हृदयस्पर्शी

कोरोना काळातील एक हृदयाला भिडणारी कहाणी... कोरोनामुळे दुरावा आणि त्यातून निर्माण झाली एक कहाणी.. अगदी हृदयाला भिडणारी कहाणी.


   


   
         समोर tv वर सारख्या त्या कोरोनाच्या बातम्या चालू होत्या... पण साक्षी चे लक्ष मात्र दरवाजकडे लागले होते... कधी गाडीचा हॉर्न वाजेल दारावरची बेल वाजल्यावर मी लगेच जाऊन दरवजा उघडेल... आणि त्याला समोर पाहीन...??


         लग्न होऊन जेमतेम पंधरा दिवस झाले असतील, आणि लगेच सुहास ला इमर्जन्सी वॉर्ड मध्ये ड्युटी लागली होती... म्हणून दुसऱ्याच दिवशी त्याला कामाला हजर राहावे लागले... नव्या नवरीला सोडून जाणे त्याला ही फार जड जात होते पण ड्यूटी पुढे काहीच म्हहत्वाचे नव्हते..
आज पंधरा दिवस झाले आणि तो येणार म्हणून साक्षी चीतकाप्रमाणे वाट पाहत होती...



        साक्षी सुहास ची वाट पाहत तिच्याच विचारात हरवलेली होती..
तीन वर्षापूर्वी ती इंजिनिअरिंग च्या दुसऱ्या वर्षाला होती... अचानक पडल्याने पायाला दुखापत झाली म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले...
तिची ट्रिटमेंट साठी एक हँडसम ,  कूल डॉक्टर आला.. त्याला पाहताच साक्षी हँग झाली.. नक्की काय दुखते आहे हेच कळत नव्हते?

       ट्रीटमेंट करून डॉक्टर गेले तरी ही अजूनही त्याच्या कडेच पाहत होती...

नंतर साधारणता आठवड्यातून दोन वेळा नक्की साक्षी आजारी पडत होती, आणि ट्रिटमेंट साठी त्याच हॉस्पिटलमध्ये आणि डॉक्टर सुहासच पाहिजे होते तिला... त्यासाठी ती सगळे हॉस्पिटल डोक्यावर घेत असे...


    आज सुहास हसतच opd मध्ये आला... आणि साक्षी ला चेक करु लागला...
बर मॅडम तुमचा वेळ पैसा याचा आपण सदुपयोग करूया का.... सुहास म्हणाला... साक्षीने चमकून त्याच्या कडे पाहिले... नक्की काय बोलतोय हेच कळले नाही तिला...

सुहास ने हसत तिला विचारले... स्पष्टच बोलतो मी आता...    रोज इथे येऊन वेळ घालवण्यापेक्षा , एक काम करा लग्न करा माझ्यशी म्हणजे तुमचा खर्च आणि माझा वेळ वाचेल इथला....  डॉक्टर सुहास हसत म्हणाले.


        खरंच बोलताय ना तुम्ही साक्षी ने अविश्वासाने विचारले..

        हो खरं बोलतोय, एवढे सुंदर पेशंट रोज मला भेटण्यासाठी आजाराचे नाटक करते... मग आज जे काही आहे ते फायनल करूनच टाकू की.... डॉक्टर सुहास.


         साक्षी ला तर आता आनंदाला पारावर उरला नव्हता... तिचा ड्रीम बॉय आज चक्क तीला प्रपोज करतो आहे.... मॅडम तर हवेतच होत्या....

    त्यानंतर भेटी गाठी वाढल्या... फिरणे हिंडणे, दिवस दिवस फोन अश्यांने ते मनाने एकमेकांच्या जास्त जवळ आले...
घरी ही सांगितले, घरात कोणालाच काहीच प्रॉब्लेम नव्हता.. दिघेही आपल्या आपल्या पायावर उभे होते.. स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वतंत्र त्यांना होते..

        तीन  वर्ष झाले ते रिलेशनशिप मध्ये होते... दोन्ही घराणे अगदी टोलेजंग लग्न करूयात म्हणून थांबले होते... कोरोना काळात ते शक्य नव्हते म्हणून वाट पाहण्याखेरीज कोणाकडेही काही पर्याय नव्हता...
शेवटी वर्षभराने,  ना राहून साधे लग्न उरकून घेण्याचे ठरवले... हे कोरोना नावाचे सावट कधी संपणार हे कोणीच सांगू शकत नाही ना..?


      लग्न झाले स्टाफ कमी पडला म्हणून सुहास ला लगेच ड्युटी जॉईंट करायला लागली..
आणि साक्षी पुढे फक्त एकच पर्याय होता वाट पाहणे...
          ती तिच्या विचारात हरवलेली असताना अचानक फोन वाजला आणि तिची तन्द्री भांग पावली... आणि तिने कसाबसा कॉल उचलला..

    हॅलो...

    साक्षी मी बोलतोय ग सुहास.. आवाजात फार जड पणा आला होता सुहसच्या.


   सुहास, कुठे आहात तुम्ही मी वाट पाहत आहे ना तुमची... आठवडा झाला तुम्ही साधा कॉल पण नाही केला मला... साक्षी भावुक होत बोलली.


    साक्षी कदाचीत मी नाही ग घरी येऊ शकत कधीच... मला स्वतः कोरोना झालाय,  आज मलाच बेड नाही मिळत आहे... माझी ट्रीटमेंट मध्ये हलगर्जीपणा मुळे कदाचित हा आपला शेवटचा कॉल असेल... मला व्हेंटिलेटरवर लावणार आहेत मग कोणाशी बोलू ही शकणार नाही.. मला माफ कर साक्षी मी शेवट पर्यंत तुझी साथ नाही ग देऊ शकत... मला या जगाचा लवकरच निरोप घ्यावा लागणार आहे, हे सत्य आहे... मला तेव्हढे तर कळले आहे.. तुला माझे शेवटचे तोंड ही पाहायला नाही मिळणार.. पण तुझी लाईफ माझ्यासाठी खर्च नको करुस... अजून आपण एक पण नाही झालो तरी हे असावं घडावे,  आपल्या नशिबात आपली साथ एव्हडीच होती बहुतेक...

सुहास मी कायम तुमची आहे हवं लक्षात ठेवा..

काळजी घे.... एवढे बोलून सुहास चा कॉल कट झाला.. आणि साक्षी ने आपल्या जीवनाची दोर संपवली... आणि सुहास च्या आधी या जगाचा नोरोप घेऊन पुढे गेली...


( ही घटना सत्य आहे... या कोविड नामक अदृश्य राक्षसाने, खुप कुटुंब उध्दस्त केली आहे.. बरेच लोक बेरोजगार झाले तर काही या जगाचा निरोप घेऊन गेले..
आपल्याच हातात आहे आता ही परिस्थिती बदलण्याचे कार्य... आपण घरात राहू या,  नियम पाळून जा राक्षसाला आपल्या जा जगातून कायमचे घालवूया...

stey safe.. stey healthy?

🎭 Series Post

View all