ऋतुकाश... प्युअर लव भाग 4
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026

सगळ्यांनी नाच- गाण्याचा आनंद घेतला.
मुहूर्ताची वेळ टळायला नको म्हणून आकाश आणि ऋतुजा स्टेजवर गेले.
एकमेकासमोर उभे राहिले. आकाश तिच्याकडे प्रेमाने बघत होता.
"तू आज खूप सुंदर दिसतेयस." त्याने तिला इशारा केला. तिने खाली मान घातली.
ऋतुजाचे डोळे पाणावले होते. मनात काहूर माजला होता.

"काय मी बोलून गेलो श्वास माझा थांबला
मी इथे अन तो तिथे हा खेळ आता संपला
मी स्वतःच्या काळजावर घातलेला घाव हा
रोज आतून जाळतो मी वेदनेचा गाव हा"
मी इथे अन तो तिथे हा खेळ आता संपला
मी स्वतःच्या काळजावर घातलेला घाव हा
रोज आतून जाळतो मी वेदनेचा गाव हा"
ती मनातल्या मनात जळत होती, आकाश मात्र खूप खुश होता. सगळं त्याच्या मनासारखं झाल होतं. त्याला जे हवं होतं ते मिळालं.
तदेव लग्नं सुदिनं तदेव
ताराबलं चन्द्रबलं तदेव।
विद्याबलं दैवबलं तदेव
लक्ष्मीपते तेंऽघ्रियुगं स्मरामि॥
ताराबलं चन्द्रबलं तदेव।
विद्याबलं दैवबलं तदेव
लक्ष्मीपते तेंऽघ्रियुगं स्मरामि॥
दोघांनी एकमेकांना हार घातले..दोघांच्या डोक्यावर अक्षदा पडल्या.
सगळ्यांनी एन्जॉय केलं, फोटोसेशन झालं. नवरदेव नवरीला चिडवून झालं.
फोटो काढणार्या मुलाने वेगवेगळ्या पोझ मध्ये खूप फोटो काढून दिले, सगळे खूप खुश होते. ऋतुजाच्या बाबांच्या डोळ्यात तर आनंदाश्रू होते. ते खूप भावूक झाले होते.
नातेवाईक, मित्र मैत्रिणी सगळ्यांनी फोटो काढून घेतले.

पुढच्या विधींना सुरुवात झाली.
अग्नीसमोर नवदांपत्याला बसायला सांगितलं, दोघेही हात जोडून बसले. भटजी मंत्रोच्चार करत होते आणि हे दोघेही
हवनसामग्री अग्नीत अर्पण करत होते.
त्यानंतर सप्तपदीचा विधी सुरू झाला.

आकाशने तिचा हात घट्ट पकडला होता, त्याच्या चेहर्यावरचे आनंदाचे क्षण टिपले जात होते, ती मात्र तिच्याच भावविश्वात होती.
अग्नी भोवती सात फेरे घेताना भटजी प्रत्येक पावलांचा अर्थ सांगत होते.
वर वधू अग्नीसमोर सात पाऊल एकत्र चालतात, तेव्हा ते फक्त चालणं नसतं तर ते एकत्र आयुष्यभर सोबत चालण्याचं प्रतीक असतं.

पहिलं पाऊल अन्नासाठी- घर नेहमी अन्नधान्याने भरून राहिलं.
दुसरं शक्तीसाठी- आजारापणात एकमेकांची शक्ति बनून साथ द्यायची.
तिसरं समृद्धीसाठी- एकमेकांना सांभाळून घेऊन समृद्ध होण्यासाठी
चौथं सुख-दुःखात साथ देण्यासाठी- परिस्थिती कशीही असली तरी साथ सोडायची नाही यासाठी

पाचवं संततीसाठी- चांगले संस्कार देऊन मुलांना घडविण्यासाठी
सहावं ऋतूंसारख्या बदलांना सामोरं जाण्यासाठी- वेळ कशीही असू दे साथ कधी सोडणार नाही हा धीर देण्यासाठी

आणि सातवं पाऊल आजन्म मैत्रीसाठी
सात पावलं पूर्ण होताच ते केवळ पती-पत्नी नव्हे, तर आयुष्यभराचे सखेसोबती झाले.

क्रमशः
ऋतुजा वैरागडकर
ऋतुजा वैरागडकर
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा