Login

रुसलेल्या ता-याची मैत्री भाग ३

मैत्रीच्या सुखासाठी लक्षने सगळच सोडल होत. पण याने खरच त्याचे मित्र सुखी होतील?

मागील भागात. 

तेवढ्यात लक्ष आला. त्याने किरणच्या खांद्यावर हात ठेवला.

“काही मुलींना मेंदु कमी दिलेला असतो का?” लक्ष वैतागत बोलला.

“का रे काय झाल??” महेश

“अरे त्या मुलींनी त्यांची प्रॅक्टीस दाखवायला बोलावले तर त्यांची स्टेप एक होती आणि गाण भलतचं लागायच. त्यांच्याकडुन इकडे येत होतो तर ती एक विचारते मी अर्धच गाण गायल तर चालेल का?? अशे लहान मुलांसारखे प्रश्न विचारत होते न. नशीब आकांक्षाने आवाज दिला मला.” लक्षने तिला हातच जोडले, “माते तुमच्यामुळे मी सुटलो.”

सगळा ग्रुप एकमेकांकडे बघत राहीला. पण नंतर लगेचच हसायला लागले.

आता पुढे. 

मग त्यांनी त्यांच्या ग्रुपच्या डान्सची पण प्रॅक्टीस केली. त्यांच वार्षिक स्नेहसंमेलन खुप छान पार पडल होत.

त्यांच्या कॉलेजच्या सहलीच्या वेळेस पण लक्ष आणि त्यांच्या ग्रुप मध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. जेणेकरुन त्यांचा ग्रुप तुटेल. पण त्याने फारसा काही फरक पडला नव्हता त्यांच्या मैत्रीत.

त्यांची एक्झाम जवळ आलेली होती. मेघना परत आजारी पडली होती. त्या दिवशी सगळे तिला भेटायला जाणार होते. सगळे आले होते पण लक्षचा काहीच पत्ता नव्हता.

दुसऱ्या दिवशी ग्रुपला कळल की त्याच्या घरी त्या दिवशी राधीका थांबली होती. दिवसा काय, ती रात्र पण ति त्याच्याच घरी थांबली होती. सगळ्यांना आता राग आला होता. कारण त्यांची मैत्रीण आजारी पडलेली असताना तो एका दुसऱ्या मुलीसोबत रात्रभर त्याच्या घरी थांबला होता.

पुर्ण कॉलेजमध्ये तस पसरलेल होत. लक्षने सगळ्यांशी बोलायचा प्रयत्न केलेला होता. पण त्याच कोणीच ऐकुन घेत नव्हत.

“अरे किमान काय झाले ते तर ऐकुन घ्या.” लक्ष

“अजुन काय ऐकायच बाकी आहे. आपली मैत्रीण आजारी असताना तु त्या मुलीसोबतच….??” तन्मय “ती तुझ्या घरी होती हे तर तु मान्य केलेच न.”

“त्यातच सगळ आल.” आकांक्षा.

“नाहीतर काय.” महेश

“हे बघ, पुर्ण कॉलेजमध्ये तुझ्यामुळे आमची बदनामी होत आहे, तु आमच्यापासुन लांबच रहा. तु लांब राहीला तरच, आम्ही सुखात राहु” तेजस रागात बोलला.

लक्षने सगळ्यांकडे पाहील. सगळ्यांनी त्यांची मान वळवून घेतलेली होती. मग लक्ष कोणाला काहीच समजवीण्याच्या भानगडीत पडला नाही.

त्यांची एक्झाम संपली. पण कोणीही लक्षसोबत बोलल नाही. शेवटी लक्षने त्यांच्या ग्रुपवर मेसेज केला.

“माझ्या दुर जाण्याने तुम्ही खरच सुखी होत असाल तर ठीक आहे. हा चेहरा आता तुम्हाला कधीच दाखवणार नाही. गुड बाय.” लक्ष

आणि त्याने तो ग्रुप सोडला. नंतर तो कुठे गेला. त्याचा मोबाईल नंबर काय कोणाला काहीही कळल नाही.

काही दिवसांनी राधीका त्या ग्रुपला भेटली.

“अरे, लक्षचा काही कॉनटॅक्ट आहे का??” राधीका

“का ग?? त्या दिवशी पुर्ण दिवस भेटुन पण समाधान झाल नाही का??” मेघना जरा खोचकपणे बोलली.

“अग त्याचे आभार मानायचे राहीले आहेत.” राधीका

सगळे गोंधळले.

“आभार ते कशासाठी??” महेश

मग राधीकाने त्या दिवशी झालेला प्रसंग सांगितला.

राधीकाच्या आईला तिच्या वडीलांनी मारहाण केलेली होती. त्यात त्यांच्या डोक्याला जबर मार बसलेला होता. त्यांना हॉस्पीटलमध्ये घेऊन गेले होते. तर तिथेही तिचे वडील गोंधळ घालत होते.

त्याचवेळी लक्ष तिला तिथे भेटला. त्याच्या वडीलांना आज सकाळी तिथेच अॅडमिट केलेल होत. त्यांना कामावरुन कमी केल्याने माईनर अटॅक आलेला होता. ते तर आता धोक्याच्या बाहेर होते, पण त्याला बाहेर गोंधळ दिसला. त्याने पाहील तर त्याला राधीका दिसली. जिला तिचे वडील तेव्हाही मारण्याचे प्रयत्न करत होते. लक्ष पटकन खाली आला. त्याने सगळी परिस्थिती संभाळली. तिच्या आईला हॉस्पीटलमध्ये अॅडमीट केल. तिच्या वडीलांविरुध्द पोलीसांत रितसर तक्रार नोंदवली.

तिच्या आईला डोक्याला जबर मार बसल्याने तात्काळ ऑपरेशन कराव लागणार होत. राधीका एकटीच होती. तिला काय कराव सुचत नव्हत. मग लक्षनेच सगळ हाताळायला सुरवात केली होती. त्याच्या जवळची सगळी सेव्हिंग त्यातच संपली होती. राधीकाला घरी एकटीला रहायला भिती वाटत होती, म्हणुन त्या दिवशी लक्षने त्याच्या आईसोबत तिला त्याच्या घरीच थांबवले होते. तर लक्ष रात्रभर त्याचे वडील आणि राधीकाच्या आईजवळ थांबला होता.

“त्याच्यामुळे आज मी आणि माझी आई निट आहे. आता त्याचे पैसे परत करायचे आहेत तर साहेबच गायब आहेत. काहीपण म्हणा, पण त्याच्यासारखा मित्र भेटायला न नशीब लागत.” राधीका सगळ्यांचा गोंधळलेला चेहरा बघुन निराशाजनक हसली. “तुमच्याकडे ही नाहीये वाटत नंबर त्याचा.”

सगळे फक्त ऐकत राहीले होते.

“तुम्हाला माहितीये, जेव्हा ती अफवा पसरली होती न की मी त्याच्या घरी रात्रभर होती. मला पण पहीले राग आला होता. पण लक्ष बोलला होता. आपली माणस आपल्याला समजुन घेतील म्हणून. माझ्या माणसांनी तर मला समजुन घेतल. पण कदाचीत त्याला नाही वाटत.” राधीकाने मेघनाकडे पाहील. “मेघना तुला तर मरणाच्या दारातून परत आणल होत न त्याने. गेले दोन वर्ष त्याच्या अवतीभोवती मुलींचा घोळका रहायचा, तो मुलगा कोण्या मुलीसोबत वेळ घालवण्यासाठी दोन वर्षे वाट बघेल का?? आपण न त्याच्या सारखा मित्र डिझर्वच करत नाही. राधीका तिरस्काराने बोलली “सो एन्जॉय युर लाईफ.” राधीका बोलुन निघुन गेली.

सगळ्यांनी एकमेकांकडे पाहील. सगळ्यांच्याच तोंडाला कुलुप लागल होत. सगळे उठले आणि लक्षच्या घरी गेले. तिथेही तो भेटला नाही. शेजा-यांनी सांगीतले की ते सगळेच शिफ्ट झाले आहेत. कुठे गेले, कोणालाच माहीती नाही म्हणून. त्यांनी शोधण्याचा खुप प्रयत्न केला. पण तो कुठेच भेटला नाही.

आज त्या गोष्टीला पाच वर्षे झाली होती.

क्रमशः

0

🎭 Series Post

View all