जावई बापू पुन्हा असे रुसायचे नाही
लाजे काजे तिला तिच्या मोहरी घेऊन आला तिचा नवरा ,नाहीतर त्याने छोट्याश्या भांडणापायी तिला सांगून टाकले होते, "तुझ्या वडिलांनी माझा अपमान केला आहे तर आता तुझ्या नवऱ्याचा अपमान म्हणजे तो तुझा अपमान असायला हवा होता...पण इतके दिवस मी काहीही नाही बोललो ,पण आता मात्र मी ठरवले आहे..तू माहेरी जायचे नाही..जायचे असेल तर माझ्या परवानगी शिवाय नाही जायचे.."
तिने ही ठरवले ,ठीक आहे मी नाहीच जाणार माहेरी मान्य आहे...त्यांनी माझ्या नवऱ्याचा इतका मोठा अपमान केला, त्याची मानहानी केली..त्याला चार चौघात बोलले..छोट्या जावयाला सोन्याची चैन केली ,ह्याला नाही केली...छोट्या जावयाला गाडी पाठवली ह्यांना नाही पाठवली...छोट्या जावयाला पैसे दिले ह्यांना नाही दिले... मी ही सांगते दादाला...माझा नवरा इतका गुणाचा त्याला तुम्ही लग्न हवे तिथे ,हवे तसे...हवे तितक्या माणसात लावून दिले...त्यात मोठे रिसेप्शन ही करून दिला...त्यांना मोठी नौकरी लागावी म्हणून लाखो रुपये दिले...त्यांना बदली हवी होती त्यांच्या गावी म्हणून तिथे बदली साठी पैसे ही दिले...आणि त्यात ते आम्हाला घर घेण्याचे मोठे स्वप्न बघत होते..ज्याच्यासाठी त्यांनी काय मागून मागितले तर अजून लाखो रुपये मागितले...ते तुम्ही सहज घर विकून...जमीन विकून रस्त्यावर येवून... सोने नाणे ,दागिने मोडून...किडन्या विकून ही देऊ शकला असतात तरी तुम्ही त्यांना पैसे दिले नाहीत...त्यांचा हा किती मोठा अपमान तुम्ही केला आहे ह्याची जरा ही जाणीव नाही तुम्हाला...बायको हे म्हणत होती..तसे तसे तो हळूहळू सरळ होत होता.
"अग नको तू सगळी लिस्ट ऐकवू ,आपण आता पुन्हा त्या।झालेल्या अपमानास्पद वागणुकी बद्दल कुठे ही चर्चा नको करायला ,नको उगाच लोकांना सांगायला ह्या बद्दल..मी हवे तर सांगतो त्यांना की आमची पैश्याची सोय झाली आहे.. आमचे स्वप्नाचे घर ते आम्ही पूर्ण करू..तुम्ही फक्त पूजेला यावे... आणि हवे तर आपण आजच जाऊन तिथे त्यांना सांगून येऊ की पैसे राहू द्या आम्ही ते चुकून बोलून गेलो होतो...त्यात आमचा असा काही एक अपमान झाला नाही.. " तो
"नाही नाही ,असे कसे आपण तर जाणार पैसे मागून राहणार...त्यांची छान वाट लावणार...त्यांना देशोधडीला ला लावूनच दम घेणार...त्यांनी केलेल्या अपमानाचा मस्त खरमरीत शब्दात बदला घेणार.. "
तो आता पुरता शरमला होता ,त्यात ती जे बोलत सुटली होती ते सगळ्या कॉलेजमधील स्टाफ समोर सांगत होती...तिला समजून चुकले होते ,इतके दिवस हा उठसुठ माहेरी पैसे मागत होता...ह्याची अशी ठेव ही नव्हती तरी पैसे मागायचे आणि मुद्दाम मला भावनिक त्रास द्यायचा...त्यात भांडण...आई वडिलांना लेकीच्या आनंदासाठी दबावात घेणे...नुसता मनस्ताप देत रहाणे ही खोड झाली होती..
आज मग त्यांच्या अध्यक्ष साहेबांच्या समोर तिने त्याच्या style मध्ये त्याची चांगलीच उतरवली होती ,तिने ठरवले होते की सगळ्याना सांगायचे की हा हुंडा घेणार व्यक्ती आहेच परंतु हा वेळोवेळी तिच्या माहेरच्यांना दबावात घेऊन पैसे मागत असतो..आणि आता तर ह्दच केली होती ,की जर त्यांनी पैसे दिले नाहीत तर तू ही माहेरी जायचे नाही..
इकडे जमलेले त्याची भावकितील लोक आणि सासरचे लोक ,त्याचे कॉलेजमध्ये असलेले मोठी हस्ती यांना कळून द्यावे की हा सतत पैसे मागतो आणि अजून ही हुंडा घेत असतो.. त्याने आधी ही हुंडा घेतला आहे..जो की कायद्याने गुन्हा आहे.. गुन्हा ठरतो...त्यासाठी त्याला जेल ही होऊ शकते..
त्याचे आई वडील ही चपापल्या नजरेने बघत होते... गावकरी शरमले होते..जो शिक्षक असून ही इतरांना सल्ले देत असायचा तोच हुंडा घेत होता..त्यासाठी बायकोला माहेरी जाण्यापासून थांबवत होता..आता ह्यावर काय कारवाई करावी...? अश्याने आपल्या आदर्श गावची बदनामी होईल...इतर त्याने सरळ सर्वांसमोर जाहीर माफीच मागावी हे योग्य राहील..आणि इतरांचे ही डोळे उघतील..
"मी माफी मागतो ,हवे तर तिला माहेरी घेऊन जातो तिथे त्यांची पाय पकडून माफी मागतो..पण आता माझ्या वर कारवाई करून माझी इज्जत आणि नौकरी घालवून टाकू नका.."
जाहीर माफी मागितल्यावर तो लगेच तिला घेऊन तिच्या माहेरी आला होता... छोटा जावई ही हजर होता...तेव्हाच तिच्या बहिणीने त्यांचे फोटो काढत ते सगळीकडे एक लेख लिहून पाठवले होते...जवळपास सगळ्या गावात माहीत झाले रुसलेला जावई बायको सोबत सासरी परत आले..आता बरेच पैसे खाऊ जावई चांगलेच सावध झाले.
"मी माफी मागतो ,हवे तर तिला माहेरी घेऊन जातो तिथे त्यांची पाय पकडून माफी मागतो..पण आता माझ्या वर कारवाई करून माझी इज्जत आणि नौकरी घालवून टाकू नका.."
जाहीर माफी मागितल्यावर तो लगेच तिला घेऊन तिच्या माहेरी आला होता... छोटा जावई ही हजर होता...तेव्हाच तिच्या बहिणीने त्यांचे फोटो काढत ते सगळीकडे एक लेख लिहून पाठवले होते...जवळपास सगळ्या गावात माहीत झाले रुसलेला जावई बायको सोबत सासरी परत आले..आता बरेच पैसे खाऊ जावई चांगलेच सावध झाले.
माझ्या सारख्या अडाणी बायकोसोबत इथून पुढे असा पंगा घेऊ नका...आज सुटलात पण पुन्हा सोडणार नाही...मीच नाही तर खुद्द तुमचे गाव सोडणार नाही..
तिने त्याला एक समजून सांगणारी धमकी दिली होती...तिचे माहेर लुटून ज्याने तिचे माहेर तोडण्याची ज्याने हिम्मत केली होती त्याची हीच शिक्षा होती.. बरोबर ना..
©®अनुराधा आंधळे पालवे
तिने त्याला एक समजून सांगणारी धमकी दिली होती...तिचे माहेर लुटून ज्याने तिचे माहेर तोडण्याची ज्याने हिम्मत केली होती त्याची हीच शिक्षा होती.. बरोबर ना..
©®अनुराधा आंधळे पालवे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा