Login

ऋतुकाश प्युअर लव भाग 6

प्रेमाची परिभाषा
ऋतुकाश...प्युअर लव भाग 6
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026

लाईट ऑफ झाले, तशी ऋतुजा किंचाळली.

"ऋतुजा किंचाळतेस काय.. अगं लाइट बंद झालेत येतील काही वेळात."
तिने त्याला नकळत घट्ट पकडलं.

"मला अंधाराची भीती वाटते."
"ऋतुजा शांत हो, मी आहे इथे."
थोड्या वेळाने लाइट आले. ऋतुजा तशीच त्याच्या पासून लांब गेली.

कपडे चेंज करून तिने आवरलं आणि ती झोपली.

दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर उठून तिने आंघोळ करून पूजा केली, सकाळचं वातावरण खूप प्रसन्न वाटतं होतं पण ऋतुजा आतून आनंदी नव्हती मुळीच.

ती किचनमध्ये गेली, तिने सगळ्यांसाठी चहा केला.

"अगं तू उठलीस पण एवढ्या लवकर. मला वाटलं रात्री उशीर झाला असेल तुला झोपायला तू काही एवढ्यात उठणार नाहीस." पूजाने जरा गम्मत केली तेवढ्यात जानकीताई किचनमध्ये आल्या.

"काय गं पूजा तू पण..."
"आई गंमत केली हो."
दोघीही हसायला लागल्या, ऋतुजा मात्र शांत उभी होती.
जानकीच्या लक्षात आलं की ऋतुजा शांत आहे, काहीतरी आहे जे मला माहीत नाही.

दुपारी जानकी तिच्या खोलीत गेली.

"ऋतुजा येऊ का आत?"
"आई या ना, असं विचारू नका, बरं दिसत नाही ते."

"हे घे कॉफी."

"आई तुम्ही कॉफी का घेऊन आलात? तुम्हाला हवी होती तर मला सांगायचं मी बनवली असती."

"तू बस गं, यानिमित्ताने आपल बोलणं होईल."

दोघींनी बराच वेळ गप्पा मारल्या. जानकीने तिला तिचा वेळ देण्याचं ठरवलं.

आकाशचं ऑफिस रुटीन सुरु झालं, ऋतुजाने पण त्याला जॉईन केलं. दोघेही सोबत जायचे, दिवस सरकू लागले.
पूजा आणि समीर लंडनला गेले.

ऋतुजा जानकीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होती.
घरी जानकी आणि ऑफिसमध्ये कामिनी असल्यामुळे ऋतुजा कॉन्फर्ट फिल करत होती.
सगळ छान सुरु होतं.

एक दोन दिवसानंतर ऋतुजाचे आई बाबा तिला भेटायला आले, जानकी म्हणाली ऋतुजाला तुला काही दिवस माहेरी जायचं असेल तर तू जाऊ शकते. ती नाही बोलली पण नंतर सगळे बोलल्यानंतर ती तयार झाली.
आई बाबा सोबत घरी आल्या आल्या ती तिच्या रूममध्ये गेली.
कपाट उघडून काहीतरी शोधू लागली. तिने हाताला एक बॉक्स लागला. तिने तो बाहेर काढला.
तो उघडला आणि नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.

क्रमशः
ऋतुजा वैरागडकर


सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

0

🎭 Series Post

View all