Login

ऋतुकाश प्युअर लव भाग 15

Premachi Paribhasha
ऋतुकाश प्युअर लव भाग 15
दीर्घकथा लेखन स्पर्धा 2025- जानेवारी 2026

ऋतुजाने ईशाला फोन केला.
"ईशू.." ती रडतच बोलली.

"ऋतुजा अगं काय? का रडतेस?"
ऋतुजाने घडलेला प्रकार ईशूला सांगितला.

"ऋतुजा तू रडू नको, सगळं ठीक होईल. तू जरा शांत रहा, थोडा वेळ जाऊ दे आणि हो आताच आकाश जीजूशी बोलायला जाऊ नको, त्यांना जरा वेळ दे त्यांच्यासाठी ही धक्कादायक गोष्ट आहे. मी येऊ का तिकडे?"

"ह्म्म."  ऋतुजा रडतच बोलली.

काही वेळाने ईशा तिथे आली, ऋतुजा बाहेरच उभी होती.

"ऋतुजा.."

"ईशू.." ऋतुजा तिला बिलगली आणि रडायला लागली.

"शांत हो आणि चल आत."
दोघीही आत गेल्या.

आकाशचे आई बाबा हॉलमध्ये बसले होते,
"ईशा तू इथे? यावेळी?"
ईशाने स्माईल दिली आणि होकारार्थी मान हलवली.

जानकीताई उठून ऋतुजाच्या जवळ आल्या,
"ऋतुजा काय झालं? आकाश इतका का चिडला? काय झालं बोल ना ग."

ती काहीही न बोलता खोलीत गेली.

"काकू तुम्ही काळजी करू नका सगळं ठीक होईल." असं म्हणत ती घाईघाईत ऋतुजाच्या मागे गेली.
ऋतुजा खोलीत गेली, आकाश बाल्कनीत उभा होता.

ती आकाशकडे जाणार तोच ईशूने तिचा हात पकडला,
"थांब ऋतुजा घाई करू नकोस. त्याला त्याचा वेळ घेऊ दे."

प्रकाश दुसर्‍या शहरात स्थायिक झाला, त्याला चांगल्या कंपनीत जॉब मिळाला. रहायला घरही मिळालेलं होतं, तो त्याच्या आईला घेऊन त्याच्यासोबत घेऊन आला होता.
आता एकच ध्येय आणि एकच स्वप्न खूप पैसा कमवायचा आणि स्वतःची नवीन ओळख निर्माण करायची.
त्याने त्याच्या खोलीत ऋतुजाचा फोटो लावला.

"प्रकाश का तिची फोटो इथे लावतोय?"

"आई हा फोटो बघून मला प्रोत्साहन मिळते, काम करण्याची ऊर्जा मिळते. ती माझ्या जवळ जरी नसली तरी माझ्या हृदयात आहे आणि नेहमी राहील."

"तिचे वडील तुझ्याशी कसे वागले ते विसरलास? तुला झालेला त्रास, मनस्ताप सगळं विसरला."

"काहीही विसरलो नाही आहे, सगळं मनातल्या कप्प्यात साठवून ठेवलंय. पण आई आता मला माझ्या कामावर लक्ष द्यायचं आहे. आता मला माझं काम महत्त्वाचं वाटते. आई तू काळजी करू नको, आता सगळं ठीक होईल आणि आता माझ्यामुळे तुला कधीही त्रास  होणार नाही."

आईने त्याला आशीर्वाद दिला.

क्रमशः
ऋतुजा वैरागडकर

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.