Login

ऋतुकाश प्युअर लव भाग 12

प्रेमाची परिभाषा
ऋतुकाश प्युअर लव भाग 12
डिसेंबर 2025- जानेवारी 2026

आकाशच्या पायाची आग मस्तकात गेली. तो पुढे सरसावणार तेच ऋतुजाने त्याच्या हात पकडला. त्याला नकारार्थी इशारा दिला. आकाशही तिचं ऐकून शांत झाला.
दोघेही हॉटेलवर गेले.

"तू मला अडवलंस नाहीतर आज त्याची ऐशीतैशी केली असती."
"आकाश शांत हो, मारहाण करून काय उपयोग? आपण इथे मारहाण करायला आलेलो नाही आहोत."

"ऋतुजा तू बघितलं ना, कसे बोलत होते ते..मला नाही आवडलं."

"तू शांत हो. थोड्या वेळ आराम कर मग आपण बाहेर जाऊ."

काही वेळाने ऋतुजाच्या मोबाईलवर फोन आला,
'अननोन नंबर आहे, कुणाचा असेल.' विचार करतच तिने फोन उचलला.

"हेलो."

"कशी आहेस?"

त्याचा आवाज ऐकताच तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं.
"प्रकाश...तू...कसा आहेस राजा? कुठे आहेस?"

"मी बरा आहे, तुझ्या बाबांच्या तावडीतून पळून आलोय आणि आता ते मला शोधत आहेत."

"प्रकाश तू कुठे तरी दूर निघून जा. तू त्यांच्या हाताला लागायला नको."

"नाही ऋतुजा मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत, मी कुठेही जाणार नाही. मी तुला बघितल्याशिवाय राहू शकत नाही...तुझ्याशिवाय कुठे जाऊ मी."

"प्रकाश प्लिज तू इथून दूर जा, खूप दूर."

"कुणाचा फोन आहे?" मागेहून आवाज आला.
लगेच तिने डोळे पुसले.

"माझ्या मैत्रिणीचा आहे."

"ओके मी खाली जातोय, तुझं झालं की ये तू."

"हो आलेच."

आकाश रूममधून बाहेर गेला.

"प्रकाश मी ठेवते फोन, तू स्वतःची काळजी घे."

ती फोन कट करणार त्याचा आवाज आला.
"ऋतुजा आय लव्ह यू."

"लव्ह यू टू डियर."

ती खाली गेली.

आकाश गार्डनमध्ये उभा होता,

"हाय." त्याच्या पुढ्यात जाऊन उभी राहिली.

"कोण होती तुझी मैत्रीण?"
"माझी बाल-मैत्रीण होती."

"काय नाव आहे."
"आकाश यू डोन्ट ट्रस्ट मी? किती प्रश्न विचारतोयस?"

"तसं नाही गं."

"मग कसं? तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर सांग तसं."

"आय एम सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं." त्याने प्रेमाने तिच्या गालावरून हात फिरवला.
तिला मिठीत घेतलं, डोळे घट्ट मिटले. पकड घट्ट झाली.
काही क्षणात त्याने डोळे उघडले. समोरच्या झाडालगत कुणीतरी उभं राहून आपल्याला बघतंय असा त्याला भास झाला.
तो भास होता की खरंच कुणी होतं हे त्याला कळलं नव्हतं.

त्याने तिला दूर सारून झाडाकडे जाण्यासाठी एक पाऊल पुढे टाकला.
तोच त्याच्या अंगावर कुणीतरी धावून आलं, तो खाली जमिनीवर पडला, काय घडलं क्षणभर कळलंच नाही.
काही सेकंड तो तसाच पडून होता.

क्रमशः
ऋतुजा वैरागडकर

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
0

🎭 Series Post

View all