मागील भागात.
“सांगुन जाता येत नाही” राधीकाने लक्षचा हात पिळला. “अं?? आम्ही तिथे वेड्यासारखे शोधतोय तुला आणि तुला साध कळवावस पण वाटल नाही का??” तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. “मला बहीण मानल होतस न, मग बहीणीला अस एकटीला सोडुन जातात का कुठे??” आता राधीका लक्षला मारायालाच लागली होती. तो पुढे न ती मागे. तो त्याच्या आईच्या मागे लपायला गेला.
“आई आवर हिला, एखाद हाड मोडल, तर तिला वहिनी कुठुन भेटेल??” लक्ष
“आता तुझ तुच बघ बाबा. तुला बोलली होती की सगळ्यांना सांग म्हणून. आता भोग तुझ्या कर्माची फळ “ लक्षच्या आई ने हसतच तिचे हात वर केले.
“सॉरी न, बेहेना” लक्षने त्याचे कान पकडले. मग राधीकानेही तिचा राग सोडत लक्षला मिठी मारली. मग त्याने त्याच्या ग्रुपकडे पाहील.
“अजुनही राग असेल, तर मी बाहेरच जातो.” लक्ष
आता पुढे.
तसे सगळेच उठले आणि त्यांनी एक ग्रुप हग केला.
“सॉरी न यार” आकांक्षा
लक्ष त्यांच्यावर चिडला नाही हे बघुन त्यांना अजुनच भरुन येत होत. पण त्यांना बोलायला शब्दही साथ देत नव्हते.
“अरे, बोलण तर होतच राहील. आधी नाश्ता करुन घ्या. एकतर सकाळपासून तुम्ही काही खाल्लं पण नाहीये.” लक्ष
परत सगळे लक्षचा चेहरा बघत राहीले. कारण हॉटेल वरुन निघताना त्यांनी काहीच खाल्लेल नव्हत. अगदी चहा पण घेतलेला नव्हता आणि घरात आल्याबरोबर लक्ष त्यांचा चेहरा वाचुन गेलेला होता.
त्याने सगळ्यांना नाश्ता सर्व्ह केला. त्यांच्या सगळ्यांचे आवडीचे पदार्थ बघुन सगळ्यांना आता चक्करच यायची बाकी होती. सगळे गोंधळून लक्षकडे बघायला लागले होते.
“नवीन कडे दिलेल्या कागदावरच्या अक्षरावरून मला समजल होत मला.” लक्षने खुलासा केला.
एवढ होऊनही लक्ष काहीच विसरला नव्हता. आता तर त्यांच्या समोर वाढलेला नाश्ताही त्यांना धुसर दिसायला लागला होता. सगळ्यांचे डोळे पाणावलेले होते.
“अरे वेडे आहात का??” लक्ष त्यांच्या डोळ्यातल पाणी बघुन बोलला. “तुम्हाला अस पाहील तर आई मला अजुन भांडेल. चला खा पटापट.”
तन्मय, तेजस, महेश लक्षला बिलगले.
“सॉरी न यार. खुप मोठी चूक झाली आमच्याकडून” महेशला कंट्रोलच करता आले नाही त्याचे अश्रु.
“अरे, मी रागावलो थोडीच आहे. पण थोड वाईट वाटल. पण आता तर तेही नाहीये.” लक्ष
“म्हणजे तु माफ केले आम्हाला न??” मेघनाने तिचे डोळे पुसले.
“मी रागावले नाही तर, माफीचा प्रश्न येतोच कुठे.” लक्षने तिलाही साईडनेच मिठी मारली.
“मग चल न परत तिकडे.” आकांक्षा बारीक आवाजात बोलली.
लक्ष हसला. “मलाही आवडल असत रे, पण आता शक्य नाही ते.”
“म्हणजे तु आम्हाला माफ केलच नाहीये” मेघना.
“अग, अस नाहीये. बोललो न फक्त थोड वाईट वाटल होत. पण आता तुम्ही आलात तर ते पण सोडले मी.” लक्ष “आता इथे सेटलच झालोय मी. कॉलेजला प्रोफेसर झालोय. तेही कायमस्वरुपी. आई बाबांना पण छान सोबती भेटले आहेत. त्यांचीही काही न काही चालुच असत.”
तोवर लक्षची आई किचन मधुन चहा घेऊन बाहेर आली.
“हा तरी कुठे था-यावर असतो, याला वेसण घालायची म्हणून मुलगी शोधावी. तर ती पण शोधु देत नाही. म्हटलं तुला कोणी आवडते तर तस सांग. तर तस पण काही नाहीये बोलतोय. मीच वैतागली आहे. किती दिवस ह्या म्हातारीला त्रास देणार हा काय माहीत.” लक्षची आई बोलुन गेली.
“म्हाता-या आणि तुम्ही??” राधिका “मला माहितीये काका तुमच्याकडे बघुन अजुनही शिट्ट्या मारतात ते.” राधिका जरा खट्याळ झाली.
“गप ग तु.” लक्षच्या आईने तिच्या पाठीत धपाटा टाकला. “काहीही काय बोलतेयस.” मनातुन लक्षच्या आई लाजल्यापण होत्या.
“म्हणजे तुझा निर्णय फायनल आहे.” तेजस जरा कडक आवाजात बोलला.
“हे बघा, आज न उद्या सगळे आपल्या आपल्या वाटेला लागणारच होते. जस मेघनाला प्रमोशन भेटुन पुढच्या पोस्टसाठी लंडनला चाललीये. आकांक्षाला तर दिल्लीला जॉब लागणार आहे. किरणसाठी आलेला मुलगा पण ऑस्ट्रेलियाला सेटल आहे, तर तन्मय बंगलोरला आणि तु पुणेला जाणार आहेस. मुंबईमध्ये फक्त महेश असणार आहे.” लक्ष “तो तर दर महिन्याला नाशिकला येत असतो. आम्ही तर नेहमीच भेटत राहु. तुम्ही पण एक दिवस काढा तेव्हा भेटु की सगळे.”
एवढ सगळ ऐकुन सगळ्यांनाच जबरदस्त शॉक बसला होता. कोणालाही लक्षची काहीच माहीती नव्हती. पण लक्षने सगळ्यांचीच माहीती ठेवली होती.
“कसं असत न, वेळ आणि आलेली संधी कोणासाठीच थांबत नाही. आयुष्यभर आपण जवळच राहु मुळात हीच आशा खोटी असते. लांब राहुन पण आपल्याला नाती निभावता येतात, फक्त गैरसमजुतीची ठिणगी वेळीच विझवता आली पाहीजे.” लक्ष
नाश्त्याला अजुन कोणीही होत लावला नाही म्हणून मग लक्ष बोलला.
“अरे संपवा तो नाश्ता, अजुन तर जेवण बाकी आहे.” लक्ष
“पहीले सांग की तुला एवढ सगळ कस माहीत. कोणी सांगीतल तुला? मग आम्हाला का तुझ काही कळवु दिल नाहीस?" महेश
“मला माहितीये कोण दिलीये ते.” मेघना.
सगळ्यांनी मेघनाकडे आश्चर्याने पाहील.
“यातल्या सगळ्या गोष्टी ख-या आहेत. फक्त एक सोडुन.” मेघनाने रोखुन बघायला सुरवात केली. तशी समोरची नजर आपोआप झुकली गेली.
“आतातरी बोलणार आहेस” मेघना. समोरुन काहीच उत्तर आल नाही.
“काय झाल नक्की??” लक्ष
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा