Login

ऋतुकाश प्युअर लव भाग 13

प्रेमाची परिभाषा
ऋतुकाश प्युअर लव भाग 13
डिसेंबर 2025- जानेवारी 2026

तोच त्याच्या अंगावर कुणीतरी धावून आलं, तो खाली जमिनीवर पडला, काय घडलं क्षणभर कळलंच नाही.
काही सेकंड तो तसाच पडून होता.

"आकाश उठ, काय झालं? कोण होतं?"

"काहीच कळलं नाही कोण होतं?"

"ओके तू उठ, बस इथे. मी पाणी आणते तुझ्यासाठी."
ऋतुजा पाण्याची बॉटल घेऊन आली, तो पाणी प्यायला आणि हॉटेलमध्ये गेले.

मधुराने ऋतुजाला कॉल केला.
"हॅलो, बाळा कशी आहेस? झालं का फिरून?"
"आई मी मस्त आहे, आम्ही आताच बाहेरून आहोत. आकाशला बरं वाटत नाही आहे म्हणुन लवकर आलोय."

"काय झालं?"
"काळजी करण्यासारखं काही नाही, आता ठीक आहे तो. तू सांग तू कशी आहेस?"

"मी बरी आहे पण तुझे बाबा...."

"बाबा... काय झालं बाबांना?"
"दोन दिवस झालेत खूप अपसेट आहेत. काय झालं विचारल्यावर सांगतही नाहीत."

"मी आल्यानंतर बोलू आपण, तू काळजी करू नको."

दोघेही टूर करून परत आलेत.

दोघांचही ऑफिस सुरू झालं.
सर्व नॉर्मल सुरू होतं, आणि एक दिवस अचानक घरी एक पार्सल आलं.

"मॅडम तुमचं पार्सल." कुरिअर बॉयने दारात उभं राहून आवाज दिला.

"पार्सल..कुणाचं आहे?" आकाशच्या आईने पार्सल हातात घेत विचारलं.

तो न बोलताच निघून गेला

"आकाश...तुझं पार्सल आलंय."

"माझं पार्सल...पण मी तर काहीच मागवलं नाही."

"ऋतुजाचं असेल, तिला आवाज दे."

आवाज द्यायच्या आतच ऋतुजा हॉलमध्ये आली.
"हे पार्सल तुझं आहे का?"
" नाही आई, मी काहीच वस्तू मागविलेल्या नाही."

"ओके पार्सल ओपन करूया."

"नाही नको..बाबांचं पार्सल असेल तर..आपण बाबा येईपर्यंत थांबूया." ऋतुजाने समजूतदारपणा दाखवला.

ते पार्सल हॉलमध्ये ठेऊन सगळे आपापल्या कामाला लागले.

ऋतुजाने थोडा वेळ आराम केला, नंतर किचनमध्ये जाऊन कडक चहा बनवला आणि बाल्कनीत जाऊन बसली.

संध्याकाळी आकाशचे बाबा आले,

"अहो, तुमचं पार्सल आलंय."
"कुठलं पार्सल, मी नाही ऑर्डर दिली.. मी काहीही मागवलेल नाही आहे.

चौघेही हॉलमध्ये जमले,
"आकाश पार्सल ओपन कर." त्याच्या आईने त्याच्या हातात सुरी दिली.

आकाशने पार्सल उघडलं आणि त्याला जे दिसलं ते धक्कादायक होतं..

त्याच्या चेहर्‍यावरचा रंग उडाला. त्याला धक्का बसला.

क्रमशः
ऋतुजा वैरागडकर
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.