Login

रुसलेल्या ता-याची मैत्री भाग ४

लक्षला तर शोधल होत, पण तो परत यायला तयार होईल का??

मागील भागात. 

सगळ्यांनी एकमेकांकडे पाहील. सगळ्यांच्याच तोंडाला कुलुप लागल होत. सगळे उठले आणि लक्षच्या घरी गेले. तिथेही तो भेटला नाही. शेजा-यांनी सांगीतले की ते सगळेच शिफ्ट झाले आहेत. कुठे गेले, कोणालाच माहीती नाही म्हणून. त्यांनी शोधण्याचा खुप प्रयत्न केला. पण तो कुठेच भेटला नाही.

आज त्या गोष्टीला पाच वर्षे झाली होती.

आता पुढे. 

“आमच्या एका चुकी साठी, एवढी मोठी शिक्षा दिलीस” महेशच्या डोळ्यात पाणी जमा झाल होत. “परीक्षा संपेपर्यंत वाट पाहिलीस, अजुन दोन दिवस थांबला असतास न.”

महेशने तो व्हॉट्सअॅपचा ग्रुप उघडला. ज्यात लक्षचा मेसेज वरच त्यांच्या ग्रुपच्या गप्पा अजुनही तिथेच थांबलेल्या होत्या. त्याच्या त्या गुड बाय शब्दानंतर कोणाची हिम्मत झाली नाही मेसेज करायची.

त्याला तिथे बसुन बसुन तिन तास झाले होते. तोवर मेघना येऊन पण पोहोचली होती. तिने महेशच्या खांद्याला हात लावून त्याला भानावर आणल.

“तु इतक्या लवकर कशी पोहोचली??” महेश

“मी ठाणेलाच होती. नाशिक हायवेवर. जस तुझ लोकेशन भेटल तशीच गाडी युटर्न मारली. मग आली लवकर.” मेघना “कुठे आहे लक्ष??”

“सर्वांना येऊदे.” महेश

“पोहोचतायेत सगळेच.” मेघना.

तोवर त्या स्नॅक्स कॉर्नरच्या समोर तिन चार गाड्या येऊन थांबल्या. त्यातुन आकांक्षा, तेजस, तन्मय, किरण आणि राधीका उतरले.

सगळ्यांनी एकच विचारल “कुठे आहे लक्ष?”

महेशने त्यांना पत्ता दाखवला. आता बराच उशीर झाला असल्याने. तिथल्याच एका हॉटेलवर त्यांनी रुम बुक केली. ती रात्रही त्यांना बरीच मोठी वाटायला लागली होती. डोळ्यांवरची झोप तर कोसो दुर पळाली होती.

दुसऱ्या दिवशी सगळे लवकरच उठले. तयारी करुन त्या पत्त्यावर जायला निघाले. तासाभराने सगळे त्या पत्त्यावर पोहोचले. पण पुढे जायला त्यांचे पाय धजावत नव्हते. कारण एवढ्या वर्षांनी लक्ष कसा रिअॅक्ट करेल कोणालाच माहीती नव्हत.

राधीका मात्र पटापट पुढे गेली. तिनेच दार वाजवल. लक्षच्या आईने दार उघडल. राधीकाला तिचे पाहुन त्यांना आश्चर्य वाटल. कारण तो पत्ता कोणालाही सांगितलेला नव्हता. त्या काहीच बोलत नाही बघुन राधीकाच बोलली.

“आता काय आत पण येऊ देणार नाही का तुम्ही??” राधीका कडक आवाजात बोलली. तशा त्या भानावर आल्या आणि त्यांनी राधीकाला आत घेतल. तिच्या मागे सगळ्या ग्रुपला त्यांनी पाहील. त्यांनाही घरात घेतल.

“काका कसे आहेत आता??” लक्षचे वडील कुठेच दिसले नाही म्हणून राधीकाने विचारले होते.

“एकदम मस्त. त्यांचा ग्रुप आहे त्याच्यांसोबत गेले आहेत. येतील थोड्यावेळाने.” लक्षची आई

“आणि तुमचा तो हिरो कुठे आहे??” राधीकाच्या आवाजात आता राग आला. “तेव्हा तर बहीण बहीण बोलुन सगळ काही मदत करुन गेला आणि नंतर काही पत्ताच नाही त्याचा. अस नात निभवायच असत का??” तिचे डोळे पाणावले,

“अग, सगळ अचानकच झाल बघ.” लक्षच्या आईने बोलायला सुरवात केली. “ह्यांना कामावरुन कमी केल. वरुन त्याच कॉलेजमध्ये पण काही बिनसल होत वाटत. काय ते बोलला नाही मला. पण जाणवल ते. मग मीच त्याला म्हटल, असही इथे काहीच राहील नाहीये तर नाशिकलाच शिफ्ट होऊया. तो तुम्हाला सांगायला पण आला होता न.” लक्षच्या आईने ग्रुप कडे पाहीले. “मग सगळ आवरुन आलो नाशिकला. असही लक्षच्या बाबांच्या निवृत्तीनंतर आम्ही नाशिकलाच येणार होतो. त्याला इथल्याच एका कॉलेजमध्ये जॉब पण लागला होता.

त्यांच्याकडे याच काहीच उत्तर नव्हत. कारण तो आला होता बोलायला तेव्हा त्याच बोलण कोणीही ऐकुन घेतल नव्हत.

“आम्हीच समजुन घ्यायला कमी पडलो त्याला” मेघना बोलुन गेली. ती हळुच बोलल्याने लक्षच्या आईला ते काही ऐकु गेल नाही. त्या किचनमध्ये निघुन गेल्या चहा नाश्त्याच बघायला.

तोवर लक्ष पण येऊन पोहोचला होता. पहीले तर त्याला खुप भरुन आले होत सगळ्यांना तिथे बघुन. पण मग आईला सगळ कळेल म्हणून त्याने त्याच्या भावनांवर ताबा ठेवत घरात पाय ठेवला. घरात आई नाही बघुन त्याने त्याची बॅग त्याच्या चेहऱ्यावर लावली.

“काय फालतुगीरी आहे ही” त्याच ते वागण बघुन सगळ्यांना अजुन एमबॅरेस फिल झाल होत, म्हणून मग महेशच बोलला होता.

“आता तुम्हीच बोलले होते न, जा नको चेहरा दाखवु. आता तुमचाच शब्द पाळतोय.” लक्षला यावेळी पण कॉमेडी सुचत होती. मुळात त्याचा स्वभाव राग धरुन ठेवणा-यांतला नव्हताच.

“बस न, अजुन किती लाजवशील आम्हाला” आकांक्षा बारीक आवाजात बोलली.

त्याने जशी बॅग खाली केली. तशी त्याचा कानाखाली बसली. त्याने त्याचे गाल चोळत वर पाहीले. तर त्याला राधीका दिसली.

“सांगुन जाता येत नाही” राधीकाने लक्षचा हात पिळला. “अं?? आम्ही तिथे वेड्यासारखं शोधतोय तुला आणि तुला साध कळवावस पण वाटल नाही का??” तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. “मला बहीण मानल होतस न, मग बहीणीला अस एकटीला सोडुन जातात का कुठे??” आता राधीका लक्षला मारायालाच लागली होती. तो पुढे न ती मागे. तो त्याच्या आईच्या मागे लपायला गेला.

“आई आवर हिला, एखाद हाड मोडल, तर तिला वहिनी कुठुन भेटेल??” लक्ष

“आता तुझ तुच बघ बाबा. तुला बोलली होती की सगळ्यांना सांग म्हणून. आता भोग तुझ्या कर्माची फळ “ लक्षच्या आईने हसतच तिचे हात वर केले.

“सॉरी न, बेहेना” लक्षने त्याचे कान पकडले. मग राधीकानेही तिचा राग सोडत लक्षला मिठी मारली. मग त्याने त्याच्या ग्रुपकडे पाहील.

“अजुनही राग असेल, तर मी बाहेरच जातो.” लक्ष

क्रमशः


0

🎭 Series Post

View all