मानसी आई होणार आहे म्हणून फार आनंदी राहत असे तिला आता कोणी काहीही बोलले तरी ती शांत राहत असे तिला मनात वाटायचं की मी दुखी राहील तर त्याच्या परिणाम माझ्या बाळावर होईल म्हणून ती सासुबईची सगळी टोमणे अयकुन सुध्दा शांत राहायची . सासूबाई आणि सासरे पणं बाळाला घेऊन फार आनंदी होते ते आजी आजोबा होणार आहेत म्हणून ते येणाऱ्या नवीन पाहुण्याची आतुरतेने वाट पाहत होते .. सासूबाई किती पणं आनंदी असल्या तरीही ही त्याच्या मनात मानसी विषयी राग, द्वेष होताच म्हणून त्या तिच्या शी ह्या अवस्थेत पणं घरची सर्व कामे करून घेत ,
असच एक दिवस मानसी आईला बोलली , आई मला आज जरा जास्तच अस्वस्थ वाटत आहे सकाळ पासून खूप उलट्या होत आहे तर आज अजय ला म्हणून बाहेरूनच जेवण बोलुन घेऊ.. मला आज इच्छा नाही बनवायची , तशीच सासू बाई जोरात तिच्यावर खेखसवत म्हणतात आम्ही ने काही लेकरं जन्मला नाही घातली काय, आणि अश्या अवस्थेत बाहेर च जेवन बाळासाठी योग्य नाही , आणि तसं ही काम करत राहिल्या ने डिलिवरी नॉर्मल होते बाळाची हालचाल होते अशी काही कारणे देऊन सासूबाई ने तिला गप्प केलं.
माणसीच पणं पाहिलं बाळ असल्या कारणाने तिला तितक काही समजत नव्हत म्हणून ती पणं सासू जस सागील तस् करत असे .
सासूबाई ला भीती होती की बाळ मानसी सारखं होईल म्हणून त्या तिची खाणपेण्याची विशेष काळजी घेत , तिला रोज केशर टाकून दूध प्यायला देत पणं मानसी मात्र प्यायलं नकार देत कारण तिला दुधाचा वास यायचा , तिला दुध पिता बरोबर उलट्या होत आणि पूर्ण दुध बाहेर , कधी कधी तर तिला जेवण करायची पणं इच्छा होत नसे , तिला जेवणाचा सुध्दा वास यायचा , ती थोड फळ खाऊन झोपी जायची सासू ला मानसीचा फार राग यायचा आणि ते तिला जबरदस्ती भरवयच्या पणं ती उलट्या करते म्हणून ते रोज तिच्यावर रागवायच्या , आणि मनायचे की सगळ तू मुद्दाम करत आहे तुला अजय सारखं बाळ नको व्हावं असच वाटत ना म्हणून नाटक करत आहेस ना.. असे आरोप तिच्या वर लावायचे , मानसी मनात फार दुखी व्ह्याची पणं तिची कोणीच परिस्थिती समजून घेत नसत.
अजय पणं आता आपल्या कामत चागलाच वेस्थ झाला होता तो रात्री नेहमी उशिराच यायचा समोरील तीन महिने , त्याला मानसी आई होणार आहे माहिती असून सुध्दा तो आपला थकवा मानसी वर काढायचा , पणं जसे जसे दिवस जात होते मानसीची अवस्था फार गंभीर होत होती , अजय थोडा वेळ कामातून वेळ काढून मानसीला डॉक्टर सुलभा कडे घेऊन जायचा डॉक्टर नेहमी अजय ला सांगत की मानसी ला घरची कामे करू नका देऊ तिला रक्ताची कमी आहे , पायावर पणं चागलीचं सुजण आली आहे आणि मी कितीही औषादी दिले तरी डिलिवरी झाल्यावरच सुजण कमी होईल म्हणून अजय ला सांगत , अजय पणं हो म्हणून तिला हॉस्पिटल मधून चेकप करून आणल्यावर डॉक्टरांनी जे सागितलं ते आई ला सागायचा पणं आई त्याला समजावून सांगायची , अरे हे डॉक्टर आजकालचे असेच काही काही सागतात पैसे कमावण्यासाठी सिजर डिलिवरी व्हावी म्हणून... चागलं हॉस्पिटल च बिल बनाव म्हणून , बाकी काही नाही.. काम करत राहील तर नॉर्मल डिलिवरी होईल बघच ,असे काही सांगुन ते अजयच्या मनात भरवत त्याला पणं आईच्या सागण्यावर विश्वास होत असे. म्हणून तो पणं डॉक्टरांच्या बोलण्यावर लक्ष द्यायचं नाही , आणि आपल्या कामावर निघून जायचा , मानसी ला अजयचा फार राग यायचा पणं ती सांगेल तरी कोणाला , म्हणून ती शांत राहायची.
असच करता करत मानसीला सातवा महिना लागतो , सातवा महिना संपण्याच्या दहा दिवसा आदी , सासुबाईची इच्छा नसून सुध्दा मानसीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आखला , कारण त्यांची इच्छा होती की येणाऱ्या बाळाला खूप सारे आशीर्वाद मिळो , म्हणून त्यांनी कमी खर्चात कमी लोकांमधे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम घरातच करून घेतला .
अगदी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम झाला त्याच्याच चौथ्या दिवशी च मानसीला रात्री अचानक पोटात खूप दुखायला लागतो , ती जोरा जोरात ओरडत असते, रडत असते तसच अजय खडबडून जागा होतो , आणि आई बाबांना उठवतो , सासूबाई त्यांच्या रूम मध्ये येतात, मानसीला कडा सुटला आहे हे त्यांना कळत पणं ते सातव्या महिन्यात बाळ नको म्हणून त्यांना मनात वाटत म्हणून ते तिला म्हणतात , अग होत कधी कधी दुख्न थोड बाईच्या जातीने सहन करावं थोडा वेळ दुखेल ,आणि मग बंद होईल झोपून जा आता , अस म्हणून ते त्यांच्या रूम मध्ये निघून जातात , मानसी मात्र तडफडत असते , तिला आताच बाळ होतो की काय वाटत असते , अजय तिला शांत करत म्हणतो , मानसी आई मनालीना की होत कधी कधी , शांत झोप तू मला पणं फार थकल्यासारखे वाटत आहे मी पणं झोपते , अस म्हणून अजय चादर डोक्यावर घेऊन झोपी जातो, तरी सुध्दा मानसी जोर जोरात रडत असते देवाला आठवण करत असते मनात प्रार्थना करत असते , अजय ला आता तिच्या रडण्याचा आवज सहन होत नाही आणि तो उठून तिला जरा रागावतो , पणं आता त्याचा रागवण्याचा पणं काही परिणाम होत नाही , आणि तो तिच्या कडे लाईट लाऊन बघतो तर मानसी घामाघूम झाली असते फार थकली असते , रडत असते तो तिला गाऊन खालून ओला का झाला आहे म्हणून तो थोडा वाकून बघतो तर तिची गर्भजल पिशवी फुटली असते , तसच तो आई ला जोरात आवाज देऊन बोलवतो आणि आई ला बघायला सांगतो, सासूबाई सगळ समजून जातात आणि आता त्यांना पणं चाग्लीचं भीती वाटायला लागते म्हणून ते आताच्या आता हॉस्पिटल मध्ये घेऊन चल म्हणतो. तसच अजय गाडी काढून मानसीला हॉस्पिटल मध्ये घेऊन जातो , आणि गाडी चालवत तो डॉक्टर सुलभा ला कळवतो , आणि काय कंडीशन आहे मानसीची सगळी माहिती देतो , डॉक्टर सुलभा पणं तत्काळ हॉस्पिटल मध्ये पोहचतात. थोड्याच वेळात अजय मानसीला घेऊन हॉस्पिटल मध्ये येतो , डॉक्टर ने आदीचं ऑपरेशन ची तयारी करून ठेवली असते , म्हणून तिला तत्काळ हॉस्पिटल मध्ये आणल्यबरोबर ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात येत , माणसीची अवस्था पाहून डॉक्टर सुलभा अजय कडे एक रागाचं कटाक्ष टाकून पाहत ऑपरेशन थिएटरमध्ये मध्ये जातात.
काही वेळात डॉक्टर बाहेर येतात आणि अजय वर जोरात रागवत म्हणतात, मिस्टर अजय सागितलं होत ना मी की तिला रक्ताची कमी आहे , नाजुक जीव आहे तिचा काळजी घ्या म्हणून , पणं तुम्हाला तर काही चिंताच दिसत नाही स्वतच्या बायकोची , कशे पुरुष आहात तुम्ही , - डॉक्टर सुलभा..
अहो डॉक्टर आम्ही बरोबर काळजी घेतली तिची पणं माहिती नाही तिला अचानक काय झाल तर - अजय जणू खूप काळजी घेतली असा चेहरा करून बोलतो..
काळजी घेतली की नाही ते दिसतच आहे मला , पणं तुम्ही तिला आता किती वेळाने घेऊन आले आहेत हॉस्पिटल मध्ये, जेव्हा ती पूर्ण पने थकली आहे तेव्हा, किती त्रास सहन केला असेल तिने थोडी पणं दया नाही आली काय तुम्हा सगळ्यांना , मला तर खरच आश्चर्य होत आहे की तीने इतकी वेळ सहनच कस केल... खूप धीराची आहे तुमची बायको आणि सहनशील पण , आता मला आणखी काही बोलायचं नाही आहे डायरेक्ट सागते सीजर करावं लागेल ती पूर्ण पने थकली आहे आता तिच्यात थोडी पणं ताकत उरली नाही सो तुम्ही ह्या पेपर्स वर सई करा, आणि त्या नर्स ला द्या मी सिजरची तयारी करते. इतकं बोलुन डॉक्टर रागात बाहेर जातात, अजय ला काय होत आहे काहीच कळत नाही आणि तो एक नजर त्याच्या आई कडे बघतो , त्याची आई पणं थोड तोड वाकड करतात सिजरच्या नावाने , पणं आता अजयचा नाईलाज झाल्याने तो पेपर्स वर सई करतो, आणि त्या नर्स ला देतो.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा