ऋतुकाश प्युअर लव भाग 9
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026
त्याचं बोलणं सुरू होतं आणि तितक्यात मधुरा आली. विक्रम तिच्याकडे बघून घाबरले, मनातल्या मनात विचार करू लागले.
'हिने काही ऐकलं तर नसेल ना.'
"काय झालं कुणाशी बोलत होतात?"
'हिने काही ऐकलं तर नसेल ना.'
"काय झालं कुणाशी बोलत होतात?"
"कुणाशी नाही." विक्रम घाबरूनच बोलले आणि घाम पुसू लागले.
आकाश आणि ऋतुजा दोघेही ऑफिसमधून निघाले. सिग्नल लागला म्हणून गाडी चौकात उभी होती... ऋतुजाने काचेतून सहज बाहेर डोकावले, तिला तो दिसला.
थकलेला, कपडे फाटलेले, केस विस्कटलेले बाकावर बसलेला तो धापा टाकत होता.
थकलेला, कपडे फाटलेले, केस विस्कटलेले बाकावर बसलेला तो धापा टाकत होता.
एका क्षणी तिला असं वाटलं गाडीतून उतरून धावत त्याच्याकडे जावं, त्याला घट्ट मिठी मारावी.
दुसर्या क्षणी तिचं लक्ष आकाशकडे गेलं आणि ती शांत झाली.
दुसर्या क्षणी तिचं लक्ष आकाशकडे गेलं आणि ती शांत झाली.
दोघेही घरी गेले,
ऋतुजाची मैत्रीण ईशा घरी बसलेली होती,
"ईशू.."
ऋतुजाची मैत्रीण ईशा घरी बसलेली होती,
"ईशू.."
दोघी एकमेकाकडे बघून खुश झाल्या. ईशूने उठून लगेच तिला मिठी मारली.
"ईशू अगं तू कधी आलीस इकडे?"
"कालच आले, तुझ्या लग्नाचं कळलं तशीच इकडे आले. तू कॉल पण नाही केला मला. कुठे आहे आमचा जिजू."
"ईशू तू आधी चल माझ्यासोबत." ऋतुजाने तिचा हात पकडला.
"अगं असं काय? मला आधी भेटू तर दे."
"अगं असं काय? मला आधी भेटू तर दे."
आकाश साईडला जाऊन फोनवर बोलत होता.
ईशू धावतच. त्याच्याकडे गेली..
ईशू धावतच. त्याच्याकडे गेली..
"हाय..जिजू."
तो वळला, त्याचा चेहरा बघताच ती शॉक झाली. ऋतुजा लगेच तिला हात धरून घेऊन गेली.
ईशू मागे वळून बघत होती.
तो वळला, त्याचा चेहरा बघताच ती शॉक झाली. ऋतुजा लगेच तिला हात धरून घेऊन गेली.
ईशू मागे वळून बघत होती.
खोलीत जाताच तिने दार लावून घेतला.
"ऋतुजा हे सगळं काय आहे?"
"ईशू मी तुला सगळं सांगते तू प्लिज शांत रहा."
"अगं पण.... तुझ्या आयुष्यात इतकं सगळं घडून गेलं आणि तू मला एका शब्दानेही बोलली नाहीस."
"अगं पण.... तुझ्या आयुष्यात इतकं सगळं घडून गेलं आणि तू मला एका शब्दानेही बोलली नाहीस."
"परिस्थितीच तशी होती.. मला हे करावं लागलं."
"आणि तो...त्याला विसरणार आहेस तू?"
"तू श्वास घ्यायला विसरायला सांगते आहेस.. तो माझा श्वास आहेस."
"तरीही तू त्याच्यापासून दूर आहेस... आता तो तुझ्या जवळ असायला हवा होता. पण आता तुझ्याजवळ दुसराच कुणीतरी आहे. त्याच्याशी बोलल्याशिवाय एक दिवस न राहणारी तू... कितीतरी दिवसापासुन लांब आहेस...हे मरण नाही तर काय आहे ऋतुजा."
"ईशू आता हेच माझं आयुष्य आहे आणि हेच सत्य आहे."
दोघीही एकमेकींना बिलगल्या.
दोघीही एकमेकींना बिलगल्या.
क्रमशः
ऋतुजा वैरागडकर
ऋतुजा वैरागडकर
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
