ऋतुकाश...प्युअर लव भाग 7
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026

आई बाबा सोबत घरी आल्या आल्या ती तिच्या रूममध्ये गेली.
कपाट उघडून काहीतरी शोधू लागली. तिच्या हाताला एक बॉक्स लागला. तिने तो बाहेर काढला, उघडला आणि नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.
तिच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
त्याच्यासोबत घालवलेला एक एक क्षण तिच्या डोळ्यासमोरून जात होता.
तो जरी आज तिच्यासोबत नसला तरी त्याची आठवण कमी होत नव्हती.

"आत येऊ का?" मधुराताई खोलीच्या बाहेर उभ्या होत्या.
"आई विचारते काय? ये ना, मुलीच्या खोलीत यायला तुला परवानगी लागते काय?"

"तसं नाही गं."
मधुराताई आत आल्या, तिच्या बाजूला बसल्या.
"ऋतुजा तू खुश आहेस ना?"
तिने होकारार्थी मान हलवली.
"ऋतुजा तू खुश आहेस ना?"
तिने होकारार्थी मान हलवली.
दोघींच्या गप्पा झाल्या.
काही वेळाने ऋतुजा फ्रेश होऊन जेवायला आली.
ऋतुजाचे बाबा विक्रम तिच्या नजरेस पडले आणि ती वळून माघारी गेली.
"ऋतुजा ये बस."

मधुराताईने तिला मागेहून हाक दिली.
"आई मला भूक नाही आहे." तिने वळून बघितलं आणि ती जाणार तेवढ्यात जोरात आवाज आला.

"ऋतुजा जेवायला बस, अन्नाचा कधीही अपमान करू नये."
"बाबा प्लिज मला अजिबात भूक नाही आहे आणि असली तरी जेवायची अजिबात इच्छा नाही."
"हे असं वागणं तुला शोभत नाही."
"आणि तुम्हाला...तुम्हाला शोभतं."
"आणि तुम्हाला...तुम्हाला शोभतं."
"ऋतुजा..." विक्रमने आवाज चढवला.
"अहो जरा शांत व्हा ना."
"तू मला शांत रहायला सांगतेस. अगं ती कशी वागतेय ते बघ आधी."

"अहो आता मुलीचं लग्न झालंय, तिच्यावर आवाज चढवणं बरं दिसत नाही. तुम्ही शांत व्हा बघू."
ऋतुजा रागात तिच्या खोलीत निघून गेली, धाडकन दरवाजा आपटला.
तिने तो बॉक्स उघडला, त्यातून एक फोटो बाहेर काढला. त्यावरून हात फिरवला, छातीशी बिलगवला आणि डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या.
तिने तो फोटो समोर ठेवला,
"का? का माझ्यासोबतच असं घडलं, बोल.. तू जर सोबत असतास तर आज मी खूप आनंदात असते. तुझ्याशिवाय कसं जगायचं सांग ना राजा. कसं जगायचं तुझ्याविना.. एक एक क्षण एक एक वर्षासारखा वाटू लागलाय. सगळं नीट होईल म्हणता म्हणता काहीच नीट झालेलं नाही प्रकाश. मला तू हवा होतास माझ्याजवळ- माझ्यासोबत. आता माझ्या आयुष्यात काहीच उरलेलं नाही.. काहीच नाही."
रडत रडत तिने डोळे मिटले.

काही क्षणात मागेहून कुणी तरी खांद्यावर हात ठेवला.
"आकाश तू.."
"आकाश तू.."
ती वळून त्याला बघतच राहिली..
क्रमशः
क्रमशः
ऋतुजा वैरागडकर
ऋतुजाच्या खांद्यावर हात कुणी ठेवला असेल? काय आहे ऋतुजाचा भूतकाळ? जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.