माधवरावांनी तिच्याकडे स्वीटीचा नंबर मागितला. तो नंबर घेऊन त्यांनी त्यांच्या बॅंकेच्या लॅंडलाईनवरुन फोन केला, तरीही कुणीच फोन उचलला नाही.
तो नंबर कुणाचा आहे हे शोधण्यासाठी काय करावे असा प्रश्न त्यांना पडला. तेवढ्यात त्यांच्यासमोर त्यांचा इन्स्पेक्टर मित्र दिपक दत्त म्हणून उभा राहिला.
" काय रे, आज इकडे कुठे?" माधवरावांनी विचारले.
" अरे, थोडी गुंतवणूक करायची आहे. कुठे करावी असा प्रश्न पडला म्हणून तुझ्याकडे आलोय." असे इन्स्पेक्टर दिपक म्हणाले.
" किती दिवसांसाठी गुंतवायचे आहेत? लाॅंग टर्म साठी गुंतवायचे असतील तर एस. आर. पी. कर असा सल्ला मी देईन." याबाबत दोघांची सखोल चर्चा झाली. त्यानंतर माधवरावांच्या लक्षात आले की, तो मोबाईल नंबर कुणाचा आहे याचा शोध इन्स्पेक्टर दिपक घेऊ शकतात. त्यांनी तशी रिक्वेस्ट केली, पण तो नंबर कुणाचा आहे हे कशासाठी हवे आहे यामागील सत्य सांगितले नाही. इन्स्पेक्टर दिपक म्हणाले,
" आत घेऊ का त्याला? त्रास देतोय का कुणी ब्लॅंक काॅल करुन?"
" नाही नाही. तसे काही नाही. फक्त नाव हवे आहे. तेही जमले तर..."
उगाच काॅम्लिकेशन्स नकोत म्हणून माधवराव घाईघाईने म्हणाले.
इन्स्पेक्टर दिपक म्हणाले,
" ठीक आहे. संध्याकाळपर्यंत कळवतो."
संध्याकाळी इन्स्पेक्टर दिपक यांनी फोन केला आणि जे काही सांगितले ते ऐकून माधवराव चाट पडले. तो मोबाईल नंबर आर्याच्या नावावर होता.
घरी आल्यावर सुनीतीला त्यांनी हे सांगितले. तिलाही खूप आश्चर्य वाटले. आर्याने दुसरा नंबर कशासाठी घेतला असावा? बरं घेतलाय तर त्या मोबाईल नंबरवर स्वीटीला फोन का करत होती? की आर्याने स्वतःच्या नावावर स्वीटीला मोबाईल सीमकार्ड घेऊन दिले आहे?

सुनीतीच्या मनात नाही नाही ते विचार येऊ लागले.
' ही स्वीटी काही वेडेवाकडे धंदे तर करत नाही ना? नोकरीच्या निमित्ताने शहरात रहाणारी तरुण मुले अंमली पदार्थांची तस्करी करतात. अशी एक टोळी अलिकडेच पकडल्याचे तिने टिव्हीवर बातम्यांत पाहिले होते. आर्याच्या नावावर असलेला मोबाईल नंबर वापरून स्वीटी जर असे काही करत असेल तर स्वीटी नामानिराळी राहिल आणि आर्या गोत्यात येऊ शकते.'
हा विचार तिने माधवरावांना बोलून दाखवला आणि ते दोघेही हादरले. सुनीती म्हणाली,
" मी तिच्यासोबत पुण्याला जात होते तर तुम्ही मला जाऊ दिले नाही. आता काय वेडेवाकडे झाले तर...?"
माधवराव म्हणाले,
" बुधवारी ती गावी येणार आहे ना, तेव्हा याचा सोक्षमोक्ष लावून टाकू. ती सुट्टी वरुन परत जाताना तूही तिच्यासोबत पुण्याला जा. आता काय चार दिवस राहिलेत."

सुनीतीलाही ते योग्य वाटले. त्यामुळे ती दिवाळीच्या तयारीला लागली. बुधवारी आर्या कलेढोणला आली. दिवाळीचे चार दिवस आनंदात गेले. माधवरावांनी आर्यावर बारकाईने लक्ष ठेवले होते, पण त्यांना तिच्या वागण्यात काही वावगे आढळले नाही. तिला कुणाचे फोनही आले नाहीत.
भाऊबीजेदिवशी पप्पांसोबत शेतात गेलेली असताना माधवरावांनी आर्याला विचारले,
" आर्या, तुला दुसरा मोबाईल घ्यायचा आहे का? तुझे माॅडेल जुने झाले आहे. ड्युएल सीमचा ऑप्शन असलेला मोबाईल घेऊया."
" नको , काही गरज नाही मोबाईल बदलायची. माझ्या मोबाईलमध्ये ती सिस्टीम आहे. मोबाईलही व्यवस्थित चालतो."
"तुला कंपनीसाठी वेगळा नंबर आणि घरासाठी वेगळा नंबर घ्यायचा का?" माधवरावांनी आपला हेका सोडला नाही.
" नाही, मला गरज नाही."
" मग तू दुसरे सीमकार्ड कशासाठी घेतले आहेस? त्यावर फोन केला तर फोनही उचलत नाहीस." माधवराव असे म्हणताच आर्या म्हणाली,
" मी कुठे दुसरे सीमकार्ड घेतलेय? एकच तर आहे. "

"तू स्वीटीला तुझ्या नावावर मोबाईल सीमकार्ड घेऊन दिले आहेस का? असे कुणाला आपल्या नावाचा वापर करु देऊ नये. त्याचा गैरवापर झाला तर तू गोत्यात येऊ शकतेस."
"स्वीटी तशी मुलगी नाही. ती माझी खूप काळजी घेते. मम्मीसारखी. तिच्यामुळेच मी तुम्हांला दिलेले वचन पाळू शकलेय. ती माझ्या आयुष्यात आली नसती तर मी मम्मीशिवाय राहू शकले नसते."
हे ऐकून माधवराव संभ्रमात पडले.
" स्वीटी तुझ्यासोबत रहाते? तुझ्या रुममध्ये?"
" हो पप्पा."
" मम्मीला भेटली नाही ती."
" ती गावी गेली होती तेव्हा."
" मग आता तुला सोडायला मी येतो. माझी आणि तिची भेट होईल."
" तुम्हांला तिला का भेटायचे आहे?"
" काही नाही बेटा. असेच. आपल्या मुलीची रुममेट कोण आहे ते माहीत असावे म्हणून." माधवराव म्हणाले.
यावर आर्याने काहीच उत्तर दिले नाही.
आर्या मोबाईल चार्जिंगला लावून शेतात गेली होती. सुनीतीने मोबाईल चेक केला. तिला मोबाईल वर दोन वाॅटसअप सापडले. दुसऱ्या वाॅटसअपवर फक्त एकच अकाऊंट होते...Tee या नावाने. सुनीतीने चॅटिंग पाहिले तर गेल्या दोन महिन्यांपासून आर्या आणि स्वीटीचे चॅटिंग दिसत होते. अगदी गुडमाॅर्निंगपासून ते जेवली का? झोपली का? पर्यंत. आता मात्र सुनीती भांबावली.

' आम्ही दोघी रुममेट आहोत असे आर्या म्हणतेय, मग दोघींचे दिवसभर ते झोपेपर्यंत वारंवार चालणारं चॅटिंग कसे आहे? याबाबत आता तिला विचारलेच पाहिजे' असे सुनीतीला वाटले.
शेताकडून आल्यावर आर्याने मोबाईल घेतला आणि ती स्वतःच्या रुममध्ये गेली. सुनीतीने माधवरावांना चॅटिंगबाबत सांगितले. ते ऐकून माधवरावही चक्रावले. नेमके काय करावे त्यांना समजेना.
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.
काय होईल पुढे? आर्या अशी का वागतेय? की सुनीतीचा काही गैरसमज होतोय?
अष्टपैलू लेखक स्पर्धा - २०२५
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा