ऋतुकाश...
प्युअर लव....भाग 1
प्युअर लव....भाग 1
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर-जानेवारी 2025-2026
डिसेंबर-जानेवारी 2025-2026
आरशासमोर उदास बसलेली ती....
स्वतःला आरशात न्याहाळत होती....
न्याहाळत होती की विचारात गुंतलेली....
तिचं तिलाच ठाऊक....
स्वतःला आरशात न्याहाळत होती....
न्याहाळत होती की विचारात गुंतलेली....
तिचं तिलाच ठाऊक....
लाल रंगाची रेशमी पैठणी त्यावर सोन्याचं नक्षीकाम, गळ्यात नक्षीदार पारंपरिक दागिने, कपाळावर चंद्रकोर टिकली.. काजळाने टपोरे झालेले डोळे, गालावर पडलेली खळी.. केसांवर माळलेला गजरा...अद्भुत सुंदरता असलेली ती....
बराच वेळ स्वतःला न्याहाळत बसलेली होती...
बराच वेळ स्वतःला न्याहाळत बसलेली होती...
"मॅडम, तुम्ही रेडी आहात ना.. मुहूर्ताची वेळ जवळ येतेय." कामिनी...आकाशची सेक्रेटरी तिच्या जवळ आली.
तिने हळूच डोळे मिटले.. नकळत अश्रू बाहेर पडले...
"मॅडम एक विचारू?"
तिने डोळे पुसत होकारार्थी मान हलवली.
"आज तुमचं लग्न होतय..ते ही तुमच्या आवडीच्या व्यक्तीशी... तरी तुम्ही खूश नाही आहात?"
तिने डोळे पुसत होकारार्थी मान हलवली.
"आज तुमचं लग्न होतय..ते ही तुमच्या आवडीच्या व्यक्तीशी... तरी तुम्ही खूश नाही आहात?"
"कामिनी जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. तुला जे वर-वर दिसतंय ना तसं काहीच नाही आहे.."
"पण मॅडम..."
ती पुढे काही बोलणार कामिनीच्या मोबाईलची रिंग वाजली...
"हेलो, येस सर... ओके."
कामिनी तिथून निघून गेली.
ती पुढे काही बोलणार कामिनीच्या मोबाईलची रिंग वाजली...
"हेलो, येस सर... ओके."
कामिनी तिथून निघून गेली.
आणि ती..... ती गेली तिच्या जुन्या आठवणीत...
ऋतुजा देशमुख.. लहानपणापासून लाडात वाढलेली आई वडीलांची म्हणजेच विक्रम देशमुख आणि मधुरा देशमुख यांची एकुलती एक 26 वर्षाची मुलगी...
विक्रम देशमुख नावाजलेले बिझनेसमन... त्यांचा स्वतःचा मोठा एम्पायर होता.
ऋतुजा एकुलती एक असल्यामुळे कुठल्याही गोष्टीला नकार मिळाला नव्हता. लहानपणापासून अभ्यासात हुशार होती, पहिला नंबर कधीच चुकायचा नाही. शाळेत सगळ्यांची लाडकी होती. अभ्यास असो वा क्रीडाक्षेत्र कुठल्याही क्षेत्रात ती अव्वल असायची.
दिसायला गोरीपान, नाकनक्षी सुंदर पाहताक्षणी कुणालाही आवडेल अशी..
बालपण मजेत गेलं, शाळा संपून कॉलेजला अॅडमिशन घेतलं. तिला स्पर्धात्मक परीक्षा द्यायच्या होत्या म्हणून तिने आर्ट मधून ग्रॅज्युएशन करण्याच ठरवलं.. तिच्या आई बाबांचा तिला पूर्ण पाठींबा होता..
कॉलेजमध्ये पण नाटक, एकांकिका, वादविवाद स्पर्धा यात पुढे असायची.. सगळ सुरळीत सुरू असताना तिच्या आयुष्यात आला तो...

"ऋतुजा....ऋतुजा आर यू रेडी." त्याचा आवाज कानी पडला आणि ती लगेच आठवणीतून बाहेर आली.
तो रूममध्ये आला.. तो म्हणजेच आकाश नायर,
प्रताप नायर आणि जानकी नायर यांचा धाकटा मुलगा... त्यांच्याच कंपनीत सी ई ओ म्हणून कार्यरत होता.. अतिशय हुशार, हॅन्डसम, बॉडी-बिल्डर, मुलींचा क्रश...
तो रूममध्ये आला.. तो म्हणजेच आकाश नायर,
प्रताप नायर आणि जानकी नायर यांचा धाकटा मुलगा... त्यांच्याच कंपनीत सी ई ओ म्हणून कार्यरत होता.. अतिशय हुशार, हॅन्डसम, बॉडी-बिल्डर, मुलींचा क्रश...
"येस." तिच्या जवळ आला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला, तिने खांदा हलवला.
"हे डिअर.. आता तरी मला असं करू नको, नाऊ आय एम बिकम यूअर हजबंड."
त्याने मागेहून तिच्या गळ्यात हात घातला...
तिला ऑकवर्ड फील झालं पण तिने ते चेहर्यावर दाखवलं नव्हतं.
"येस...सॉरी...आकाश..."
"दॅट्स माय गुड गर्ल."
त्याने डोळे चमकवत तिच्या गालाला कीस केलं आणि तिथून निघून गेला.
"दॅट्स माय गुड गर्ल."
त्याने डोळे चमकवत तिच्या गालाला कीस केलं आणि तिथून निघून गेला.
ऋतुजाने डोळ्यात पाणी आणून कीस केलेल्या गालाला हात लावून डोळे मिटले.
'ऋतुजा डोन्ट क्राय..डोन्ट क्राय प्लिज...
आता हेच तुझं आयुष्य आहे, आता जे काही घडेल त्याचा स्विकार करून पुढे चालत राहायचं.' स्वतःशीच पुटपुटत तिने डोळे पुसले.
आता हेच तुझं आयुष्य आहे, आता जे काही घडेल त्याचा स्विकार करून पुढे चालत राहायचं.' स्वतःशीच पुटपुटत तिने डोळे पुसले.
क्रमशः
ऋतुजा वैरागडकर
ऋतुजा वैरागडकर
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा