Login

ऋतुकाश प्युअर लव भाग 8

प्रेमाची परिभाषा
ऋतुकाश प्युअर लव भाग 8
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026

काही क्षणात मागेहून कुणी तरी खांद्यावर हात ठेवला.
"आकाश तू.."

ती वळून त्याला बघतच राहिली..

"आकाश..." तिच्या चेहर्‍यावर मनाला धक्का बसल्याचे भाव होते.

"काय झालं, कुणाशी बोलत होती? ऋतुजा...काय झालं?"
"हह..नाही.. काही नाही. तू इथे कसा?"

"तुला न्यायला आलोय."

"कुठे जायचंय?" तिच्या चेहर्‍यावर प्रश्नार्थक भाव होते.

"सरप्राईज.." त्याने खिशातून मुव्हीची दोन तिकिटे काढली.

"चल रेडी हो."

"आता नको ना प्लीज."
"अरे असं काय..प्लीज चल."
आकाशने तिला प्रेमाने जवळ घेतलं, तिला फिल्मी स्टाईलने तयार केलं आणि दोघेही घरून निघाले.
मुव्ही बघितल्यानंतर दोघेही जेवायला गेले. दोघांच्या खूप गप्पा झाल्या. त्यात आकाशची बळबळ सुरू होती, ऋतुजा मात्र शांत होती.
घरी गेल्यानंतरही आकाशचं तेच ते सुरू होतं.

"आकाश प्लिज लिव्ह मी अलोन. तू प्लिज मला थोडा वेळ शांत राहू देशील का? थकले मी तुझी बळबळ ऐकून, जरा गप्प बस प्लिज." अखेर ती त्याच्यावर चिडली.

तो काहीही न बोलता खोलीच्या बाहेर गेला.
ऋतुजाने दीर्घ श्वास घेतला आणि त्याच्या मागे गेली.
आकाश लॉनमध्ये उभा होता. ही जाऊन त्याच्या मागे उभी राहिली.

"आकाश आय एम सॉरी, आय एम सॉरी. मला तुझ्यावर चिडायला नको होतं."

तो काहीच बोलला नाही म्हणून ती खोलीत निघून गेली, काही वेळाने तो ही शांत झाला.
खोलीत गेला तेव्हा ऋतुजा झोपली होती.

दुसर्‍या दिवशी सकाळी विक्रम देशमुखांच्या मोबाईलवर फोन आला,

"साहेब तो तिथे नाही आहे."

"नाही म्हणजे?"
"साहेब आता तिकडे जाऊन बघितलं तर तो त्याच्या जागी नव्हता. आजुबाजुला सगळीकडे बघितलं पण तो कुठेच दिसला नाही."

"तुम्हाला एक काम दिलं ते ही ढंगाच करता येत नाही. हे बघा मला तो कोणत्याही किमतीत हवा आहे. आकाश पाताळ एक करा पण त्याला शोधून काढा. नाहीतर उद्याचा सूर्य तुम्हाला बघता येणार नाही.
"हो साहेब, आम्ही शोधतो."

त्याचं बोलणं सुरू होतं आणि तितक्यात मधुरा आली.  विक्रम तिच्याकडे बघून घाबरला, मनातल्या मनात विचार करू लागला.
'हिने काही ऐकलं तर नसेल ना.'
"काय झालं कुणाशी बोलत होतात."

"कुणाशी नाही." विक्रम घाबरूनच बोलला आणि घाम पुसू लागला.

क्रमशः
ऋतुजा वैरागडकर
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.