Login

रूप ? भाग ६

I am reder but I try something write .. I hope you like it

रुपा ला जाऊन महिना झाला असतो , सगळ आता हळूहळू  नॉर्मल होत अस्त सगळे आपलापल्या कामाला लागले असतात , पणं मानसी मात्र आता पण आईच्याच विचारत हरवली असते , तिच्या मनाला एकप्रकारचा धक्का बसला असतो म्हणून आता ती थोडी शांत शांत राहत असते.. आत्या तिला समजावत असतात , पणं तिच्या वर कोणताही परिणाम झाला नसतो तिला फक्त आई हवी असते ..
असेच आणखी काही दिवस निघून जातात .. आणि एक दिवस आजी आत्या वर जोरात ओरडते..  मानसी घरातच असते आजी आत्याचा अपमान करत तिला काही काही बोलत असते, आत्या ला फार वाईट वाटत आणि ती रडत असते .. मानसी ला आता कळलं असतं की आई होती म्हणून आत्या ला ती सांभाळून घ्यायची तिला कधीच दुरवल नाही पणं आता आई नाही म्हणून आत्याला आता मोलकरीण म्हणून वागवलं जात आहे आणि ती रागात येऊन आजी वर रागावते..
काय आहे आजी ती मोलकरीण नाही आहे आत्या आहे ती माझी कशाला तिला काही बोलत आहेस - मानसी
वो हो तुझी आई गेली तर आता तू पाठराखण झाली काय ईची ह्या घरात मी जे म्हणेन तेच होईल समजल तुला जास्त बोलायचं नाही कडल काय... जितकी आहेस ना तितकंच बोलायचं नाही तर वेड  लागणार नाही तुला इथून बाहेर काढायला समजल  - आजी रागत बोलुन निघुन जाते
मानसी पणं आता रडायला लागते आणि पुन्हा मीना तिला समजावत असते
काही नाही होत मानसी मला माहिती होत एक ना एक दिवस अस होणारच आहे वहिनी होत्या म्हणून मला कधीच काही जाणवलं नाही पणं आता हे सगळ सहन कराव लागेल जाऊ दे तू लक्ष नका देऊ अभ्यास कर वहिनच स्वप्न पूर्ण कर..- आत्या इतकं बोलुन कामाला लागतात . मानसी पणं आत्या ला मदत करत असते .. असेच आता दुःखात दिवस जात असतात .. मानसी थोडी सावरली असते कॉलेज ला जायला लागते .. आणि तिची फर्स्ट इअर ची परीक्षा होऊन जाते तिला सुट्ट्या लागल्या असतात म्हणून ती घरात राहून आत्या ला कामात मदत करत असते ..  आणि तिला आठवते आत्या आणि आई ने तिला कधीच काम करू दिल नव्हत नेहमी अभ्यास कर मोठी हो हेच म्हणायचं पणं आता आजी तिला काम करायला लावायची आजी पुढे आत्या पणं काही बोलू शकत नव्हती म्हणून ती पणं सगळ शांत पणे ऐकायची ..
असच एक दिवस आजी केशवराव समोर मानसीच्या लग्नाची गोष्ट काढत बोलतात
केशव मी काय म्हणते त्या काळीच लग्निन करून देऊ म्हणत लोक काही काही गोष्टी करतात गावात.  आई गेली तर कोणी लक्ष नाही देत असे बोलतात. तिला एकदाची ह्या घरातून बाहेर काडल की प्रदीप च लगीन करायला मोकड काय म्हणतेस - आजी
हो आई मी पणं हा विचार केला होता पण तिला कोण मागेल कशी दिसते ती कोणी पणं गोरी मुलगी आहे काय म्हणतात .. त्यात ही काळी .. आणि प्रदीप च लग्न करू म्हणत तर तो काही कामधंदा करत नाही तर कोण देणार त्याला पोरगी - केशवराव
अरे हो पणं प्रदीप मुलगा आहे त्याला मुलगी मिडलच पणं हिला.. मिडल काय बघ .. उगाच गावात लोकांची टोमणे आयकायची नाय मला .. कसा ही असेल तरी चालल म्हण आणि तुझी चांगली ओळख आहे लोकांमध्ये तर मिळेलच एकादा पोरगा बघ - आजी
ठीक आहे बघतो - केशवराव म्हणून आपल्या खोलीत झोपायला जातात
.....
आता केशवराव त्याच्या आई ची गोष्ट चागलीच मनावर घेतात आणि मानसी साठी मुलगा शोधायला लागतात आणि एक स्थळ त्यानं मिळत म्हणून ते उद्याच घरी या म्हणून सागतात..
दुसरा दिवस उगवतो घरात थोडी धावपळ सुरू असते मानसी ला काय होत आहे याची जराही जाणीव नसते म्हणून ती आत्या जवळ येते..
आत्या काय होत आहे काही आहे काय आज घरात कोणी येणार आहे काय..- मानसी आत्या ला प्रश्नार्थक नजरेने पाहत विचारते
अग तुला आज पाहुणे पाहायला येत आहेत लवकर आवर येतील ते आताच - आत्या मानसी शी थोडी नजर चोरत बोलतात
काय.. पाहुणे पाहायला मला काही सागितलच नाही कोणी आणि अस अचानक .. आणि आत्या तुला माहिती आहे ना मला इतक्या लवकर लग्न नाही करायच आहे मला समोर शिकायचं आहे .. - मानसी
हो मला माहिती आहे पणं दादा म्हणले की चागलं स्थळ आहे म्हणून करत आहोत लग्न .. आणि मी काय बोलणार दादा समोर - आत्या थोडी नाराजीच्या स्वरांत बोलते..
मानसी सगळ समजून जाते आत्याचा बोलण्याला काही अर्थ राहिला नसता उगाच तिलाच काही बाई बोलुन अपमान करून शांत केल असत म्हणून ती रागात केशवराव कडे येत्ते
बाबा हे काय तुम्ही माझं लग्न करत आहात .. मला एकदाही विचारल नाही .. - मानसी
काय विचारायचं लग्नाची वय झाली की विचारावं नाही लागत जा तयार हो साडी नेस पाहुणे येतीलच थोड्यावेळात - केशवराव
विचारावं नाही लागत म्हणजे .. बाबा मला समोर शिकायचं आहे final year पूर्ण करायचं आहे जॉब करायच आहे .. प्लीज बाबा मला आताच लग्न नाही करायच आहे - मानसी रडकुंडीला येऊन बोलत असते आणि बाहेरून आजी सगळ आयकत असते तीच बोलण अयकून ती आत येते आणि केशवराव बोलणार तर आजीच बोलते
काय शिकायचं आहे शिकून मोठी मास्तरीन होणार आहे लग्न कर अन चागलं संसार कर तेच उपकार होइल आमच्यावर मोठ्या मुश्किलीने स्थळ मिळाला आहे उगाच काही बोलू नको समजल जा तयार हो जा लवकर..- आजी
मानसी रडत रडत आपल्या रूम मध्ये येते आत्या ला समजून जातं म्हणून त्या पणं तिच्या मागे येतात आणि तिची थोडी समजूत काढत तिला तयार करतात ती नाराजितच तयार होते .. बाहेर पाहुणे आले असतात .. मुलीला बोलवा म्हणून मुलाचे वडील म्हणतात .. आत्या मानसी ला घेऊन बाहेर येतात .. मानसी ला बघूनच मुलाची आई तोंड वाकड करते. मुलगा तर तिला बघूनच निघायचं काय म्हणते पणं त्यांच्या वडिलांचा अपमान नको म्हणून सगळे चहा नाश्ता करतात .. मुलाची आई नाईलाजाने मानसी ला काही प्रश्न करतात ती पणं नाराजीतच उत्तर देते .. थोडावेळ बोलुन झाल्यावर मानसी रूम मध्ये येऊन जाते आणि दरवाज्यात उभी राहून बाहेर काय बोलले जात आहे अयकत असते ..
बघा दादा वाईट नका मानू पणं आम्हाला मुलगी पसंत नाही आम्हाला थोडी गोरी मुलगी हवी आहे आमच्या घराण्याला शोभेल अशी  ते तुम्ही म्हणालात की एकदा बघुन घ्या म्हणून आम्ही आलो आमची मोठी सून पणं सुंदर आहे .. आमच्या घराण्यात अजुन काळी सून आली नाही तर मी माझ्या मुलासाठी कशी मागू आणि माझ्या मुलाला पणं थोडी सुंदरच मुलगी हवी होती.. त्याच्या स्टॅंडर्ड ला शोबेल अशी ..- मुलाची आई
केशवरावाना थोड अपमानित झाल्या सारखं वाटतं पणं ते काही बोलत नाही आणि ठीक आहे म्हणून निरोप घेतात सगळी मंडळी गेली असते आजी मानसी ला तिच्या आई वरून तिच्या रंगावरून टोमणे मारत असते काही काही बोलत असते केशवराव तर रागात रूम मध्ये जातात .. प्रदीप तर घरची नसतो त्याला आधीच माहिती असत अस काही होईल म्हणून तो आधीच घराबाहेर असतो उगाच ईज्यत जाईल म्हणून ..
इकडे  मानसी ने सगळ काही अयकल असते आणि ती रडत असते .. तेव्हाच आत्या तिच्या रूम मध्ये येतात तिला समजावत असतात..

आत्या मी काळी आहे म्हणून त्या बाई ने मला पसंत नाही केली शोभेल नाही म्हणे तिच्या घराण्याला पणं तिने एकदा स्वतच्या मुलाकडे बघितल तो पणं तर काळाच होता .. तरी सुध्दा .. आणि तो मुलगा स्वतः काळा आणि मुलगी गोरी शोधत आहे .. का ..  फक्त लोकांसमोर माझी बायको किती सुंदर मिरवायला आणि त्याची आई  माझी सून किती सुंदर लोकांना सागण्यासाठी ..- मानसी खूप चिडून बोलते ..
आत्या तीच सगळ बोलण समजून जाते आणि सर्व ठीक होईल म्हणून तिची समजूत काढत असते .. आणि तिला थोडावेळ आराम कर म्हणू सांगत,  रूम बाहेर येऊन पूर्ण घर आवरते..
मानसी ला आता फार राग आला असतो म्हणून ती आता घरात सगळ्यानसोबत कमी बोलायला लागते.. आणि घरात एकटीच रूम मध्ये बसून आई ला आठवण करून रडत राहते .. आता तीच शिक्षण पणं वडिलांनी बंद केलं असतो उगाच खर्च म्हणून, तेच पैसे वाचतील तर लग्नात लावू म्हणून म्हणतात. म्हणून ती आता घरातच राहून आत्या सोबत कामात स्वयंपाकात मदत करत असते.. आणि असेच दिवस निघत जातात .. आणि पुन्हा मानसी साठी स्थळ येत आणि पाहुणे पाहायला येतात मानसी ला सगळ माहिती असत मागच्यावेळी जस झाल तसच काहीस होईल म्हणून तिने आज आपल्या मनाची तयारी केली असते आणि पाहुण्यांसमोर येऊन बसते सगळ नीट चालू असत मुलाची आई मानसी ला काही प्रश्न विचारतात आणि ती पणं बरोबर उत्तर देत असते .. आणि मुलाचे वडील म्हणतात आम्हाला मुलगी पसंत आहे .. तसेच सगळे खुश होतात  आणि  आजी साखर घेऊन यायला मीना ला सांगते तेव्हाच मुलाचे वडील त्यांच्या मुलाला म्हणतात..
अजय तुला काही बोलायचं आहे काय मुलीसोबत तर तू आत मध्ये जाऊन बोलू शकतेस - मुलाचे वडील
नाही बाबा ठीक आहे मला काही बोलायचं नाही .. - अजय
अरे हो तुला नाही बोलायचं असेल पणं तिला काही विचारायचं असेल तर - मुलाचे वडील
तशीच आजी मधातच बोलते.. नाही नाही तिला पणं काही विचारायचं नाही हो ना मानसी बेटा आजी मानसी ला डोळ्यांनी खुणावत बोलते तशीच मानसी थोडी घाबरून हो म्हणते..  आणि सगळ्यांना साखर दिली जाते .. आणि पाहुणे निरोप घेऊन निघून जातात .. मानसी रूम मध्ये येऊन अजयच्या विचारत हरवली असते आणि मनात विचार करते बापरे किती तो हँडसम गोरा पान आणि मला पसंत केली खरच विश्वास नाही होत आणि तो होता स्वतः तर काळा आणि मुलगी गोरी शोधत होता .. आई बरोबर मनायची तुझ्या पणं मनावर प्रेम करणारा नक्की येईल जो माझ्या रंगावर प्रेम न करता माझ्या मनावर करेल .. तशीच आत्या तिच्या रूम मध्ये येते.. आणि ती विचारातून बाहेर येत आत्याचा माडीवर डोकं ठेवते ..
काय आता पासून जावईबाबुच्या विचारत आहेत वाटत कोणी - आत्या मस्करीच्या स्वरात बोलतात ..
काहीही काय आत्या .. - मानसी थोडी लाजून म्हणते
अरे बापरे कोणाला लाजता पणं येत काय..- आत्या
तशीच मानसी आत्याच्या कुशीत जाते..
क्रमशः

🎭 Series Post

View all