Login

ऋतुकाश प्युअर लव भाग 11

Premachi Paribhasha
ऋतुकाश प्युअर लव भाग 11
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026

"मला जायचं नाही आहे फिरायला..प्लिज तू नाही म्हणून सांग ना." ऋतुजा नर्व्हस झाली.

"नाही मी बाबांना असा नकार देऊ शकत नाही, त्यांच्याही आपल्याकडून काही अपेक्षा असतील ना. त्यांना वाटतं आपण एकत्र वेळ घालवावा.. आता वेळ आहे, एकदा का मी कामात व्यस्त झालो तर आपण निघू शकणार नाही. प्लिज ऋतुजा रेडी हो ना आपण जाऊन येऊ ना प्लिज." त्याने तिचा हात हातात घेतला.
"प्लिज.."
तिला मिठीत घेतलं.

"ओके." तिनेही होकार दिला.

दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर निघायचं होतं, ऋतुजाने तिची बॅग पॅक केली.
"आकाश तुझे कपडे दे, तुझी बॅग भरते."

"तू असू दे, मी माझं करतो. तू झोप लवकर, पहाटे लवकर निघायचंय ना."

पहाटे दोघेही उटीसाठी निघाले.. आकाश आनंदी होता पण ऋतुजा नर्व्हस होती.
तिथे पोहोचल्यानंतर आधी हॉटेलला गेले, फ्रेश झाले आणि नाश्ता केला. तेथील वातावरण खूप छान होतं. सगळीकडे थंड वारा पसरला होता.

सूर्य मावळतीला आलेला होता. थंडगार वारा शरीराला स्पर्श करून जात होता.
ऋतुजा बाकावर बसलेली होती, बाजुला शेकोटी पेटवलेली होती. थंडीने तिचं अंग कुडकुडत होतं. आकाशने त्याच्या ब्लेझर काढून तिच्या खांद्यावर ठेवला.
दोघांनी एकमेकांकडे बघितलं, तिने तो ब्लेझर अंगावर ओढला. बराच वेळ दोघेही चांदण्याच्या खाली गप्पा मारत बसले.. बर्‍याच वेळानंतर त्याला तिच्या चेहर्‍यावर हसू दिसलं आणि त्याला समाधान वाटलं.

दुसर्‍या दिवशी सकाळी दोघेही फिरायला गेले, ते आज उंच शिखरावर जाणार होते...गाडीवाला त्यांना माहिती देत होता. ते शिखर त्या हॉटेलपासून बराच दूर होतं.

जाईपर्यंत दोघांनाही भूक लागली, टपरीवर चहा प्यायले आणि पायवाटेने निघाले. त्या उंच शिखरावरून विहंगम दृश्य दिसत होतं. खूप सुंदर आणि स्वच्छ दिसत होता. बोलता बोलता त्याने तिला घट्ट मिठी मारली.

"हे बघा लैला मजनू, घरी काही करायला मिळत नाही वाटतं म्हणून इथे येऊन तोंड काळं करतात." तिथे काही टवाळकी मुले ड्रिंक करत होते आणि यांच्यावर ताशेरे फेकत होते.

आकाशच्या पायाची आग मस्तकात गेली. तो पुढे सरसावणार तेच ऋतुजाने त्याच्या हात पकडला. त्याला नकारार्थी इशारा दिला. आकाशही तिचं ऐकून शांत झाला.
दोघेही हॉटेलवर गेले.

क्रमशः
ऋतुजा वैरागडकर

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
0

🎭 Series Post

View all