ऋतुकाश प्युअर लव भाग 10
डिसेंबर 2025- जानेवारी 2026
डिसेंबर 2025- जानेवारी 2026
"ईशू आता हेच माझं आयुष्य आहे आणि हेच सत्य आहे."
दोघीही एकमेकींना बिलगल्या.
दोघीही एकमेकींना बिलगल्या.
ऋतुजाने तिला घडलेला सगळा प्रकार सांगितला...
"ऋतुजा आय डोन्ट बिलिव थॅट, तुझे बाबा असं करू शकतात यावर माझा विश्वास बसत नाही आहे. आता तो कुठे आहे?"
"ऋतुजा आय डोन्ट बिलिव थॅट, तुझे बाबा असं करू शकतात यावर माझा विश्वास बसत नाही आहे. आता तो कुठे आहे?"
"रस्त्यावर.."
"म्हणजे."
"आता काही वेळापूर्वी रस्त्यावर दिसला मला, खूप बिकट अवस्था होती."
"आता काही वेळापूर्वी रस्त्यावर दिसला मला, खूप बिकट अवस्था होती."
"ऋतुजा आता हे असंच सुरू असणारं आहे, स्वतःच प्रेम मिळविण्यासाठी काहीच करणार नाही आहेस."
"प्रकाशच्या जीवाला धोका आहे. मलाच काहीच करता येणार नाही आहे."
"ईशू..ऐक ना.. आजची रात्र तू इथे थांब ना प्लीज."
"ईशू..ऐक ना.. आजची रात्र तू इथे थांब ना प्लीज."
"नाही अगं, तुझं आताच लग्न झालंय. इथे असं थांबण योग्य नाही."
"ईशू प्लिज."
"ओके पण तुला आधी तुझ्या सासूआईशी बोलावं लागेल ना."
ऋतुजाने तिच्या सासूला विचारलं, त्यांनीही मुलींचा मूड खराब व्हायला नको म्हणून हो बोलल्या.
दोघीही रात्री बोलत बसल्या होत्या, आकाश खोलीत आला.
"काही हवं होतं का?"
"हा, मी ते फाईल न्यायला आलोय."
"ऋतुजा तुझ्या मैत्रिणीशी ओळख करून दिली नाहीस."
"हा, मी ते फाईल न्यायला आलोय."
"ऋतुजा तुझ्या मैत्रिणीशी ओळख करून दिली नाहीस."
"ही ईशा.. माझी बालमैत्रीण."
"बाल...मैत्रीण... म्हणजे हिला तुझे सगळे सीक्रेट माहीत असतील नाही का?"
"काय मग ईशा कॉलेजमध्ये खूप धमाल मस्ती केली असेल, हो ना?"
तिने फक्त होकारार्थी मान हलवली.
"तुम्ही गप्पा मारा, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही." असं बोलून तो खोलीतून निघून गेला.
"तुम्ही गप्पा मारा, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही." असं बोलून तो खोलीतून निघून गेला.
ईशा दोन दिवस तिथे राहिली, ऋतुजाने तिला तिच्या घरी सोडलं.
ऋतुजाचं रोजचं रुटीन सुरु झालं.
रात्री सगळे एकत्र जेवायला बसले, प्रतापने विषय काढला.
"आकाश बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करतोयस की नाही?"
रात्री सगळे एकत्र जेवायला बसले, प्रतापने विषय काढला.
"आकाश बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करतोयस की नाही?"
"बाबा सध्या ऑफिसमध्ये कामाचा खूप लोड आहे, सध्या तरी पॉसिबल नाही..पुढल्या महिन्यात बघू."
"कामं नेहमीच असतात, हे दिवस पुन्हा येणार नाहीत. हे घे तिकीट"
"बाबा....हे काय."
"तू स्वतःहून काढता पाय घेणार नाही मला माहीत होतं आणि म्हणूनच मी सगळी व्यवस्था केली.
आता बॅग पॅक करा आणि निघा, काय ऋतुजा आवडलं का सरप्राईज."
"तू स्वतःहून काढता पाय घेणार नाही मला माहीत होतं आणि म्हणूनच मी सगळी व्यवस्था केली.
आता बॅग पॅक करा आणि निघा, काय ऋतुजा आवडलं का सरप्राईज."
ती काहीच बोलली नाही, फक्त एक स्माईल दिली.
दोघेही खोलीत गेले.
दोघेही खोलीत गेले.
"आकाश हे काय आहे?"
"मलाही माहित नव्हतं, पण छान केलं बाबांनी आता थोडा निवांत वेळ मिळेल."
"आणि मी नाही बोलले तर..."
दोघेही एकमेकांकडे बघतच राहिले.
क्रमशः
दोघेही एकमेकांकडे बघतच राहिले.
क्रमशः
ऋतुजा वैरागडकर
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा