Login

रूप ? भाग ४

I am reader but I try write something

दादा बघा ना माझ्या मुलीला किती ताप आला आहे... - मानसी
ताई तुम्ही रडा नको मी साहेबांना  फोन करतो ते मॉर्निंग वॉक ला गेले आहेत..- शंकर.
लवकर बोलवा प्लीज ... - मानसी

सकाळचे नऊ वाजले असतात विवेक पहाटेच मॉर्निंग वॉक ला गेला असतो.. अजुन आला नसतो.. मानसी रडत रडत खाली शंकर जवळ येते.. आणि तिच्या मुलीला ताप आला आहे सगत असते.. शंकर मानसी ला धीर देत असतो.. आणि विवेक ला फोन करतो म्हणून बोलतो....  आणि मानसी पुन्हा रडत रडत प्राची जवळ रूम मध्ये येते..

साहेब तुम्ही आलात मी आता तुम्हालाच फोन करत होतो..- शंकर..
काय झालं शंकर इतका का घाबरला आहेस.. आणि त्या मॅडम उठलाय काय.. - विवेक..
हो साहेब त्या ताई उठल्या .. पणं त्यांच्या मुलीला खूप ताप आला आहे तर त्या खूप रडत आहेत..- शंकर..
काय.. ताप आला आहे तू मला आदी का नाही सागितलं.. - विवेक.
साहेब ते मला पणं त्यांनी आताच सागितलं.. म्हणून मी आता तुम्हालाच फोन करत होतो.. - शंकर..
ठीक आहे ते जाऊ दे तू डॉक्टर ला फोन करून बोलावून घे.. आता हॉस्पिटल ला नाही नेऊ शकत.. बाहेर पाऊस सुरू झाला आहे आणि जोराचा वारा पणं वाहत आहे.. तर तू पटकन बोलावून घे आणि अर्जंट आहे म्हणा साहेबांनी सागितलं आहे अस स्पष्ट पने साग.. मी बघतो त्या मॅडम ला .. आणि एक काम कर थंड पाण्याचं पट्टी घेऊन ये रूम मध्ये.. - विवेक..
ठीक आहे साहेब.. - शंकर.

बाहेर पाऊस सुरू झाल्याने ने विवेक घरी लवकर आला असतो.. आल्या आल्या शंकर त्याला प्राची ला ताप आला आहे म्हणून सांगतो ..आणि मानसी पणं रडत आहे बोलतो.. विवेक ला पणं थोड शॉक होतो.. आणि तो तातडीने डॉक्टरला बोलावं म्हणून शंकर ला बोलतो.. आणि थंड पाण्याचं पट्टी घेऊन शंकर ला यायला सांगतो..शंकर पणं हो म्हणून डॉक्टर ला फोन लावून बोलावून घेतो आणि थंड पाण्याचं पट्टी आणायला जातो .. ईकडे विवेक मानसीच्या रूम मध्ये येतो..

सर बघा ना माझ्या मुलीला किती ताप आला आहे आणि बोलत पणं नाही आहे.. - मानसी रडत रडत बोलते.
एक मिनिट मॅडम तुम्ही आदी रडण बंद करा बरं.. आणि काही नाही होत मी डॉक्टरांना बोलावलं आहे.. ते येतीलच थोड्यावेळात .. - विवेक मानसी ला शांत करत प्रचीचा कपाळावर हात ठेऊन ताप चेक करत बोलतो..
साहेब येऊ का..?- शंकर..
हो ये शंकर.. आणला काय पट्टी - विवेक
हो साहेब हे घ्या..- शंकर थंड पाण्याचं पट्टी देत बोलतो..
ठीक आहे तू दोन चहा पाठव.. राजू आला असेल तर त्याच्या हातात.. - विवेक
बरं.. साहेब.. - शंकर ठीक आहे म्हणून किचन मध्ये येतो..
हे घ्या ह्या पट्ट्या तिच्या कपाळावर ठेवा डॉक्टर येतील तेव्हा पर्यंत.. थोडं बरं वाटेल तिला आणि ताप पणं कमी होईल.. - विवेक मानसी ला पट्ट्या देत बोलतो.

मानसी पणं मानेनेच होकार देत त्या पट्या घेते आणि प्राचीच्या कपाळावर ठेवते.. तेव्हाच तिथे शंकर डॉक्टर ला घेऊन रूम मध्ये येतो..
बोला कलेक्टर साहेब काय झालं इतकं अर्जंट बोलावलं..- डॉक्टर
डॉक्टर मला काही नाही झाल.. ह्या मुलीला बघा.. ताप आला आहे.. - विवेक

मानसी बेड वरून बाजूला होत.. डॉक्टरांना बसायला जागा देते.. डॉक्टर.. प्राची ला चेक करत .. एक इंजेक्शन देतात.. तशीच प्राची रडायला लागते.. मानसी तशीच प्राची जवळ येत तिला परसवत असते.. आणि काही नाही होत म्हणून तिला शांत करते..

मुलगी पाण्यात भिजली होती काय.. - डॉक्टर मानसी ला विचारतात..
हो ते काल आम्ही घरी जात असताना भिजली होती आणि थंडी पणं भरली होती.. तिला - मानसी
ह्म्म.. म्हणून ताप आलाय .. ठीक आहे काही काळजी च कारण नाही इंजेक्शन दिला आहे मी थोड्यावेळाने उतरेल ताप .. काही औषधी दिले लिहून मागून घ्या आणि थोड हलकं जेवण देऊन द्या औषधी..- डॉक्टर..
मानसी मानेनेच होकार देते.. आणि प्राची ला शांत करण्यात लागते..
डॉक्टर बाहेर येतात.. आणि त्यांच्याच मागे विवेक पणं येतो..
काय डॉक्टर बरी आहे ना ती.. - विवेक
हो ठीक आहे पण आता तिला पाण्यात भिजू नका देऊ आणि .. थोडी काळजी घ्या लहान आहे ती निंबोनिया होण्याची भीती आहे.. तिच्या आई समोर नाही सागितलं मी उगाच घाबरतील म्हणून कारण त्या आधीच घाबरले दिसत होते..  - डॉक्टर..
ठीक आहे डॉक्टर .. घेऊ काळजी आम्ही.. thanku you..- विवेक
बरं येऊ काही लागलं तर फोन करा.. - डॉक्टर
ठीक आहे..- विवेक.
डॉक्टर प्राची ला चेक करून निघून जातात आणि
विवेक पुन्हा रूम मध्ये येतो.. मानसी प्राची ला झोपवत असते..  तेव्हाच राजू चहा नाश्ता घेऊन येतो..
साहेब चहा..- राजू
अरे आला तू राजू.. आन ठेव तिथे - विवेक
हो साहेब.. तुम्ही ऑफिस ला येत आहेत ना..- राजू
एक मिनिट सागते.. - विवेक राजू ला थांबत बोलतो..

मॅडम तिला झोपवा नको एक काम करा आदी तिला हा हलकासा उपमा खाऊ घाला.. आणि शंकर ने औषधी आणली आहेत ते द्या मग झोपी घाला तिला.. - विवेक मानसी ला म्हणतो..
तशीच मानसी हो म्हणून प्राची ला उपमा भरुन देत असते..
विवेक राजू ला घेऊन खाली येतो.. आणि म्हणतो
हा तर राजू काय म्हणाल तु ..- विवेक
साहेब तुम्ही ऑफिस ला येत आहेत काय  म्हणालो - राजू
ह्म््म आज नाही येत सुट्टी घेतो .. मी सीमा ला कडवल आहे .. मेसेज करून ती बघेल सर्व आजच्या दिवस.. - विवेक
ठीक आहे साहेब मग येतो मी .. ऑफिस मध्ये जातो सीमा मॅडम ला काही मदत करतो..- राजू
ठीक आहे जा आणि काही गरज पडली तर फोन कर ... आणि हो ते शिवाजी नगर चा रस्ता सुरु झालं काय बग बर.. मना सीमा ला  नगरपरिषद मध्ये इनकवायरी करून..  आणि मेसेज करून कडव.. म्हण - विवेक
हो साहेब... लगेच कळवायला सांगतो...- राजु

राजु विवेक सोबत बोलुन लगेच निघतो ... पाऊस आता पणं सुरू असतो.. वारा थोडा कमी झाला असतो.. तशीच मानसी तिच्या मुलीला कडेवर घेऊन खली येते.. विवेक डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करत असतो..
सर आम्ही निघतो.. thank you so much आमची मदत करण्यासाठी .. - मानसी
कुठे निघत आहात..- विवेक..
सर घरी जात आहोत रस्ता सुरु झाला असेल .. - मानसी
एक मिनिट.. थांबा.. - विवेक
विवेक सीमा ला फोन लावतो ..आणि तिला लवकर नगरपरिषद मधून विचारपूस करायला सांगतो.. कारण राजू ला जात पर्यंत च वेळ झाला असतो.. तशीच सीमा पटकन दुसऱ्या फोन कॉल करून विचारते आणि विवेक ला सांगते..

हा तर मॅडम रस्ता सुरु अजुन झालं नाही आहे पाऊस सुरू असलेल्या कारणांनी विजेचं खांबाच काम झालं नाही आहे आणि  वीजपुरवठा पणं  खंडित झाला आहे.. तुमच्या एरियातील तर  पाऊस कमी झाला की लवकरात लवकर रस्ता करतील सुरू.. तेव्हा पर्यंत तुम्ही इथे थांबू शकता.. आणि त्यात तुमच्या मुलीची पणं तयबेत बरी नाही ..  आणि तुमच्या घरच्यना काळजी वाटत असेल तर..  मी बोलतो तुमच्या घरच्या लोकांसोबत .. तुम्ही काळजी नका करू..- विवेक  स्पष्ट पने बोलतो..
काय .. रस्ता अजुन सुरू झाला नाही.. अरे देवा.. - मानसी.. थोडी घाबरून बोलते..
हो ..द्या तुमच्या घरच्यांचा नंबर मी बोलतो त्याच्या सोबत .. रस्ता सुरु झाला की मी स्वतः सोडेल तुम्हाला तुमच्या घरी.. - विवेक
नाही नको .. मी कडवेल त्यांना तुम्ही नको.. मी थांबते.. इथे रस्ता सुरु नाही होत तोपर्यंत.. - मानसी थोडी अडखडत बोलते..
ठीक आहे.. या बसा नाश्ता करा..- विवेक
नाही केला मी वरतीच .. ते मगाशी त्या दादांनी आणल होते ना ते..- मानसी..
बरं.. ठीक आहे.. अरे हो काल रात्रीची गोष्ट तर राहिलीच सगायची आज दिवसभर तुम्ही मला ते सगळ सागा.. तुम्हाला पण बोरं नाही होईल .. आणि आज मी ऑफिस ला पणं सुट्टी टाकली आहे.. सो तुम्ही आज सागा मी पटकन फ्रेश होऊन येतो वरती रूम मध्ये ..  आणि प्लीज तुम्ही तुमच्या मुलीला पणं आराम करू द्या ... जा वर झोपून द्या तिला .. औषधांनी झोप येत आहे तिला बघा मान टाकत आहे.. - विवेक

प्राची ला औषधांची नशा चढली असते आणि ती वारंवार झोपी साठी मान टाकत असते.. मानसी तिला बघते.. आणि ठीक आहे म्हणून रूम मध्ये येऊन प्राची ला झोपून देते..
थोडीच वेळात विवेक फ्रेश होऊन मानसीच्या रूम मध्ये येतो मानसी ग्यालरीमध्ये कुर्ची टाकून बसली असते.. येणाऱ्या हळुवार वार्याचा , आणि पावसाचा आनंद घेत असते.. आणि भूतकाळ आठवण करून अश्रु गळत असते.. तेव्हाच विवेक तिच्या मागे.. येऊन उभा होतो.. आणि आवज देतो..

मॅडम आर यू ओके .. - विवेक काळजी ने विचारतो..
हो हो मी ठीक आहे या बसा..  - मानसी तिच्या बाजूची कूर्ची देते  पदराने डोळे पुसून बोलते..
सो सागा आता समोर.. काय झालं मानसी आणि तिच्या आईच.. - विवेक एकदम आतुर होऊन विचारतो..
हमम तर समोर.. अस.. - मानसी

××××××××××
असेच दिवस जात असतात दरोराज मानसीच्या तिच्या रंगावरून अपमान होत असतो ... शाळेत तर मुली काही काही बोलतच असतात आणि घरात सुध्दा वडील आणि आजी बोलत असते... आजी तर कधी पणं काळी म्हणूनच हाक मारत असे.. ती मोठी होत असते.. तिची आई नेहमी समजूत काढत असते.. ती आईच अयकुन चूप राहत असे आणि अभ्यासात मग्न असे.. जास्ती मैत्रिणी  पणं नव्हते तिच्या.. एक होती पण ती तिच्याच सारखी सावड्या रगची  आरती त्या दोगीच राहत.. असेच दिवस जात असताना..
ती १० वी पास होऊन तालुक्यात कॉलेज ला जाणार असते..  
आई ला खूप आनंद झाला असतो.. आणि आत्याला बाकी कोणाला पणं आनंद झाला नसतो.. प्रदीप तिचा मोठा भाऊ सुध्दा वडीलान सारखा बोलायला लागला असतो.. तालुक्याच्या शाळेत जाऊन तो.. थोडा वाईट सागतीत रहात असल्यामुळे  बिघडत जातं असतो‌..  दोन वर्ष तर तो फेल झालं असतो म्हणून तो आता पणं तिथेच कॉलेज ला असतो..आणि असच आई  काही बोलली की तिच्या सोबत भांडण करत अस्त वडील आणि आजी त्यालाच दुजोरा देत असत म्हणून नंतर आई लाच चूप बसावं लागत असे.. आणि त्याला माहीती झालं अस्त की आता त्याची बहीण तालुक्याच्या कॉलेज ला  येईल  म्हणून तो घरी विरोध करत होता .. कारण त्याला सुध्दा त्याच्या बहिणीची लाज वाटत असे तिच्या काळ्या रंगाची.. मित्र हसतील माझे तुझी बहिण अशी काळी आणि कुरूप आहे म्हणून.. आणि त्याच्या गोष्टीवर  वडील पणं दुजोरा देत होते.. पणं आई मात्र ठाम होती ती स्वतः मानसी सोबत जाऊन तालुक्याच्या कॉलेज मध्ये एडमिशन करून आली असते... 

आज मानसीचा कॉलेज चा पहिला दिवस असतो पणं आज तिची मैत्रीण आरती सोबत नसते.. तिचे शिक्षण बंद करण्यात आले असते.. घरची परिसथिती बेताची असल्याने तिला पणं आता शेतात कामाला घेऊन जात असत..
जशी ती वर्गात जाते.. तर सगळे मुल, मुली तिला बगून हसायला लागतात.. आणि तिच्या दूर बसतात.. तिला वाईट वाटत.. आणि ती जवळच्या  एका बेंच वर एकटीच बसते..
तिच्या साठी कॉलेज चा तो पहिला दिवस खूप वाईट असतो पणं ती ला आता या सगळ्यांच्या शाळेपासूनच सवय झाली असल्याने तिच्या साठी ह्या गोष्टी नवीन नवत्या.. पणं तिला आरतीची फार आठवण येत असे.. आणि असच तिचा पहिला दिवस संपतो...

काय ग मानसी कसा गेला कॉलेजचा पहिला दिवस.. - आत्या..
मस्त आत्या खूप छांन.. मजा आली..- मानसी चेहऱ्यावर खोट खोट हसू आणत बोलत.. असते.. पणं आई दूर बसून चहा करत असते आणि ती मानसी ला बघूनच सगळ समजून जाते.. आणि ती पणं तिला वाईट नको वाटावं म्हणून शांत राहते..
असच एक दिवस मानसी बस स्टॉप वर बस ची वाट पाहत उभी असते... आणि तिथेच तिचा भाऊ प्रदीप पणं त्याच्या मित्रांसोबत उभा असतो.. तेव्हाच त्याचा एक मित्र त्याला विचारतो..
अरे प्रदीप ती मुलगी तुझी बहीण आहे ना... ती काळी सी मुलगी दिसत आहे..- त्याचा मित्र
तसेच सगळे तिकडे बघायला लागतात..
आणि प्रदीप पणं बघतो.. आणि बघून पण न बागितल्या सारखा करतो.. आणि म्हणतो
कुठे रे मला नाही दिसत आहे.. - प्रदीप
अरे ती तिकडे त्या झाडाजवळ उभी आहे..- त्याचा मित्र
अच्छा ती काय नाही नाही माझी नाही आहे बहीण..- प्रदीप आडखडत बोलतो..
अरे पणं एडमिशन च्या वेळी तुझ्या आई सोबत पाहिले होते मी थोड काम होत कॉलेज मध्ये तर आलो होतो त्या दिवशी तेव्हा..- त्याचा मित्र
नाही तू कोणा दुसरीला बागितल असशील.. ती नाही आहे..- प्रदीप..
नाही रे तीच आहे.. मी बागितल होत..- त्याचं मित्र..
अरे नाही म्हांटल ना कळत नाही काय तुला.. चल बस आली उगाच कोणालाही पाहत राहतोस..- प्रदीप थोडा चिडून बोलतो आणि बस मध्ये बसतो..
मानसी पणं बस मध्ये बसते.. आणि मुस्मुस रडत असते.. कारण तिने.. सगळ बोलण आयकल असते.. तिला मनात खूप वेदना होतात की स्वतच्या भाऊ तिला नाकारत आहे म्हणून.. आणि ती घरी येते...
क्रमशः

🎭 Series Post

View all