मागील भागात.
मेघना चपापली. तिने पाहील तर तिला लक्ष दिसला. निकाल लागल्या लागल्या लक्षला मेघनाचा पडलेला चेहरा दिसला होता. तिच्या बॉयफ्रेंडने तिला सोडल होत ते ही त्याला कळल होत. म्हणून तो तिच्या मागेच आला होता. त्याला आलेली शंका खरी ठरली होती.
“तुला काहीच माहीत नाही, तु नको मध्ये पडूस” मेघना रागात थरथरली.
“नको टेन्शन घेऊन. मी काही मध्ये पडणार नाही. तुला तुझा जीव देण्यासाठी मदत करायला आलोय. थोड एक माझ. नंतर मीच मदत करेल तुला.” लक्ष निर्विकार होत बोलला.
मेघना गोंधळली. 'बाकी कोणी असत तर मला अडवल असत जीव देण्यापासून, पण हा काय असा उलटेच बोलत आहे.’ मेघनाच मन
“फक्त तु उडी मारल्यानंतर काय काय होईल एवढच सांगेल. नंतरच बघायला तु थोडीच असशील.” लक्षने ति काही बोलण्या आधीच पुढे बोलायला सुरवात केली.
आता पुढे.
“हे बघ, इथुन तु उडी मारलीस न. खाली जाताना तुझा पडण्याचा स्पीड वाढत जाईल. पोटात गोळा येईल. खाली जाताना ह्रदय मजबुत असेल तर ठिक नाहीतर माणुस आधीच बेशुध्द होतो. खाली आपटल की फुगा फुटतो तशी बॉडी फुटते. तु गेल्यानंतर तुझी ती शिवलेली बॉडी बघुन तुझे आई वडील जागेपणीच मरणाच्या यातना भोगतील. एवढ्या वरुन आपटल्यावरही माणुस कधीकधी वाचतो हं. पण मग हात पाय मोडलेले, कमरेत फ्रॅक्चर घेऊन आयुष्यभर दुसऱ्याच्या जिवावर जगत…..”
“शट अप, जस्ट शट अप” मेघना तिच्या कानावर हात ठेवून जोरात ओरडली. “असा कसा रे मित्र तु, तुझी मैत्रीण जीव द्यायला आलीये आणि तिला अडवायच सोडुन तिला अशा गोष्टी सांगतोय.” मेघना संतापाने थरथरत होती.
“जी मुलगी काही महिन्याच्या प्रेमासाठी जीव द्यायला जाते, पण तिला आयुष्यभर जिव लावलेल्या आई वडीलांची चिंतापण नाही, अशा मुलीला मी का म्हणून वाचवु??” लक्षचा आवाज कडक झाला.
तोवर बाकीचा ग्रुप ही येथून पोहोचलेला होता.
“मग काय करावं मी?? घरात काय तोंड दाखवु??” मेघना रडतच बोलत होती.
“अशा कोणावरही विश्वास ठेवलाच होतास न, तसा आई वडिलांवर ठेवुन बघ. काय करतील जास्तीत जास्त ओरडतील, मारतील. पण मग आपल्याला संभाळुन पण तेच घेतात न.” लक्ष
तिला समजावुन सगळे तिला घरी घेऊन गेले. तिच्या घरात पण लक्षने संभाळून घेतल होत. वरचे वर सगळेच एकमेकांच्या घरी जात असल्याने, घरचेही त्यांच्या ग्रुपला चांगलेच ओळखत होते. निघताना लक्षने मेघनाच्या हातावर हात ठेवला आणि बोलला.
“दोन दिसांच जिणं
एक जन्म एक मरण,
हाती आपल्या फक्त
भरभरुन जगण…”
मेघनाच्या चेहऱ्यावर स्माईल आली. तिच्या आई वडीलांनी लक्षचे खुप आभार मानले.
सुट्टीमध्ये वातावरणात बदल म्हणून सगळेच एक दिवसाच्या ट्रिपवर फिरायला गेले होते.
लक्ष दिसायला पण एखाद्या हिरोपेक्षा कमी नव्हता. वरुन त्याची कवीता, शायरी करण्याची सवय. यामुळे त्याच्या अवतीभवती नेहमीच मुलींचा गराडा जास्त होता. त्याचा ग्रुप तर त्याला चांदण्यांमधील तारा बोलायचे.
कॉलेजच दुसर वर्ष चालु झाल होत. हसत खेळत दिवस चालले होते. त्याच्या मागावर तर अनेक मुली होत्या, पण त्याने आजवर कोणालाच भाव दिला नव्हता. त्याला त्याचा ग्रुप विचारायचा पण की त्याला कधीच कोणी आवडली नाही का म्हणून. पण त्याच उत्तर स्पष्ट असायच.
“जेवढ मोकळ आपण मैत्रीत जगतो न. तेवढ कदाचीतच प्रेमात जगता येत असेल. प्रेमात ही मैत्रीला जागणारी जेव्हा भेटेल न. तेव्हा बघुया” लक्ष
लक्षच अस तत्वज्ञान ऐकुन बाकी ग्रुप डोक्याला हात लावून बसत होता. बर त्याला बाय म्हटलेल पण आवडायच नाही. म्हणे बाय तेव्हाच बोलतात जेव्हा परत कधी भेट होईल ते माहीती नसत तेव्हा. जेव्हा पण सगळे घरी जायला निघायचे तो सगळ्यांना “भेटु उद्या” असच बोलायचा.
त्यांच्या वर्गातला असा एकही मुलगा किंवा मुलगी नसेल की लक्षने त्याची मदत केली नसेल. एकदा तर लक्षने त्याची कॉलेजची फी पण कॉलेजच्या वॉचमनच्या मुलाच्या उपचारासाठी दिलेली होती. त्याने त्या वर्षीची कॉलेजची फि शेवटच्या महीन्यात भरली होती. पुर्ण कॉलेज त्याला चांगलच ओळखत होत त्यामुळे त्याला ती सुट भेटलेली होती.
वार्षीक स्नेह संमेलनाचे वारे वाहू लागले होते. विद्यार्थी कमिटी प्रमुख लक्ष असल्याकारणाने त्याच्या भोवती ब-याच मुला मुलींचा गराडा होता. मुलींचा जरा जास्तच. त्यामुळे बरीच मुल त्याच्यावर जळत पण होती. त्याच्याबद्दल काही अफवा ही पसरवत होते. पण लक्षने त्याकडे दुर्लक्ष केले होते.
काही मुलांनी लक्षला त्यांच्या ग्रुपच सादरीकरण बघायला बोलावले होते. त्यामुळे लक्षने त्याच्या ग्रुपला त्याला यायला वेळ लागेल म्हणून सांगितले. परंतु त्या ग्रुपची पाहीजे तशी तयारी नसल्याने, लक्षने त्यांना प्रॅक्टिस करायला सांगुन परत फिरला होता.
तेवढ्यात काही मुलींचा गराडा त्याला पडला होता. इकडे त्याच्यावर जळणा-या मुलांनी त्याच्या ग्रुपच्या बाजुला जावुन गप्पा मारायला सुरवात केली.
“नशीब असाव तर लक्ष सारख. सारखा मुलींच्या गराड्यात. आता पण त्याच्या ग्रुपला वेटींगवर ठेवुन तो मुलींमध्येच बसला आहे.” एक मुलगा.
घरुन कॉलेजला येणाऱ्या आकांक्षाने लक्षला मुलींमध्ये पाहील होत. तिने तेच त्यांच्या ग्रुपला सांगीतल.
“अग पण तो कधी खोट बोलतो का?? त्याला येऊदे मग विचारु” किरण.
“त्यांच सोड, आता आकांक्षाने पण पाहील न, आपल्याला थांबवुन ठेवुन तो मुलींमध्ये बसलेला आहे ते.” तेजस
“ती आत्ता आलीये, तिला त्या आधीच कस माहीत असेल.” किरण
तेवढ्यात लक्ष आला. त्याने किरणच्या खांद्यावर हात ठेवला.
“काही मुलींना मेंदु कमी दिलेला असतो का?” लक्ष वैतागत बोलला.
“का रे काय झाल??” महेश
“अरे त्या मुलींनी त्यांची प्रॅक्टीस दाखवायला बोलावले तर त्यांची स्टेप एक होती आणि गाण भलतच लागायच. त्यांच्याकडुन इकडे येत होतो तर ती एक विचारते मी अर्धच गाण गायल तर चालेल का?? अशे लहान मुलांसारखे प्रश्न विचारत होते न. नशीब आकांक्षाने आवाज दिला मला.” लक्षने तिला हातच जोडले, “माते तुमच्यामुळे मी सुटलो.”
सगळा ग्रुप एकमेकांकडे बघत राहीला. पण नंतर लगेचच हसायला लागले.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा