ऋतुकाश प्युअर लव भाग 16
दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026
दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026
आकाश अजूनही दुखावलेला होता, त्याने ऋतुजाशी अबोला धरला होता. दोघेही सोबत एकाच गाडीतून ऑफिसला जायचे पण एकमेकांशी बोलायचे नाहीत. त्याचा अबोला तिला सहन होत नव्हता. तिला त्रास होत होता पण ती कुणाजवळ काही बोलू शकत नव्हती.
मधुरा आणि विक्रम दोघेही ऋतुजाला भेटायला आले होते,
ऋतुजा ऑफिसमधून यायची होती, मधुरा आणि जानकीने खूप गप्पा मारल्या. बोलता बोलता चहा नाश्ता झाला.
ऋतुजा ऑफिसमधून आली,
ऋतुजा ऑफिसमधून यायची होती, मधुरा आणि जानकीने खूप गप्पा मारल्या. बोलता बोलता चहा नाश्ता झाला.
ऋतुजा ऑफिसमधून आली,
"ऋतुजा आली."
"हे काय एकटीच आली, आकाश कुठे आहे.?"
"तो उशिरा येणार आहे."
"तू फ्रेश होऊन ये. आई बाबा वाट बघत आहेत."
"तू फ्रेश होऊन ये. आई बाबा वाट बघत आहेत."
ऋतुजा फ्रेश होऊन आली, आईजवळ बसली.
"कशी आहेस? आम्ही तुला न्यायला आलोय. घरी आत्या, आजी, मावशी सगळे आलेले आहेत. तुला भेटून त्यांना खूप आनंद होईल आणि तुलाही बरं वाटेल."
ऋतुजाने फक्तच मान हलवली.
तिघेही जायला निघाले, तितक्यात आकाश घरी आला.
ऋतुजाकडे बघून त्याने मान फिरवली नंतर लगेच तिच्या आई बाबांशी तो छान बोलला.
मधुराच्या सगळ लक्षात आलं..घरी आल्यावर सगळे ऋतुजाच्या जवळ आले, सगळ्यांनाच तिच्याशी बोलायचं होतं. सगळे एकाचवेळी बोलायला लागले.

"अरे थांबा.. थांबा, तिला श्वास तर घेऊ द्या." यमुनाआजींनी सगळ्यांना थांबवलं.
ऋतुजा सोफ्यावर बसली, सगळे तिच्या अवतीभवती जमले.
"ताई कसे आहेत गं आमचे जिजू ?"
"ह्म्म कसे आहेत हे बघायला लग्नात यावं लागतं."
"मला फ्री टाईम असता तर मी नक्की आले असते.."
रात्री मैफिल रंगली, गाण्याच्या भेंड्या, डान्स, गेम्स..सगळे रात्रभर जागले.
मधुराला ऋतुजाशी बोलायचं होतं पण तिच्या जवळ सतत कुणीतरी असायचं.
सकाळी ऋतुजा किचन मध्ये आली,
"आई चहा दे ना, खूप डोकं दुखतंय."
"आई चहा दे ना, खूप डोकं दुखतंय."
"रात्रभर जागरणं केल्यावर आणखी काय होणार? आज ऑफिसला जात नाही आहेस?"
"नाही गं, डोकं भयंकर दुखतंय."
"तू बस, चहा घे."
"काय ग ऋतुजा, फोन आला नाही का अजून?"
"कुणाचा फोन?"
"कुणाचा फोन?"
"ह्म्म जसं तुला कळतं नाही आहे."
"नाही आला, अजून तुला काही जाणून घ्यायचं आहे?"
"का चिडचिड करतेस?"
"का चिडचिड करतेस?"
"तू मला शांतीने चहा पिऊ दे."
"बरं बाबा, मी बसते बाजूला."
"अजिबात नाही, जा तू तुझं काम कर."
ती हसत बाहेर गेली.
"बरं बाबा, मी बसते बाजूला."
"अजिबात नाही, जा तू तुझं काम कर."
ती हसत बाहेर गेली.
क्रमशः
ऋतुजा वैरागडकर
ऋतुजा वैरागडकर
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.