कुरूप.. म्हणजे काय ? मानसी घरी आल्या आल्या आरश्यात स्वतःला निहारत स्वतःशीच प्रश्न करते.. आणि स्वतच्या चेहऱ्याला, हाताला, पोटाला, पायाला, गळ्याला हात लावत.. बोलते..
आणि अचानक तिची आईं तिथे येते..
काय ग मानसी अशी काय स्वतच्या चेहऱ्याला, हाताला, पोटाला, हात लावत आहेस..- आई थोड आश्चर्याने मानसी ला विचारतात..
काही नाही सहजच - मानसी थोडी अडकडत बोलते..
अ.ग.आई आहे मी तुझी तू बोलली नाहीस तरी तुझे मण ओळखु शकते..बोल काय झालं..- आई
आई मला एक प्रश्न पडला आहे.. पणं उत्तर काही सापडत नाही.. - मानसी..
अग तर तुझ्या कॉलेजच्या मॅडम ला विचारायचं..- आई
नाही आई कोणाचं कडे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही... आणि तो काही पुस्तकातलं प्रश्र्नन नाही - मानसी
मग .. कोणता प्रश्न आहे.. - आई
जाऊ दे आई... असतात कोणते कोणते प्रश्न ज्यांचे उत्तर नसतात.. ते नेहमी.. एक रहस्य अस्त.. कोड अस्त.- मानसी आई ला टाळत बोलते..आणि रूम बाहेर जात असते.. तेव्हाच आई तिच्या कडे काळजी ने बघतात आणि हात पकडून तिला बेड वर बसवत बोलतात..
बाळा असा कोणताही प्रश्न नाही ज्याच उत्तर नाही.. प्रत्येक प्रश्नच उत्तर नक्की असतो.. आणि तो नाही मिळत म्हणजे.. तो आपल्यासाठी कठीण आहे.. म्हणून त्यावर अभ्यास करून शोधायच.. साग कोणता प्रश्न आहे.. मला जमेल तर मी मदत करते.. उत्तर शोधण्यासाठी.- आई मानसी ला प्रेमाने समजावत बोलते.
मानसी थोडा विचार करते आई कडे बघते.. आणि मनात म्हणते.. आई पणं माझ्यासारखी आहे तिला पणं हा प्रश्न नक्की पडला असेल आज विचारूच आई ला तीच देऊ शकते माझ्या प्रश्नाचं उत्तर.. आणि विचार करतात करता तिच्या तोंडातून तिच्या मनातील प्रश्न ओठांवर येतो..
आई कुरूप म्हणजे काय ? - मानसी एकदम शून्य नजरेत आई ला बघत विचारते.
आई ला तर पूर्ण पने शॉक होतो की हा असा प्रश्न कसा पडला तिला अचानक..आणि तिला काही सुचत नाही काय उत्तर द्यावं .. आणि ती मानसीच्या चेहऱ्यावर प्रेमाने हात फिरवत बोलते..
मानसी काय झाल बाळा हा कोणता प्रश्न अाहे कोणी काही बोललं काय कॉलेज मध्ये..- आई
आई मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे.. तुझ्याकडे आहे काय असेल तर साग.. आणि हो आई हा प्रश्न मला आज नाही पडला .. हा प्रश्न मला तेव्हा पासून पडला आहे जेव्हा पासून मला समज आली आहे.. आणि मी शोधल ग खूप पणं मला नाही मिळालं .. आज तुला बगितल तर वाटल तुझ्याकडे नक्की असेल कारण तुझीच सावली आहे ना मी.. - मानसी एकदम लहान चेहरा करून विचारते
आई ला काय उत्तर द्यावं काही कळत नाही .. आणि ती स्वतः मनात म्हणते आज मी उत्तर देणार.. माझ्या मुलीला उत्तर देणार.. कारण मी उद्या असेल नसेल पणं माझे शब्द नक्की असतील तिच्या सोबत.. आणि ती मानसीच्या डोक्यावर हात फिरवत आणि स्वतच्या मांडीवर तीच डोकं ठेवत बोलायला सुरुवात करते..
"कुरूप म्हणजे बागणाऱ्यांचा दृष्टीकोन .. जो व्यक्ती ज्याला ज्या दृष्टी ने बघतो.. तो दृष्टीकोन .. "
एखादा व्यक्ती एकड्यवैक्तीला त्याच्या रूपा वरून त्याच्या रंगावरून त्याला सुंदर या कुरूप म्हणतो.. कारण देवाने त्याला डोळे दिले पाहायला.. आणि तो फक्त त्याच्या डोळ्याचे दृष्टी ने बघतो आणि प्रतिक्रिया देतो..
पण ज्याच्या कडे डोळेच नाही कोणाला पाहण्यासाठी तर तो त्या व्यक्तीला मनाने बघतो.. आणि सुंदर या कुरूप दर्शवतो.. मग तो रगाने गोरा असो किवा काळा त्याला त्याच्या रूपच काही लेन देणं नसत.. तो फक्त त्या व्यक्तीच्या मनातील रूप बघतो.. आणि आपली प्रतिक्रिया देतो.. - आई
पण आई ह्या जगात, समाजात असे कोणी असतील काय ज्याच्या कडे पाहायला डोळे आहेत.. पणं तो हे जग मनाच्या दृष्टीने बघत असेल ज्याच्या साठी रूप, रंग, सुंदरता, कुरूप, अपंग, बदिर, अंध, ह्या गोष्टी कधीच मायने नाही ठेवत असतील - मानसी
हो नक्की आहेत .. मानसी पणं खूप कमी आहेत हे मात्र नक्की पणं हो जेव्हा आपण चागलं आपल मन शुद्ध असेल आपल्या म्हणात सर्वांसाठी प्रेम असेल, दया असेल, भेद भाव नसेल तर ती व्यक्ती नक्की भेटते.. तेव्हा आपल्याला तिला शोधायला जाण्याची पणं गरज नसते देव स्वतचं त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात आणते.. - आई
आई माझ्या पणं आयुष्यात अशी व्यक्ती येईल का ग जो माझ्या काळ्या रंगावर प्रेम न करता माझ्या मनावर करेल - मानसी
अरे बापरे माझ्या बाळाला प्रेमाच्या गोष्टी कुठुन आल्या. कोणी आवडला काय.. - आई थोडी मस्करी करत मानसी ला विचारते..
तशीच मानसी पटकन उठून बसते आणि थोडी चाचरत बोलते..
नाही आई मला कोणी आवडला वैगरे नाही मी सहजच विचारलं.- मानसी
अच्छा आई सोबत खोट हा.. मी तुझी आई तर आहेच आहे पणं तुझी मैत्रीण पणं आहे विसरू नको - आई थोडी मिस्किल हसत आणि मानसी ची खेचत बोलतात.
अग आई तुझ्यासोबत काय. खोट बोलायचं ..ते अस आहे काल कॉलेज मध्ये वेलेन्सटाईन डे होता.. तर खूप सारे मुलं काही मुलींना त्यांचं प्रेमाची कबुली देत होते.. म्हणून माझ्या पणं मनात आलं की कोणी मला पणं अस प्रेम करेल काय बसं - मानसी
एक मिनिट वेलेन्सटाईन डे म्हणजे काय ? मला नाही समजल - आई
अग वेलेन्सटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस.. ते काल मी तुला सकाळी I love you म्हणाली माझ खूप प्रेम आहे तुझ्यावर कबुल केल तसच .. काहीस - मानसी
अच्छा तसं होय बर.. ठीक आहे , आता जा सोड ते आणि चल चहा केला आहे तुझ्यासाठी ठंडा झालं असेल गरम करते ये तू.. - आई बोलत निघत असतात.. तशीच मानसी आईचा हात पकडते आणि विचारते..
आई तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं - मानसी
अग कोणता प्रश्न आणि तू जो प्रश्न दिला तो आधीच दिला उत्तर आणखी काय हवं आहे.. - आई
हो दिला त्याचं उत्तर पणं आणखी एक विचारल मी तुला .. कोणी माझ्यावर प्रेम करेल काय ? तुझ्या, आत्या व्यतिरिक्त कोणी पुरुष कोणी मुलगा.. - मानसी
आई थोडी मिस्किल हसत बोलते.. नक्की करेल प्रेम तुझ्या मनावर मला विश्वास आहे तुला प्रेम करणारा व्यक्ती नक्की भेटेल - आई
पण आई मी तर तुझ्याच सारखी आहे .. तुझीच सावली .. आणि मी बघितलं आहे बाबांनी कधीच तुझ्यावर प्रेम नाही केल तर माझ्यावर कोणी कस करू शकतो.. - मानसी
कोण म्हणत बाबा माझ्यावर प्रेम नाही करत करतात खूप करतात.. पणं ते दाखवत नाही.. - आई
प्लीज आई तूच म्हणाली ना की मी तुझी मैत्रीण आहे आणि तूच माझ्यासोबत खोट बोलत आहेस.. बाबांनी कधीच तुझ्यावर प्रेम केलं नाही मला माहिती आहे - मानसी थोडी चिडून बोलते
तशीच आईच्या डोळ्यातून अश्रु बाहेर येतात आणि त्या थोड्या घट्ट मनाने मनातात .. हो नाही करत ते माझ्यावर प्रेम पणं मी करते त्याच्यावर प्रेम खूप करते.. आणि मला आणखी काही नको.. पणं हो तुला नक्की तुझ्यावर प्रेम करणारा व्यक्ती भेटेल तू जरी माझी सावली असलीस तरी.. हा एका आईचा विश्वास बोलतो.. आणि आता काही प्रश्न विचारायचे नाही ठीक चल चहा देते तुला - आई इतकं बोलुन बाहेर किचन मध्ये येतात..
मानसी पणं त्यांच्या मागे येते.. आणि चहा घेते..
असेच दिवसांत दिवस जात असतात मानसी च कॉलेज चे दिवस तिच्यासाठी वेदना दाई मनात रुतणारे, कुरूप काळी म्हणून जात असतात पण तिला आता त्या गोष्टीचं काहीच लेन देणं नसत.. तिने मनात आईच्या गोष्टी पक्की बसविल्या असतात म्हणून ती आता थोडी आनंदी रहायला लागते.. आणि असच ती बारावीची परीक्षा पास होते.. घरात पुन्हा दोनच व्यक्ती आनंदी असतात आई आणि आत्या.. आता तिला डिग्री च शिक्षण घ्याची इच्छा असते.. आणि तसं ती आई ला सांगते आई पणं आनंदी होत होकार दर्शवते.. आणि ती अड्डमिशन B.A. ला करून घेते आता तिला आई ला कॉलेज मध्ये नेण्याची पणं गरज भासत नाही आता तिला हळु हळू सगळं समजतं असते..ती स्वतच्या काम स्वतः करून घेत असते..
असच एक दिवस संध्याकाळच्या वेळेस रूपा शेतातून घरी येत असते. पाऊस सुरू झाला असतो आभाळ गर्जत असते विजाचा कळकळात सुरू असतो.. आणि आभाळात जोरात वीज कळाळण्याचा आवाज होतो.. मोठा प्रकाश होतो आणि अचानक रूपा वर वीज पडते.. आणि तिचा जागीच मृत्यू होतो..
काही जवळची लोक रूपा कडे धाव घेतात.. पणं रूपा गेली असते.. गावात ही बातमी पोहचवली जाते.. रुपयाच्या घरी बातमी पोहचते रूपाचा मृत देह काही लोक घरी घेऊन येतात.. घरात सगळे घरची असतात.. मानसी पणं कॉलेज मधून आली असते.. तिला बातमी कळतच ती कोलमडून पडते. तिला विश्र्वासच होत नाही की आई नाही.. तिच्या साठी तो क्षण खूप वेदना दाई असतो, तिला आई सोबत चे प्रत्येक क्षण आठवतात तिला तिचा मृत देहावर विश्र्वासच बसत नाही की तो तिच्या आईचा आहे आणि ती खूप रडत असते.. आणि ती रडत रडत बेशुद्ध होते.. आत्या तिला सांभाळत बाजूच्या रूम मध्ये घेऊन जाते..
घरात सगळेच रडत असतात आज केशवराव पणं रडत असतात.. प्रदीप पणं रडत असतो.. आजी पणं रडत असते.. इतेचं कळतो माणूस असला की त्याला किंमत नाही आणि नसला की किँमत कळते.. जेव्हा रूपा होती तर तिला काळी म्हणून अपमान करणारे, तिला कधीही प्रेम न करणारे तिच्या शरीराला पाहून कुरूप बोलणारे , तिची लाज करणारे आज तिच्या त्याचं कुरूप काळ्या रंगाच्या शरीराला शांत झोपलेले पाहून रडत आहेत कशासाठी माहिती नाही .. जेव्हा ती होती तर कधी प्रेमाचे शब्द नाही नेहमी अपमान दुःख .. आणि आज रडण .. ही आहेत आपली माणस आपण बनवलेली नात जी आपण जोडलेली, हा तो समाज तीच गावातली लोक जी तिला काळी , कुरूप म्हणून अपमानित करत अस्त हसत असत आणि आज रडत आहेत.. काही बाया तिच्या नेहमी हसू उडवत आज त्या तिला चांगली होती ग बाई म्हणून अश्रु गळत आहेत.. खरच हसू येत..
रूपाचा काहीवेळाने अंतीमसंस्कर करण्यात येतो.. ती आता देवाकडे गेली असते.. सुखी झाली असते.. ह्या अपमानित करणाऱ्या भेदभाव करणाऱ्या लोकांपासून ... पण आता तिच्या लेकीची परीक्षा सुरू होते मानसी ची आज पर्यंत तिच्या प्रत्येक परीक्षेत सोबत असणारी आई आता समोर नसणार असते .. आता तिला एकटीला परीक्षेला बसायचं असते.. आणि आता मानसीच्या जीवनाला नवीन वेग सुरू होणार असतो..
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा