ऋतुकाश...
प्युअर लव... भाग 2
प्युअर लव... भाग 2
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर- जानेवारी 2025-2026
डिसेंबर- जानेवारी 2025-2026
आलिशान रिसॉर्ट फुलांनी सजलेला होता, सगळीकडे रोषणाई होती. चहूकडे फुलांनी सजावट केली होती. झेंडू, गुलाबाच्या फुलांची तोरणे लागली होती. मंडप सजला होता. मुख्य लॉबीमध्ये नैसर्गिक लाकडी नक्षीकाम केलेलं फर्निचर ठेवलेलं होतं. आजुबाजुला हिरवीगार रोपे लावलेली होती.
वातावरणात आनंद पसरला होता. पाहुण्यांचे आगमन सुरू होते.
वातावरणात आनंद पसरला होता. पाहुण्यांचे आगमन सुरू होते.
भिंतीवर कलाकृती काढलेल्या होत्या, मंद प्रकाश देणारे दिवे लावले होते. तो रिसॉर्ट दिसायला मोठा जरी दिसत असला तरी त्यात निसर्गाशी एकरूप होऊन शांत आणि आरामदायी अनुभव मिळावा म्हणून हा सगळा खटाटोप केला होता.
रिसॉर्ट मधील प्रत्येक रूम छान सजवली होती.
झुळझुळणाऱ्या दिव्यांच्या माळा आणि आरामदायक बैठक व्यवस्था होती.
रिसॉर्ट मधील प्रत्येक रूम छान सजवली होती.
झुळझुळणाऱ्या दिव्यांच्या माळा आणि आरामदायक बैठक व्यवस्था होती.
ऋतुजा तयार होऊन बसलेली होती... स्वतःला आरशात बघत असताना तिला काहीतरी आठवलं, तिने लगेच डोळे पुसले आणि धावतच तिथून निघाली.
धावतच ती एका बंद खोलीजवळ आली.. दाराला बाहेरून कडी लावलेली होती.
तिने कडी काढली, हळूच दार उघडला.
धावतच ती एका बंद खोलीजवळ आली.. दाराला बाहेरून कडी लावलेली होती.
तिने कडी काढली, हळूच दार उघडला.
समोर बघताच तिला तो दिसला..
खुर्चीवर बसलेला.... हात आणि पाय दोरखंडने बांधुन ठेवलेले.. तोंडात कापड कोंबलेलं... डोळ्यातून ओघळलेल्या अश्रूंनी गालावर रेषा सुकलेल्या होत्या. डोळे बंद होते, कड्या पाणावल्या होत्या.
एकही क्षणाचा विलंब न करता ती त्याच्या जवळ गेली.
"प्रकाश... ये राजा, डोळे उघड प्लिज.. बघ कोण आलय. मी..मी आलेय तुझी ऋतु." तिने त्याच्या गालावरून हात फिरवला,त्याचे डोळे पुसले, तोंडातला कापड काढला.
त्याने हळूच डोळे उघडले.
"प्रकाश... ये राजा, डोळे उघड प्लिज.. बघ कोण आलय. मी..मी आलेय तुझी ऋतु." तिने त्याच्या गालावरून हात फिरवला,त्याचे डोळे पुसले, तोंडातला कापड काढला.
त्याने हळूच डोळे उघडले.
"तू आलीस.. किती वाट बघायला लावतेस." दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि खूप रडले.
"प्रकाश मला हे लग्न... मला हे नको आहे.. मला हे कधीच नको होतं, मला हे लग्न करायचं नाही आहे. मला तू हवा आहेस प्रकाश..फक्त तू."
"मी तुझाच आहे आणि तुझाच असणार आहे. हे लग्न फक्त दोन शरीराचं होतंय. आपण मनातून कधीचेच एक झालोय."
त्याने तिच्या गालावरून हात फिरवला.
त्याने तिच्या गालावरून हात फिरवला.
"तु जा आता, सगळे तुझी वाट बघत असतील."
"नाही प्रकाश..नाही."
"जा तुला माझी शपथ आहे."
"जा तुला माझी शपथ आहे."
ती बाहेर गेली, बाहेरून दार लावला आणि मागे वळणार तोच..
"ऋतुजा तू इथे काय करतेयस?"
"आकाश मी ते...ते मी."
"मी ते..ते मी... काय?
"काही नाही." म्हणत ती धावतच तिथून निघून गेली.
"आकाश मी ते...ते मी."
"मी ते..ते मी... काय?
"काही नाही." म्हणत ती धावतच तिथून निघून गेली.
लग्नाची सगळी तयारी झाली होती.. तिची आई अरुंधती तिच्या जवळ आली.
"ऋतुजा बाळा झालीस तयार?"
"ह्म्म."
"ऋतुजा बाळा झालीस तयार?"
"ह्म्म."
"रुसलीस आईवर."
"नाही आई, हे माझ्या नशिबाचे भोग आहेत. मी तुझ्यावर का रागवेल?"
"आणि बाबावर?"
तिने लगेच नजर फिरवली. आई तू हो पुढे मी येते."
"अगं.. नवरी मुलगी अशी एकटी मंडपात जात नाही."
"मी एकटी जाणार नाही, पण तुझ्यासोबतही येणार नाही."
"ऋतुजा..." तिची आई अवाक् होऊन तिच्याकडे बघतच राहिली.
क्रमशः
ऋतुजा वैरागडकर
ऋतुजा वैरागडकर
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा