असेच दोन आडवडे नघुन जातात विवेक प्रत्येक रविवार ला बागेत जातो पण मानसी काही त्याला भेटत नाही आणि तो उदास मनाने घरी येतो ...
आज ढगांचा गडगडाट होत असतो, आणि पाऊसाला सुरुवात झाली असते... धोधो पाऊस पडत असतो ....
साहेब तुम्ही घरी जात आहात काय ... नाही म्हणजे बाहेर पाऊस जोरात पडत आहे तुम्ही थोडा वेळ थांबून जावं असं मला वाटतं.. - राजु
हो येत तर आहे पण आणखीन वाढला तर मला जाणे शक्य होणार नाही आणि ट्रोफिक पण असेल म्हणून निघतो मी सात वाजले ना नऊ पर्यंत पोहोचेल नाही तर आणखी उशीर होईल .... - विवेक
ठीक आहे मी येऊ का सोबत .... - राजू
नाही नको राजू तू पण निघ पाऊस वाढत आहे मी आज स्वतः ड्राईव्ह करून जातो ... - विवेक
ठीक आहे साहेब काही गरज पडली तर फोन करा ..-राजू
विवेक गाडी काडून स्वतः ड्राईव्ह करून घरकडे निघतो आणि गाडीत एफएम लावतो छान अशी रोमँटिक गाणी चलू असतात ... आणि विवके आपल्याच धुंदीत गाडी चालवत असतो ... थोड्या दूर वर येतो तर त्याला भर पावसात कोणी तरी आटो ची वाट पाहत दिसतो आणि येणाऱ्या प्रत्येक गाडी ला हात दाखुन थाबवण्यच प्रयत्न करत असतो ... तो समोर निघाला असतो पण का जाणे तो ब्रेक मारून गाडी थाबवतो आणि मागे घेतो ... आणि गाडी चा काच खाली घेतो तर समोर मानसी आणि तिची मुलगी पाण्यात भिजलेल्या असतात तिची मुलीला तर थंडी भरीली असते ... तो त्यांना गाडीत बसायला सागतो पण ती थोडी विचार करत असते...
अहो मॅडम बसा घाबरु नका ... पाऊस जोराचा येत आहे कोणता आटो नाही मिळणार ईथुन... - विवेक
नाही तुम्ही जा भेटेल आम्हाला थोड्यावेळात.. - मानसी
अहो नाही मिळणार आणि त्या लहान मुलीला बघा किती थंडी भरली आहे बसा सोडतो मी तुम्हाला रात्र पण झाली आहे इथे भर पावसात एकट्या बाईने उभे राहणे बरोबर नाही ...- विवेक
मानसी मनात थोडा विचार करून गाडीत बसायला तयार होते..
पण आम्ही दोघही भिजल्या आहोत तुमची गाडी ची सिट खराब होईल...- मानसी
काही नाही होत बसा ... - विवेक
मानसी आणि प्राची गाडीत बसतात पण प्राची ला खूप थंडी भरली असते आणि ती थंडी लागते म्हणून वारंवार सांगत असते...
तेव्हाच विवेक त्याचा ब्लेझर मानसी ला देत म्हणतो..
हे घ्या तिचे वोले कापड कडून हा ब्लेजर द्या तिच्या अंगावर टाका ...- विवेक
मानसी मागच्या सिट वर बसली असते तिला ते घ्यायच नसतो पण तिचा नाईलाज असल्याने ति तो घेतो आणि प्राचीच्या अंगावर टाकुन तिचे वोले कापड काडुन तिच्या जवळ असलेल्या प्लास्टिक बॅग मधे टाकते...
आता प्राची ची थंडी कमी झाली असते आणि ती तेथेच झोपी जाते...
कुठे जायचं आहे तुम्हाला ... - विवेक
अ ..ह.. शिवाजी नगर.. - मानसी
हो का ठीक आहे ... - विवेक
थोडावेळ शांत राहून विवेक ला वाटत की विचारू का त्यांना बागेत त्या का ईतक्या दुखी झालेले होत्या पण काय विचार करतील त्या ...नाही नाही आता नको नंतर कधी भेटतील तर विचारेन... - विवेक मनात विचार करत स्वतशीच बोलतो.
थोडा वेळ शांत राहून विवेक बोलायला सुरुवात करतो..
तुम्ही तुमच्या हजबंड का फोन करून कळवून द्या तुम्हाला उशीर होईल उगाच काळजी करत बसतील - विवेक
हजबंड म्हणटल्यावर मानसी एकदम विचारातून बाहेर येते...
आणि म्हणते..
मला हजबंड नाही..- मानसी धीट पने सागाते..
वो... सॉरी सॉरी रिअली sorry... मला माहिती नव्हतं..- विवेक
इट्स ओके काही नाही होत... - मानसी
अजुन घरी कोणी असतील तर त्यांना कळून द्या... - विवेक
मानसी ला काय बोलावं आणि काय नको काही समजत नाही आणि ती त्याच्य प्रश्नांना टाळण्यासाठी .... बोलते..
हो हो आदीच कळवल होत मी .... - मानसी
आता विवेक ला काय बोलावं काही सुचत नाही म्हणून तो एफएम वर गाणं ऐकत असतो.. आणि अचानक तिथे न्यूज येत की शिवाजी नगर... जाणाऱ्या रस्त्यावर विजेचं खांब पडलीने रस्ता बंद करण्यात आला आहे ...
तसाच मानसी ला धका लागतो तिला काय करावं काही सुचत. नाही आणि थोडी घबरून बोलते..
अग बाई आता कस करायच कशी जाणार मी घरी...- मानसी
अरे घाबरु नका तुम्हाला काही प्रोब्लेम नसेल तर तुम्ही आजच्या दिवस माझ्याकडे थांबू शकता .... - विवेक
नाही नाही नको एक काम करा तुम्ही आम्हाला रेल्वेस्टेशन वर सोडा आम्ही रात्र भर तिथे थांबू ... - मानसी
अहो अस काय करता लहान मुलगी आहे तुमची वरून बाहेर असा पाऊस आहे काहीही काय बोलता... - विवेक
नाही म्हंटले ना कळत नाही काय तुम्हाला... - मानसी आता थोडी रागात बोलते..
अहो मॅडम समजू शकतो मी की एखाद्या स्त्री ला आनोडखी पुरूषशोबत त्याच्या घरी जाणे बरोबर नाही...- विवेक
मग समजत ना तरी सुद्धा अस बोलता.. - मानसी
अहो मॅडम सगायची तर इच्छा नाही आहे तरी सुध्दा सागातो मी ह्या शहराचा IAS आॅफिसर आहे.. म्हणजे जिल्हाधिकारी आताच सहा महिने झाले ट्रान्स्फर होऊन.. तर तुम्हाला आता काही प्रोब्लम नसेल तर येऊ शकता ना आता. हा आहे माझा आयडी कार्ड - विवेक त्याचा आयडी कार्ड दाखवत बोलतो..
मानसी तर अवाक होऊन त्याच्या आयडी कार्ड कडे पाहते.. आणि थोडा विचार करून ठीक आहे म्हणते आणि त्याच्या सोबत जायला तयार होते..
थोडा वेळ शांत राहून मानसी विचारते...
सर तुम्ही आयएएस असून सुध्दा,.. ड्रायव्हर नाही आणि इतक्या पावसात सुद्धा अनोडखी व्यक्ती साठी गाडी थांबली... नाही म्हणजे काहीही होऊ शकत न.. - मानसी थोडी आता अडखत बोलते..
अहो मॅडम काय होईल आणि हे आमचं कामच आहे लोकांची सेवा करणे ... त्यांना गरजेच्या वेळी मदत करणे.. आणि मला मुळात आवडतच नाही आयएएस अधिकारी म्हणून मिरवणे मला साधारण माणूस म्हणून काम करायला आवडते .. म्हणजे आपल्याच लोकांमधे राहून ... आपण काम करायच ... आणि मला स्वतः ड्राईव्ह करायला फार आवडत पण काय आहे ना कधी कधी काही गोष्टीनं साठी ड्राईव्ह ठेवावं लागत कारण एका व्यक्तीला माझी गाडी चालून रोजगार मिळत त्याचं कुटुंब चालत म्हणून ड्रायव्हर आहे पण आज त्याला मीच म्हणालो की आज मीच ड्राईव्ह करून जातो.. - विवेक चेहऱ्यवर स्मित करत बोलतो...
बोलता बोलता ते विवेक च्या बंगल्यावर पोहचतात ...विवेक बाहेर येऊन मागील सीट ्चा दार उघडतो मानसी बाहेर येत प्राची ला उचलत असते प्राची झोपलेली असते... तेव्हाच विवेक म्हणतो...
एक मिनट मी उचलू काय म्हणजे तुम्ही भिजलेल्या आहात तर ती उठू शकते... - विवेक
मानसी थोडा विचार करते आणि ठीक आहे म्हणते ... - मानसी
विवेक प्राची ला कडेवर उचलून आत जातो आणि त्याच्याच मागे मानसी पण जाते.. आत आल्यावर विवेक प्राची ला सोफ्यावर झोपवतो ...
शंकर शंकर... - विवेक त्याच्या घरच्या नोकराला आवज देतो
माफ करा साहेब ते किचन मध्ये होतो ... - शंकर
काही नाही होत ह्या मॅडम ला पाणी वैगरे द्या मी येतो फ्रेश होऊन ... - विवेक
हो साहेब..- शंकर
तुम्ही बसा मी येतो.. - विवेक मानसी ला बोलतो..
मानसी मानेनेच होकार देते ... विवेक त्याचा रूम मध्ये निघून जातो..
शंकर मानसी साठी पाणी घेऊन येतो आणि तिला देतो.. ती पाणी पिहुन तिथेच उभी असते.. आणि मानसी त्या नोकराला विचारते..
अहो दादा साहेबाच्या पत्नी कुठे आहेत म्हणाजे दिसत नाही आहेत ना कुठे बाहेर गेल्या आहेत काय..- मानसी
शंकर आदी थोडा हसतो आणि म्हणतो..
अहो नाही मॅडम साहेबच लग्नच नाही झाल तर पत्नी कुठून असणार... - शंकर
काय.. - मानसी एकदम शॉक होऊन बोलते तिला वाटल होत की विवेकचा लग्न झालं आहे.. आणि ती शांत होते..
थोड्याच वेळात विवेक फ्रेश होऊन येतो आणि मानसी ला म्हणतो..
हे घ्या कपडे चेंज करून घ्या.. - विवेक
कपडे ...नाही म्हणजे तुमचं लग्न नाही झाल ते दादा सागितले मला मग ही साडी... - मानसी आश्चर्याचे भाव आणत बोलते..
विवेक थोडा हळुच हसतो आणि म्हणतो..
ही साडी माझ्या आई ची आहे आताच दोन दिवस झाले ती गावाकडे गेली पण तिचे काही कपडे इतेच राहतात तर तुम्ही घाला.. तुम्हाला काही प्रो्लेम नसेल तर.. आणि हा तुमच्या मुलीसाठी.... माझी मानलेली एक बहिण आहे तिची मुलगी आहे मागच्या महिन्यात राखी ला आली होती .. तेव्हा काही तिच्या मुलीचे ड्रेस विसरली इते बघा होते काय तिला मोठी आहे तुमच्या मुलीपेक्षा तर होतील मला वाटत.. त्या वरच्य रूम मध्ये जा आणि चेंज करून घ्या..- विवेक
मानसी काहीही न बोलता ते कपडे घेऊन आणि प्राची ला उचलून रूम मध्ये जाते.. आणि चेंज करून येते..
विवेक त्यांना जेवण करायला सांगतो आणि डायनिंग टेबलवर बसायला सगतो.. प्राची अर्धवट झोपेत असते आणि रडत असते.. मानसी तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते... मानसी कशी तरी प्राची ला अर्धवट झोपेत जेवण भरुन देते... आणि स्वतः पण जेवण करते... विवेक हे सगळ शांत पने पाहत असतो आणि जेवण करत असतो...
त्याचं जेवण झालं असते...
तुम्ही त्याचं रूम मध्ये आराम करा उदय मग ड्रायव्हर तुम्हाला सोडून देईल... ओके.. - विवेक
मानसी मानेनेच होकार देते आणि रूम मध्ये निघून जाते...
विवेक पण आपल्या रूम मध्ये निघून जातो... रूम मध्ये आल्यावर सुध्दा विवेक ला झोप काही लागत नाही त्याच्या मनात तेच विचार चालू असतात... विचारावं का एकदा ...नाही म्हणजे या नंतर कधी भेटल्या नाही तर राहून जाईल विचारायचं... आणि मनात थोडा विचार करून विवेक मानसीच्या रूम बाहेर येऊन दरवाज्यावर टक टक करून आवज देतो... मानसी दरवाजा खोलते आणि समोर विवेक ला पाहून आश्चर्याचे भाव आणत विचारते...
काय झालं सर काही काम होत काय... - मानसी
विवेक ला काय बोलावं काही कळत नाही आणि तो काही तरी आठवलिसारखा म्हणतो...
अ ...ह.. ते माझा ब्लेजर.. - विवेक.
हो हो सॉरी ते विसरले होते मी ..- मानसी पण थोडी चाचरत बोलते...
आणि बलेझर आणायला आत जाते... आणि बलेझार आणून देते... विवेक ब्लेझार घेतो आणि जात असतो आणि मागे वळतो आणि थोडा मोठा श्वास घतो आणि पुन्हा पलट्टो आणि एका दमात बोलतो...
मला तुमच्या सोबत थोडं बोलायचं आहे.. - विवेक
हा बोला ..- मानसी
आत येऊ काय..- विवेक..
हो या... - मानसी
विवेक आत येऊन सोफ्यावर बसतो ... प्राची झोपलेली असते .. मानसी पण chair घेऊन विवेक च्या समोर बसते..
बोला काय बोल्याच आहे..- मानसी प्रेमाने बोलते..
ते त्या दिवशी बागेत तुम्हाला बागितले होते मी.. तुमच्या मुलीसोबत.. तेव्हा तुमच्या मुलीला त्या बाई ने काळी मनाली होते तर फार राग.. आला तुम्हाला.. म्हणजे ते बरोबर नाही कोणाला अस काळी म्हणेणे ... चुकीचं आहे.. पण तुमच्या डोळ्यात फार दुःख संताप पहिला मी ... रंगला घेऊन म्हणजे का ... इतका राग दुःख .. मला विचारायचं काही हक्क नाही तो तुमचा पर्सनल काही इश्यु असु शकतो .. पण का माहित मला वाटल एकदा बोलावं ..म्हणून मी आलो होतो तुमच्या कडे बोलायला पण तेव्हा पर्यंत तुम्ही निघून गेल्या होत्या.. आणि नंतर पुष्कळ शोडल मी पण तुम्ही.. काही भेटल्या नाही.. आणि आज जेव्हा तुम्ही भेटलात तर न राहून मी विचारले.. - विवेक एकदम शांत पने बोलतो.
मानसी आदी थोडी हस्ते.. आणि बोलते..
हो आहे राग, दुःख, संताप, रगचं.. पण काय आहे ना कोणाला सागुन काही अर्थ नाही.. तुम्हाला पण सागेन आणि तुम्ही थोडी सहनभुत्ती दाखून निघून जाणं पण बदल मात्र कोणीच घडून आणणार नाही....- मानसी
तुम्ही एकदा सागा तर ... थोड बोललं तर बरं वाटेल तुम्हाला आणि अस म्हणात ठेऊन बदल तर नाही घडूऊ शकत न..- विवेक.
मी जे सागणार विश्वास ठेवाल माझ्यावर... अस काही आपल्या समाजत होत आहे यावर.. - मानसी..
हो नक्की... - विवेक..
तर एका... - मानसी..
क्रमशः....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा