Login

ऋतुकाश...प्युअर लव भाग 3

मन मारून गोष्टी कराव्या लागल्या की किती त्रास होतो
ऋतुकाश
प्युअर लव...भाग 3
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026

ऋतुजा आरशासमोर बसली.
"आई अग तु खरंच जा, मी येते."
ऋतुजा दारात आली तोच तिचा हात कुणीतरी पकडला, तिने दचकून मागे बघितलं.
"तु ? तु इथे काय करतो?"

"मी तुला मंडपात घेऊन जाणार."

"नाही प्रकाश.. नाही. माझं लग्न लागत असताना मी तुला असं समोर बघू शकणार नाही. प्लीज तु जा इथून. एक मिनिट तुला तर बांधुन ठेवलेलं होत ना."

"सुटका केली मी कशीतरी, तुझ्यासाठी...फक्त तुझ्यासाठी."

ती लगेच त्याच्या मिठीत गेली.
"कदाचित ही आपली शेवटची भेट असेल."

"नाही प्रकाश, असं बोलू नकोस. तुला बघितल्याशिवाय दिवस जात नाही माझा. तुझ्याशिवाय कशी जगेल मी?"

"सवय करून घे आता."
"कशी सवय करून घेऊ, तु तर श्वास न घेता जगायला सांगतोयस मला."

"चल खाली चल, सगळे वाट बघत आहेत."
"नाही मी जाते एकटी, तु नको येऊ."
"प्रकाश तू इथून निघून जा, खूप दूर जा. इथे तुझ्या जीवाला धोका आहे."

"ऋतुजा शांत हो.. मला काहीही होणार नाही. मी ठीक आहे तू माझी काळजी करू नको. तू स्वतःची काळजी घे."

त्याने तिला घट्ट मिठी मारली.. तिच्या माथ्यावरून चुंबन घेतलं आणि दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला.

ऋतुजा मंडपात आली.
"किती सुंदर दिसतेय माझी डॉल." तिच्या वडीलांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला.

आईने माथ्यावर चुंबन घेतलं.
ती मंडपात जाणार तोच तिच्यासमोर आकाशचा मोठा भाऊ समीर आणि वहिनी पूजा दोघेही आले.

"काय घाई आहे जाऊबाई.. या या इकडे या तुम्ही."
पूजाने तिला सोफ्यावर बसवलं.

आणि त्यानंतर ग्रँड एंट्री झाली ती आकाशची..
गाण सुरू झालं आणि पूजा नाचतच आली.

"लो चली मैं अपनी देवर की बारात ले के लो चली मैं
न बैण्ड बजा, न ही बाराती, खुशियों की सौगात ले के
लो चली मैं   ...

देवर दुल्हा बना, सर पे सेहरा सजा
भाभी बढ़कर आज बलाइयाँ लेती है
प्रेम की कलियाँ खिले, पल पल खुशियाँ मिले
सच्चे मन से आज दुआएँ देती है
घोड़े पे चढ़ के, चला है बाँका, अपनी दुल्हन से मिलने
लो चली मैं   ...

वाह! वाह! राम जी, जोड़ी क्या बनाई
देवर देवरानीजी, बधाई हो बधाई
सब रसमों से बड़ी है जग में दिल से दिल की सगाई

आज है शुभ घड़ी, आज बनी मैं बड़ी
कल तक घर की बहु थी, अब हूँ जेठानी
हुक़ुम चलाऊँगी मैं, आँख दिखाऊँगी मैं
सहमी खड़ी रहेगी मेरी देवरानी
हज़ार सपने, पलकों में अपने दीवानी मैं साथ ले के
लो चली मैं"

क्रमशः
ऋतुजा वैरागडकर

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.


0

🎭 Series Post

View all