मागील भागात.
नाश्त्याला अजुन कोणीही हात लावला नाही म्हणून मग लक्ष बोलला.
“अरे संपवा तो नाश्ता, अजुन तर जेवण बाकी आहे.” लक्ष
“पहीले सांग की तुला एवढ सगळं कस माहीत. कोणी सांगीतल तुला? मग आम्हाला का तुझ काही कळवु दिल नाहीस?” महेश
“मला माहितीये कोण दिलीये ते.” मेघना.
सगळ्यांनी मेघनाकडे आश्चर्याने पाहील.
“यातल्या सगळ्या गोष्टी ख-या आहेत. फक्त एक सोडुन.” मेघनाने रोखुन बघायला सुरवात केली. तशी समोरची नजर आपोआप झुकली गेली.
“आतातरी बोलणार आहेस” मेघना. समोरुन काहीच उत्तर आल नाही.
“काय झाल नक्की??” लक्ष
आता पुढे.
“हिने तुला सगळ खर सांगीतल, फक्त स्वतःचच खोट सांगीतल.” मेघना “तिला कुठलही स्थळ आलेल नाहीये.”
किरण तिचा हात पकडणार तोच मेघना बोलुन गेली.
“काय??” लक्ष “पण ती माझ्याशी खोटं का बोलेल??”
“याला कारण तुच आहेस.” मेघना “तुच बोलला होतास न कि प्रेमात पण मैत्रीला जागणारी मुलगी भेटली तर तु विचार करशील. तिने तेच केल. तु तिला मैत्रीची शप्पथ घालुनच आम्हाला सांगायला मनाई केली असशील न. खुप प्रेम करते रे ति तुझ्यावर."
सगळेच शॉक झाले. लक्षला तिच्याशी बोलताना थोडफार जाणवल होत. पण किरणने जास्त जाणवू दिल नव्हत. लक्ष भेटत नव्हता म्हणून सगळे निराश झाले होते. पण किरण मात्र झपाटल्यासारखी त्याला शोधत होती.
महिन्याभरातच तिला त्याला शोधायला यश आल होत. लक्ष बोलता बोलता तिला एकदा बोलला होता की, बाबांची रिटायर्डमेंट झाली की ते नाशिकला जाणार आहेत. मग किरणने तिच्या काकांच्या मुलीला लक्षचा फोटो देवुन ठेवला होता. महीन्याभराने तिच्या काकांच्या मुलीला तो नाशिकच्या त्या कॉलेजमध्ये दिसला होता. किरण लागलीच नाशिकला गेली होती.
जसा तिला लक्ष दिसला, तस तिने त्याला मारायला सुरवात केली. एका हाताने डोळ्यातल पाणी पुसत होती तर दुसऱ्या हाताने त्याला मारत होती. लक्षला थोड वेगळ जाणवल ते. पण तो काहीच बोलला नाही. तिला तिच्या मनाला शांत करु देत होता.
“अग हळु, इथे प्रोफेसर म्हणून जॉईन करणार आहे. काहीतरी इज्जत ठेव माझी” लक्ष हसत बोलला. “कस वाटेल मोडलेला हात घेउन मी शिकवायला जाताना.” लक्षने तिचे हात पकडले.
“मुर्ख, बावळट. काही काळजी आहे की नाही आमची. अस न सांगता कोणी गायब होतात का??” किरण चिडून बोलली.
“काळजी होती म्हणून तर काहीच बोललो नाही. असही आम्ही नाशिकलाच येणार होतो. तेव्हा जास्त जड गेल असत. मग त्यांच्या डोळ्यातल पाणी मला पहावल गेल नसत.” लक्ष “थोड वाईट वाटल. पण म्हटलं बर झाल. माझ काम सोप झाल होत.”
“थांब, आत्ताच ग्रुपवर मेसेज टाकते.” किरण मोबाईल घेणार तोच लक्षने अडवल.
“तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे. त्यांना तु काहीच सांगणार नाहीस.” लक्षच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले.
“अरे खुप गिल्टी फिल करत आहेत ते.” किरण
“तरीही” लक्ष “ते परत मला तिकडे यायला भाग पाडतील आणि आता मला तिथल्या त्या आठवणीच नकोत. उभ आयुष्य जात आपली स्वत:ची इमेज बनवायला. पण तिच मातीत मिसळावयला एक क्षणही लावत नाही काही माणस. सगळ्यांना वाटत की मुलांबद्दल काही अफवा पसरवल्या तरी त्यांना फरक पडत नाही. पण तस खरच नसत. एकवेळ मुली रडुन व्यक्त तरी होतात. पण मुलांना तर तसही व्यक्त नाही होता येत. त्यामुळे जस चालु आहे तसच चालु राहु दे. काही मदत लागलीच तर सांग मला. मी असेनच की नेहमी तुमच्याबरोबरच.”
किरणने लक्षचा नवीन नंबर घेतला आणि कायम त्याच्या संपर्कात राहीली.
(वर्तमानकाळ)
“तुझ्या मैत्रीच्या शपथेला जागली ती. तिला आस होती की कधीतरी तुला तिच्या डोळ्यातल प्रेम दिसेल म्हणून. पण एक तु, तुला दिसल जरी असेल तरी तु पाहीलच नाहीस न.” मेघना. “तु विचारलच नसतं न, तर ति कायमची ऑस्ट्रेलियाला जाणार होती.”
लक्ष किरणकडे बघतच राहीला होता. त्याला झालेली जाणीव खरी ठरली होती. पण त्याने भास समजुन दुर्लक्ष केल होत.
“आम्ही तर कधीच रेडी आहोत, पण हाच काही बोलत नव्हता.” लक्षचे वडीलही येऊन पोहोचले होते, जे किरणच्या बाजुला जाऊन उभे होते. लक्ष परत गोंधळला.
“ती कधीच भेटुन गेलीये आम्हाला.” लक्षची आईने खुलासा केला. “आम्हाला आवडली आहे ती.”
मग सगळ्या ग्रुपने त्यांच्या हातात एक एक वस्तु घेतली. कोणी लाटण घेतलं, तर कोणी काठी. महेशने तर खलबत्तामधला कुट्टाच घेतला होता हातात.
“आजवर तु तुझी मैत्री निभावलीस न” आकांक्षा
सगळे लक्षला रोखुन बघायला लागले.
“आता आम्हाला आमची मैत्री निभावू दे.” मेघना
“लग्नाला तयार आहेस की नाही एवढचं सांग.” तन्मय.
सगळ्यांना तो अवतार बघुन लक्ष गांगरून गेला.
“अरे लग्नासाठी विचारत आहात की धमकी देत आहात.” लक्ष
“हे बघ तु तुझ्या मैत्रीसाठी काहीही करु शकतोस न, तर आम्ही पण आमच्या मैत्रीणीसाठी काहीही करु शकतो.” तेजस
“तुला तुझ्या मित्रांच्या डोळ्यात पाणी बघायला आवडत नाही न, तस मला माझ्या मैत्रिणीच्या डोळ्यात पाणी बघायला आवडत नाही.” मेघना
“मला पण चालेल वहिनी म्हणून” राधीकाही त्यांच्यात सामील झाली.
“पण अस जबरदस्तीने त्यांना लग्नासाठी तयार केलेल मला नाही आवडणार.” किरणने लक्षचा चेहरा वाचला होता. तो बारीक तोंड करुन बसलेला होता.
“जबरदस्तीच काय घेऊन बसलीयेस.” लक्षची आई “ज्या दिवशी तु त्या स्थळाबद्दल सांगीतल होत न, तर चार दिवस तो जेवला नव्हता.”
आता तर किरणने पण झाडु उचलला होता.
तेव्हा कुठे लक्ष लाजुन हो बोलला होता. काही दिवसातच दोघांच लग्न लावून देण्यात आल होत. सगळ्यांनीच ते खुप एन्जॉय केल होत. सगळा ग्रुप परत एकत्र झाला होता. लांब राहुन पण तो मनाने जवळ होता.
अशीच असते न मैत्री.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा